Skip to main content

आउटस्टँडिंग

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/05/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच .. विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत , जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले.

एक होती परी

लेखक अरुण वडुलेकर यांनी शुक्रवार, 01/05/2009 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांनी सादर केलेले विंदांच्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून, अशीच एक मनांत ठसलेली परीची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते ज्ञात नाही. पण गूळ दाण्याच्या खाऊ इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.

गर्जा महाराष्ट्र माझा!!!

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 01/05/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
# १ मे १९६० महाराष्ट्र राज्याची स्थापना. # भारताची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी. # देश की धड़कन मुंबई चा फायदा नॉन महाराष्ट्रियन लोकाना. * उपयोग :- वयाची पन्नाशी पर्यंत जाणारा महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रात दूसरा क्रमांक होता.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे : एक शंका.

लेखक अनंता यांनी शुक्रवार, 01/05/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकत्याच महाराष्ट्रातील निवडणूका झाल्या. यथावकाश निकालही लागतील. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे निकालही तुलनेत झटपट लागू लागले आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानाचे फायदे असतात त्याचप्रमाणे तोटेही असतातच.माझ्या मते, इ.मतदानयंत्रात मेमरी-कार्ड आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला असावा. तसे असल्यास यात ब्लू-टुथ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारच. म्हणजेच गैरव्यवहार करणे फारच सोपे, विशेषत: सत्ताधारी पक्षाला. हे आपले माझे वैयक्तीक मत. चुकीचेही असू शकते. संबधित विषयाच्या तज्ज्ञांनी माझ्या अल्पज्ञानात भर टाकावी.

महाराष्ट्रधर्म

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 01/05/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी मनांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 01/05/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला. पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे. दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत.

...नेट व्होटिन्ग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 30/04/2009 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीतच मतदानाच प्रमाण खुप घटल आहे...मतदानाला शिकलेले लोक जायला काचकुच करतात..आज नेट प्रत्येक घरात आहे.....नेट व्होटिन्ग हा प्रकाराने मतदान प्रमाण वाढु शकेल का? ईंटर्नेट च्या माध्यमातुन घरुनच मतदान करता येइल तर या मुळे मतदानात वाढ होइल..हा पर्याय विचारात घेता येइल का???