Skip to main content

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 02/05/2009 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.) तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.

कोयना अभयारण्य

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 02/05/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही अप्रवासी. पण मुलीच्या अक्षरनंदन शाळेतल्या मैत्रिणी व त्यांचे पालक यांच्यामुळे कोयनानगर अभयारण्यात जायचा बेत ठरला. उत्साही पालकांमध्ये मित्र असल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणुन आम्ही समाविष्ट झालो. आम्ही माणसाळलो हे पाहुन त्यांनाही आनंद झाला. इकडची काडी तिकडे करावी लागणार नसल्याने आमचीही ना नव्हती. हं आता वसंतव्याखानमालेतील एका मित्राचे व्याखान नेमके त्याच वेळेला असल्याने त्याचा बळी द्यायचा आम्ही ठरविले.(त्याचा म्हणजे व्याखानाचा मित्राचा नव्हे). पुण्याहुन नियोजित ट्रॆव्हलर गाडीने आम्ही पाच कुटुंबे सोळानग पहाटे साडेपाच म्हणता म्हणता साडेसहाला निघालो. आमी किन्नर शीट पकडली.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 02/05/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?

मैत्री

लेखक स्वप्निल मन यांनी शनिवार, 02/05/2009 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीच॑ नात॑ कायम जपायच॑ असत॑ प्रेमासाठी कधी मित्राला सोडायच॑ नसत॑ कारण मित्र हा कायम मित्र राहात असतो प्रेयसी सारख॑ कधी नात॑ बदलत नसतो
Taxonomy upgrade extras

एक होतं ढोर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 02/05/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता परा आदी कवितांमधून प्रेरणा घेऊन ही बालकविता रचण्याचा प्रयत्न. एक होतं ढोर
एक होतं ढोर त्यानं पाहिला चोर ढोर लागले चोराच्या मागे चोर पळाला वेगे वेगे "वाचवा ! वाचवा !!" चोर ओरडला लोकं धावली ढोरालाच पकडायला अखेर लोकांनी ढोराला पकडून खुंट्याला बांधून ठेवला करकचून चोराला आनंद झाला फार म्हणे , ढोरांपेक्षा माणसेच हुशार मुक्या प्राण्याची मुकी वेदना ढोराला काहीच सांगता येईना !!

रिक्षा चालकांचे अभिनंदन

लेखक हरकाम्या यांनी शनिवार, 02/05/2009 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील सर्व रिक्षाचालक आणि मालक संपावर गेले आहेत कारण त्यांचे भाडे १ रुपयाने कमी करण्यात आलेले आहे. मी या सर्व मंडळींचे खालिल गोष्टींसाठि अभिनंदन करु ईच्छितो. १) संप करुन पेट्रोलचा खप कमी करुन देशाच्या बहुमोल अशा परकिय चलनाची बचत चालु केल्याबद्दल. २) हवेचे प्रदुषण कमी करण्याला हातभार लावल्याबद्दल. ३) गेले दोन दिवस कुठलेही वादविवाद नसल्याने शांत झोप लागते त्याबद्दल. ४) आम्ही मुठभर लोक तुम्हाला वेठीला धरु शकतो ही जाणीव करुन दिल्याबद्दल. तरी यासर्व मंडळींचे परत एकदा मनापासुन अभिनंदन या सर्व मंडळींची आम्हा जनतेवर अशीच क्रुपा रहावी. ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

श्रेयस

लेखक दशानन यांनी शनिवार, 02/05/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण असाच आहे फाटका एमके माझ्यामध्ये देखील वेगळा कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ तर कधी दारुमुळे झालेली आबाळ मी असाच एक श्रेयस दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता अचानक दुनियादारी शिकलेला हरवलेल्या मित्रांमध्ये कधी श्री तर कधी नितीन शोधत असलेला संतोष बार च्या अंधा-या टेबलवर दुनियादारीचा हिशोब मांडलेला मीच तो एम के कधी श्रेयस असलेला !
Taxonomy upgrade extras

मला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे .

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 02/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झाले होते.

पुण्यातील रिक्षाचालक संपावर

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 02/05/2009 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
१मे पासून पुण्यातील रिक्षाचालक संपावर गेल्याची बातमी वाचनात आली. कारण काय तर १ रु. भाडे कपात करण्याचा निर्णय संबंधीत खात्याने त्यांच्यावर लादला आहे. आमच्या सारख्या पुण्याच्या बाहेर रहाणार्‍यांना पुण्यात आल्यावर रिक्षा प्रवासा शिवाय पर्याय नाही. पी.एम्.टी तसेच पी.सी.एम्.टी चे बस रूट माहित नाहीत. उद्या पासून २-३ दिवस लग्न, मुंज आदिंचे मुहुर्त, सुट्ट्या या कारणाने अनेक बाहेरचे लोक/ पाहुणे पुण्यात येण्याची शक्यता आहे. मला देखील रविवार/ सोमवार पुण्यात यायचे आहे. पण रिक्षा संपामुळे अवघड परिस्थिती वाटत आहे.