Skip to main content

काठावरचे प्रेम.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 06/05/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे प्रेम..... अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी ! आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !" रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी ! मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय 'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !" सूर्य म्हणाला , "मलाही सख
Taxonomy upgrade extras

कलाकृतींचा उगम

लेखक विकास यांनी बुधवार, 06/05/2009 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताने लिहीलेल्या "रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" या धाग्यात या कवितेच्या उगमाबद्दलची रोचक माहीती कळली, जी मला आणि कदाचीत येथील बर्‍याच जणांना आधी माहीत नसावी. अशाच काही गोष्टी गदीमांच्या कवितेबद्दल ऐकलेल्या आहेत:
  1. मायाबाजार मधे श्रीकृष्णास उठवण्यासाठी म्हणून जे गाणे लिहायचे होते ते सुचलेले नव्हते.

मुखवटा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 05/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मिपाकर मित्राला तुम्ही आता चांगलेच ओळखायला लागला आहात. आज सकाळी बघतो तर आमचा हा सुहृद अतीशय संतापलेल्या अवस्थेत हातात पेपर नाईफ घेउन संगणकाच्या पडद्याकडे बघत होता. आम्ही :- मैत्रेया काय झाले ? असा संतापलेला का आहेस ? मित्र :- @#$#@$ २३$@#%#$@#$^ आम्ही :- अरे हो हो काय झाले काय तुला एकदम ? असा एकदम का लाखोली वाहात आहेस ? मित्र :- हे बघ हे बघ ... साला त्या 'गावाबाहेरच्या संस्थळावर' कुणा दुसर्‍याने माझ्या नावाशी साधर्म्य असलेले नाव घेउन कोणा तिसर्‍यालाच शिव्या दिल्या आहेत $@#$@#$@#$ आम्ही :- =)) =)) काय सांगतो काय ?

जंजिरा - इतिहास

लेखक सुमीत यांनी मंगळवार, 05/05/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे.

कर्नाळा - इतिहास

लेखक सुमीत यांनी मंगळवार, 05/05/2009 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर दिड वर्षात पहिल्यांदा लेख प्रकाशीत करत आहे, गड किल्ल्यांचा रंजक इतिहास थोडक्यात वर्णन करावा ह्या हेतूने मी कर्नाळा आणि जंजीरा वर हे लेख लिहून इतर संकेत स्थळां वर प्रकाशित केले आहेत. गेल्या दीड वर्षात वैयक्तीक कारनां मुळे ना मुशाफिर करता आली ना लेखन. आज सहज गप्पा मारताना कैवल्य (धमाल मुलगा) ने हे जुने लेखन पुनःप्रकाशन करण्यास आग्रह केला. पण आता मी पण वेळ मिळेल तसे इतर किल्ल्यांचा इतिहासा बद्दल थोडक्यात लेखन करत राहीन. ===================================================== कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे. प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.

क्षुल्लक

लेखक जागु यांनी मंगळवार, 05/05/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या सामर्थी थेंबा-थेंबाची उसळण, थेंबाच्या बळावर महासागराचे विशालपण ! घराच्या बळकटपणी पायाचं खोल रुतणं, सजिव, निर्जिव भार पेलत घराचं छप्परही सजलेलं चंदनाचे महानपणी सहाणेचं झिजणं, उगाळताना खड्डा सोसून चंदनाचे गुणं टिकवलेलं ! क्षुल्लक गोष्टीतही विसावलं थोरपण, थोरपण जपण्यासाठी जपाव जाणिवेचं उदारपण !
Taxonomy upgrade extras

तीच खरी श्रध्दांजली....!

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 05/05/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस हा साहित्यसृष्टीतीलच काही काळया दिवसांपैकी एक होता. का ते तुम्ही जाणताच! ज्येष्ठ साहित्यीक, वक्ते, राम शेवाळकर काल अनंतात विलीन झाले. माझे भाग्य की, दोन वर्षापूर्वी आणि 2-3 महिन्यापुर्वी असे दोनदा या सारस्वातातीलच हि-याचे शब्द मला कानात साठवण्याचा योग आला.

रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.

लेखक अनंता यांनी मंगळवार, 05/05/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या - सुन्या मैफिलीत माझ्या ...ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना. गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते, तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय.

गाभ्रीचा पाऊस - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 05/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाभ्रीचा पाऊस हे नाव थोडेफार ऐकले होते. कोणत्यातरी महोत्सवात दाखवला होता आणि कदाचित पारितोषिक ही मिळाले म्हणून. पुण्यात होतो तेव्हा लागला नव्हता आणि कोठे परीक्षण ही वाचले नाही. मग येथे अमेरिकेत लॉस एन्जेलिस आणि नंतर बे एरियात याचे शो झाले. त्याबरोबर निर्माते प्रशांत पेठे ('वळू' सुद्धा यांचाच) आणि लेखक्-दिग्दर्शक सतीश मन्वार (उच्चार नीट माहीत नाही) हे ही आले होते. मी बे एरियात सॅन होजे ला दाखवला येथील 'कला' या संस्थेने, तेव्हा बघितला. चांगला चित्रपट आहे, बघण्यासारखा.