Skip to main content

लॉर्ड ऑफ द फ्लाईज

लेखक केदार यांनी शुक्रवार, 08/05/2009 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड ऑफ द फ्लाईज - लेखक विल्यम गोल्डींग मॉर्डन लायब्ररीने प्रसिद्ध केलेल्या १०० चांगल्या पुस्तकांच्या यादीचे वाचन होईल तसे चालू आहे. काही दिवसांपुर्वी लॉर्ड ऑफ द फ्लाईज आणले आणि वाचायला घेतले. सुरुवातीलाच दोन्-चार पानांनंतर उर्वरीत पुस्तकात काय आहे ह्याची उत्कंठा वाटायला लागते आणि पुस्तक हातातून सोडवत नाही. मध्ये दोन तीन वेळेस दोन तीन पानं सोडुन पुढे जावे वाटले तितकेच, पण बाकी वेग खूपच मस्त.

अंकिता नव्हे प्रश्नांकिता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 07/05/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली.अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो, "काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?" "असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?" नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्‍या अंकिताला मी गंमतीत "प्रश्नांकिता" असं नाव ठेवलं होतं.

सहल.. अशीही..!

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 07/05/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासूनच आता यावर्षी ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनला जायचेच जायचे असे ठरवले होते. ह्या दिवशी जायचं का त्या दिवशी.. आत्ता ती शेतं ट्युलिपनी बहरली असतील का? का अजून अवकाश आहे.. असं करता करता इथल्या ट्रॅवल एजन्सीनी २-३ तारखा काढून दिल्या. आमच्या गावापासून ऍमस्टरडॅमला एका दिवसात जाऊन येता येतं. सकाळी पहाटे निघून रात्री उशीरापर्यंत परत. या टूर मध्ये काऊकेनहोफमधलं भलंमोठ्ठ ट्युलिप गार्डन आणि शिवाय ऍमस्टरडॅम शहर असं दोन्ही होतं. पण यातली एकही टूर वीकांताला नव्हती. :( मग रजा टाकता येईल का? जमेल का?

रेव्हेन्यू स्टँप

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 07/05/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्याला पावती देताना घेताना रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. याचे नियम कोणाला माहिती आहेत का? किती रुपयाच्या वरच्या व्यवहारावर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो? कोणत्या प्रकारच्या व्यवहारात? फक्त रोखीने व्यवहार केल्यास की चेकने केल्यावर पण? राज्याराज्यात नियम वेगवेगळे असतात की देशभर एकच? आगाऊ आभार मानीत आहे.

आय लव चप्पाती :)

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 07/05/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
पोळ्यांचा नकाशा तिला कळला नाही पोळपाटाची अदा मला वळली नाही वाटत होत मला (स्वयंपाक)घरात बोलायचं काम नसतं पण नंतर कळलं कितीही बोल्ल तरी कणीकान फक्त तींबूनच घ्यायच आसत आता असं वाटतंय तिला भेटावं .सर्व काही सांगाव (मी पीठ/पाणी घालाव) तीने कणीक फक्त तेवढ मळाव नाही मिळाली हेल्प तरी बोलण्याच समाधान मिळणार आहे ''आज मी फक्त चपात्याच करणार आहे '' असं (एकदा स्वप्नात तरी)मी तिला ठणकावणार आहे .

तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !

लेखक मेथांबा यांनी गुरुवार, 07/05/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे. ज्या कम्युनिस्ट पक्षाला हरवण्यासाठी बंगालमध्ये तृणमुलच्या ममता दिदिंशी काँग्रेसने अभद्र युती केली. त्याच युतीला आता विसरुन कम्युनिस्ट पक्षाचे पाय धरायची वेळ आलेली आहे. यालाच काव्यगत न्याय म्हणता येईल.

कृष्ण

लेखक दशानन यांनी गुरुवार, 07/05/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा" "सारथी दारुक! तो बघ अस्ताला चालेला सुर्य ! प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो !

गाठोडं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/05/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून ! जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी, खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी ! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! आठवणीत ठेवावी एखादी कथा, योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा ! स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !
Taxonomy upgrade extras

माझ्या जमीनीच गाणं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा. चला तर मग माझ्या शेतावर. माझ्या जमीनीच गाणं हि जमीन माझी काळी काळीभोर हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु || हिच्यामंदी करीतो मी जोंधळा लावीतो कधिमधी हरभरा पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ || हि जमीन माझी ... कोंबडी शेळी बकरं मेंढरं तसच पाळीतो मी रानपाखरं गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ || हि जमीन माझी ... हि विहीर माझी लईलई भारी सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी अहो मोटर चाले तास चार || ३ || हि जमीन माझी ...
Taxonomy upgrade extras