कैफियत ....
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली.
एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.
मिसळपाव

