आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात . असे का घडते?
कम्युनिस्टांवर सगळ्याना इतका राग का आहे तेच कळत नाही.खर तर कम्युनिझम हा तर सर्वसामान्य माणसांचे जीवन्मान सुधारण्यासाठी निर्माण झाला आहे . परंतु आज सर्वसामान्य लोकच त्याच्या कडे पाट फिरवत आहेत. हा विचार करण्याचे आज कारण म्हणजे नेपाळ ह्या आपल्या शेजारच्या देशातील अस्थिरता .
नेपाळ हा खुप वर्षापासुन भारताचा खुप चांगला शेजारी व मित्रदेश आहे. परवा पर्यत त्या देशात राजेशाही होती.परंतु गेल्या काही वर्षात त्या राष्ट्राने लोकशाहीचा स्विकार केला आहे. परंतु काही महिन्यापुर्वी तिथे सत्ता परिवर्तन होऊन तिथे प्रथमच माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता छबिलाल उर्फ पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड हा पंतप्रधान झाला. इथे देखिल लक्षात घेण्याची बाब म्हणजे लोकांनी प्रचंडच्या पक्षाला पुर्ण बहुमत न देता त्याने काही समविचारी पक्षाशी युती करुन नेपाळ मध्ये माओवादी सरकारची स्थापना केली. प्रचंडचा माओवादी पक्ष हा आधी बंदुकीवर विश्वास ठेवणारा पक्ष होता. सदर माओवादी पक्षाचे नेपाळी लष्कराशी गेली कित्येक वर्ष सशस्त्र संघर्ष सुरु होता. माओवादी दहशतवादी लष्कर,जनता व इतर राजकिय पक्ष ह्याच्यावर सशस्त्र हल्ले करत असत. नेपाळ मध्ये माओवाद्याच्या हल्ल्यात खुप लोक ठार झाले आहेत. परंतु फक्त बंदुकीच्या जोरावर सत्ता ताब्यात येत नाही हे लक्षात आल्यावर प्रचंडने लोकशाही मार्गाने सत्ता ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यात त्याला यश आले. खरतर नेपाळी जनतेला मनातुन वाटत होते कि भारत आपला मोठा भाऊ असुन आपल्याशी नीट न वागता आपले नियम व अटी आपल्यावर लादत आहे,ह्यासुप्त विचाराचा फायदा घेत भारताबद्दल नेपाळी जनतेच्या मनात भिती निर्माण करुन प्रचंड ने नेपाळची सत्ता हस्तगत केली.सता ताब्यात आल्यावर प्रचंडने सर्वप्रथम भारताचा जवळचा मित्र चीन? ला भेटदिली.भारतिय पुजारी जे नेपाळी मंदिरात कामाला होते त्याच्या नोकरीवर गदा आणली.भारतिय व्यावसायिक व मित्राना त्रास देण्यास सुरुवात केली.भारता बरोबरचे संबध खुपच ह्या काळात ताणले गेले.परंतु ह्यावर अजुन एक कडी प्रचंड ने केली ,ती म्हणजे जे माओवादी नेपाळी लष्कराविरुद्ध लढले होते त्याना सरळ सरळ लष्करात भरती करुन घेण्याचा निर्णय त्याने घेतला. हा निर्णय नेपाळी लष्कर,जनता ,नेपाळ चे अध्यक्ष ह्याना पटला नाही. लष्कराने उघड उघड विरोधाची भुमिका घेतली.सदर विरोध मोडुन काढण्यासाठी प्रचंडने नेपाळचे लष्करप्रमुखाना त्याच्या पदावरुन हटवले. आपला आदेश न मानणार्यावर सरळसरळ त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय लोकशाहीत कोणताच पंतप्रधान घेवु शकत नाही,त्याला काहीतरी कायदेशिर मार्ग आहेत्.परंतु कम्युनिस्ट कायदा कसला मानतात. हा प्रचंडचा निर्णय नेपाळ मध्ये कोणलाच आवडला नाही. तेथिल जनता , नेपाळचे अध्यक्ष व भारताने ह्या गोष्टीला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रचंड ला एकतर लष्करप्रमुखाना विनाशर्त परत पदावर घेणे किंवा राजीनामा देणे हे दोनच पर्याय शिल्लक होते . परंतु हेकेखोर कम्युनिस्ट राजीनामा देवुन रिकामा झाला व ह्या सर्वाचे खापर भारतावर फोडण्यास विसरला नाही.
जर वरील गोष्टीचा विचार केला तर असेल लक्षात येईल की जगातील कोणताही कम्युनिस्ट सत्ताधारी एकदा का सता हातात आली की येनकेन प्रकारे सत्ता हातात धरुन ठेवायचा प्रयत्न करतो.जगातील कोणतेही कम्युनिस्टाचे उदाहरण घ्या त्यात तुम्हाला दिसेल की कम्युनिस्ट सत्ता प्राप्ती नंतर ती टिकवुन ठेवण्यासाठी हुकुमशाह बनतात.प्रचंड देखिल आपल्या अनुयायाना एकदा लष्करात घुसवुन आरामात नेपाळवर राज्य करायचे होते. ही बाब सर्वाच्या लक्षात आल्यामुळे व त्याल वेळीच आवर घातल्या मुळे त्याचे स्वप्न सत्यात आले नाही. कोणत्याही लोकशाही देशाच्या लष्काराने देशाच्या कारभारात ढवळाढवळ करु नये अन्यथा तिथल्या लोकाची अवस्था न घर का ना घाट का अशी होते ह्याचे उदाहरण पाकिस्थानचे देता येईल.लष्कराच्या सततच्या हस्तक्षेपामुळे त्या देशात लोकशाही कधीच बाळसे धरु शकली नाही.तीच अवस्था नेपाळ मधील नवजात लोकशाहीची झाली असती.परंतु वेळीच नेपाळ अध्यक्षांनी हस्तक्षेप करुन प्रचंडचे स्वप्न भंग केले.
आजकाल जे काही कम्युनिस्ट देश आहेत त्यात चीन सोडला तर बाकी देशाची आर्थिक स्थिती खुपच बिकट आहे.एकेकाळी कम्युनिस्टाची पंढरी सोव्हिएट रशियाची हालात किती खराब आहे हे आपण सर्व जाणता. तीच हालात उ.कोरीया वगैरे देशांची आहे.भारतात देखिल जी काही राज्ये कम्युनिस्टाच्या प्रभावाखाली आहेत तिथे सगळ्या ज्यादा बेकारी,दारिद्रता व दहशत आहे.भारतात जो काही नक्षलवाद आहे त्याचे पितृत्व पण ह्याच कम्युनिस्टांकडे जाते.बंदुकीच्या जोरावर हे जे काही साध्य करायचा प्रयत्न करत आहे ते काही अजुनही त्याना साध्य झाले नाही. फक्त लोकांच्या मनात भिती निर्माण करुन आपली पोळी हे भाजुन घेत आहेत.भारतात जी काही राज्ये कम्युनिस्टाच्या प्रभावाखाली आहेत तिथे लोक अजुनही गरीबीत खितपत पडले आहेत.ती राज्ये आर्थिक दृष्ट्या अजुनही सर्वात जास्त मागासलेली आहेत. कम्युनिस्टाच्या प्रभावाखालील क्षेत्रात अजुनही सर्वात जास्त नक्षलवाद पोसला जात आहे.ह्याचा लोकशाही कमी व बंदुकीवर जास्त विश्वास आहे.
परवा टिव्हीवर निवडणुकांचे विष्लेशण चालले असता एका वक्त्याने प्रकाश करात व येच्चुरीचे आभार मानले,कारण मागील खेपेला जवळजवळ ६० खासदार कम्युनिस्टांचे होते ,परंतु करात व येच्चुरींच्या करामती मुळे १५व्या लोकसभेत फक्त २४ खासदार उरले आहेत. अजुन वयाचा हिशेब केला तर करात २० वर्षे तरी सरचिटणीसपदी राहतील. म्हणजे त्याच्या हयातील ते भारतातील कम्युनिस्टांचे नामोनिशाण मिटवु शकतील.त्याबद्दल करातांना धन्यवाद.
वाचने
10471
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
इझम
भारतीय कम्युनिस्ट...
हे खरे नाही
In reply to भारतीय कम्युनिस्ट... by जीएस
भारतमातेच दोन तुकड करायचा डाव
गेले मेथांबा कुणी कडे?
आजकाल
वेगळा विचार
In reply to आजकाल by नितिन थत्ते
>>आजकाल
In reply to आजकाल by नितिन थत्ते
मराठी
In reply to >>आजकाल by परिकथेतील राजकुमार
हे सगळं
In reply to आजकाल by नितिन थत्ते
काही हरकत
In reply to हे सगळं by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडेसे वेगळे
In reply to आजकाल by नितिन थत्ते
अजून थोडेसे वेगळे...
In reply to थोडेसे वेगळे by क्लिंटन
सहमत
In reply to आजकाल by नितिन थत्ते
म्हणुनच
In reply to सहमत by चिरोटा
टिळकांचा उल्लेख अनाठायी
In reply to आजकाल by नितिन थत्ते
मी
In reply to टिळकांचा उल्लेख अनाठायी by मैत्र
असं वाटत नाही
In reply to मी by नितिन थत्ते
हम्म्म्म्म!!!!
जॉर्ज ऑर्वेलच्या
अगदी
In reply to जॉर्ज ऑर्वेलच्या by चतुरंग
जॉर्ज ऑर्वेल : संदर्भ ठीक वाटत नाही
In reply to जॉर्ज ऑर्वेलच्या by चतुरंग
सम आर मोर ईक्वल...
In reply to जॉर्ज ऑर्वेल : संदर्भ ठीक वाटत नाही by धनंजय
कम्युनिझमला शिव्या का?
मी एमिल
संयुक्त
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
In reply to संयुक्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काँ डांगे
In reply to संयुक्त महाराष्ट्र चळवळ by विकास
परंतु करात
कम्युनिस्टा
मी कोणाचाच
In reply to कम्युनिस्टा by स्वामि
खराटा
कम्युनिष्टांना शिव्या नकोत
असहमत
In reply to कम्युनिष्टांना शिव्या नकोत by मिसळभोक्ता
योग्य
In reply to असहमत by क्लिंटन
यासाठी!!
+१ मैत्र ह्याच्याशी सहमत
माझ्यामते
अजुन एक माहिती
क्रांतिकारक