Skip to main content

विवाह संस्था व तीचे पावित्र्य

लेखक हर्षद आनंदी यांनी मंगळवार, 26/05/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कालच चॅनेल सर्फिंग करताना, कुठल्याश्या न्युज चॅनेल वर, "रीयल टीव्ही" नावाच्या चॅनेलवर दाखाविण्यात येणार्‍या एका रीऍलिटी शो मधील काही भाग दाखवुन "ये अश्लिलता नही तो और क्या" वगैरे बडबड ऐकण्यात आली. सायंकाळी झी मराठी वरील "कळत नकळत" या मालिकेची जाहीरात पाहण्यात आली. "रोहीत मधुरा" या पात्रांच्या लग्नाचे रीतसर आमंत्रण मिळाले. मनात विचार आला विवाह संस्थेचे पावित्र्य शिल्लक राहिले आहे काय? असल्यास वा नसल्यास त्याची कारणे कोणती?

निसर्ग म्हणजेच मुक्ति देणारा,निवारण करणारा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 26/05/2009 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्‍यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत. फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान पावलू भेटेल ह्या आशेने कोळीवाड्यात आज गेलो होतो.सकाळची वेळ होती.त्याच्या घरी गेल्यावर मला कळलं,पावलू आणि इतर कोळी समुद्र किनार्‍यावर गेले असून रापण ओढून दुपारच्या बाजारासाठ

(चंपी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 26/05/2009 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
देवाशपथ! शरदिनी ह्यांची 'चंपी' वाचून माझी अक्षरश: चंपी झाली आणि मग बधिरल्या मेंदूला काही सुचेना. पण काय चमत्कार थोड्याच वेळात आमच्या भादरलेल्या मेंदूतून हे स्फुरले!

चंपी

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 26/05/2009 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
चंपी आम्लफ़त्तरा निखळ वस्तरा तीव्रदुहेरी दुर्गम झेले वृष्टीत उसासे तडकून गेले स्तंभ जिव्हारी फ़डकून मेले सरणतुतारी जाताजाता काय मनाला हरखून गेले ललाटगोण्या पावनमौळी चित्र दुधाळी झाळून मेले.. स्वर्गनव्हाळ्या द्यूतसख्यांनी पलिते टाळून नक्षी पुसली. त्या दुर्धर वन बधिरलटांना तीर्थपावना साक्षी फ़सली.... निळ्याजांभळ्या ललाटभृकुटी पिऊन टाका बधीर मापटी आलो गेलो बिकट भरजरी सटल खुणांची गर्भित चंपी

पाककृती दिलेली नाही, विचारायची आहे. कुणाचा गैरसमज / फसवणूक नको. :)

लेखक मेघना भुस्कुटे यांनी सोमवार, 25/05/2009 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
ढॅण टे ढॅण! आम्ही मिक्सर घेतला! इतके दिवस मिक्सर नाही, म्हणून पावलोपावली अडत होतं. एकदा एक पांढर्‍या दगडाचा खलबत्ता मिळतो (आयुर्वेदिक दवाखान्यात वगैरे औषधं खलायला वापरतात तसला) तो आणला. काही दिवसांनंतर खरडा वाटता वाटता खलाचे दोन तुकडे. (एवढा जीव लावून बनवलेला खरडा टाकून द्यायचा जिवावर आल्यामुळे मी हावरटासारखा वरचा खरडा उचलला - होय, ब खवचटासारखं खिक् करून हसली - तर त्यात चक्क दगड लागत होते. मग जड मनानं मी तो टाकून दिला. :( असो.)मी मग नुसताच खल आणला, तर परवा बत्ताच फुटला. :( त्याच पावली तिरिमिरीत जाऊन मी, अ आणि ब मिक्सर घेऊन आलो. :) काल मँगो मिल्कशेक बनवून ढोसून झाला.

मोक्ष

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 25/05/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मातलेला अंधार नी बावरलेपण प्रकाशाचे स्वप्नात जागणार्‍या..,रात्रीत बुडूनी गेलो बेधूंद वाहत्या वारियाला कुंपण अभाळाचे ऐकुन साद चांदण्याची ..,मोहरूनी गेलो समीराची झुळूक चावरी, कुजबुजणे खगांचे आळसावली जाग..,मागे अंधार सोडूनी गेलो ओसाड वाळवंटी ... थांबे फसव्या मृगजळाचे विझुन गेली आग..,धुमसायचे विसरूनी गेलो समाधिस्त मी...,स्विकारले आमंत्रण अद्वैताचे पाश तुटले सारे.., मोहमायेतुन उठूनी गेलो विशाल.