Skip to main content

चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 29/05/2009 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्‍या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते.

गीता, पुल, आणि कोसंबी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 29/05/2009 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव.

लाज

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 29/05/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
टाकलेली लाज फासलेली लाज माडीवर आज विकलेली लाज टेबलाखालून सारलेली लाज नेत्याच्या डोळ्यात कोळलेली लाज दाह दहशत पोळलेली लाज देशद्रोही ताठ वाकलेली लाज आंधळा कायदा झुकलेली लाज वासना हल्ल्यात जन्मलेली लाज मानवा पाहून लाजलेली लाज -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

स्वातंत्र्यवीर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 28/05/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज २८ मे... स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ साली जन्मलेल्या या महामानवाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावुन ब्रिटीश राजवटीविरुद्ध रण छेडले होते. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीत सिंहाचा वाटा असणार्‍या या महान क्रांतिकारकाचे असाधारण कर्तुत्व आज आपल्या स्वतंत्र (?) भारत देशातच दुर्लक्षित होत आहे..

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 28/05/2009 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
Swatantryaveer Savarakar
आज २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ साली जन्मलेल्या स्वातंत्रवीराचे स्मरण हे नेहेमीच प्रेरणादायी आणि चैतन्य निर्माण करणारे असते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करुन ब्रिटीशांविरुद्ध रण छेडणार्‍या या महान क्रांतिकारक देशभक्ताला मनापासुन लक्षावधी प्रणाम. मिपाच्या संचालकांना याचा विसर कसा काय पडला?

निशब्द - अंतिम भाग.

लेखक सँडी यांनी गुरुवार, 28/05/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुढे... ती: मी बाबांशी बोलु का? तो: नको. मी बोलेल योग्यवेळी. ती: ठीक. तो: आपल्या मित्रमैत्रीणींसाठी आपलं नातं वेगळचं आहे नाही? ती: हो! पण आजकाल सगळे संशयित नजरेने पहातात. तो: हं! चल तुला सोडतो बसस्टॉपला. ती: .... ----------------------------------------------------------------- (संध्याकाळी फोनवर) ती: हॅलो! काय करतोयसं? तो: काही नाही.