Skip to main content

<यज्ञधुनी>

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 29/05/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम धातुच्छादित वक्ष मिरवत सूक्ष्माग्री शहारे देतांना हसून मॅडोना म्हणाली टोचेल> टोचेल> टोचेल> प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" :''(

अण्णामामा.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 29/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.

चार चारोळ्या

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 29/05/2009 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते गालावरच्या आसवांना मात्र तुझ्या आठवणींची सय असते. ****** तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय ****** सुंदर गुलाबांना तुडवत माणसं नाकासमोर चालतात पण घरात शोभेसाठी तीच माणसं 'कॅक्टस' लावतात. ****** निळंशार आकाश चमचमत्या चांदण्या आकाशात चंद्रसुद्धा तुझ्यासाठी थांबलेला अवांतर:- ही चारोळी नाही आता चार दिवस सुट्टी घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

कवितांचे मंचीय (नृत्य - नाट्यात्मक) अविष्कार :

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 29/05/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा? पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता... वैताग साला.. (आधीच सुमार निसर्गकविता माझ्या डोक्यात जातात.. त्यात सूर्य, चंद्र,पाऊस,आभाळ असे शक्य तितके हावभाव करत गिटारच्या झिन्गझिन्ग झिन्गझिन्ग ठेक्यावर कोणी कविता उभं राहून गायला लागलं तर काय होईल?... आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या... हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं ..

आज अचानक सर्व्हर गंडे

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 29/05/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक सर्व्हर गंडे कामाच्या वेळी ऑफिस मेळी असता मन 'मिपा'चकडे माऊस क्लिकता सहज मिपावरि एकाएकी 'एरर' पुढे दचकुनी जागत जीव खुर्चीतच क्षणभर 'स्वगृह'ते उघडे :) --लिखाळ. कवि अनिलांची क्षमा मागून. (मूळ कविता)
Taxonomy upgrade extras

वाट चुकलेलें कोंकरूं

लेखक अरुण वडुलेकर यांनी शुक्रवार, 29/05/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २८ मे हिन्दु हृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. काल त्या पुण्यश्लोकाच्या स्मरणाच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे दोन शब्द बोलायचेही होते. मग म्हणून सावरकरांच्या साहित्य गाथेचा धांडोळा घेत होतो. तो खालील कविता हाती लागली. हे काय बंधु असतो जरि सात आम्हीं । त्वत्थंडिलीच दिधले असतें बळीं मी ॥ असें जावल्य शब्द लिहिणार्‍या या संन्यस्त योग्याचे हृदय असें कोमलही होते या प्रत्ययाने मन भारावून गेले. तोच प्रत्यय समस्त सावरकर भक्तांसाठी :- शीर्षक : वाट चुकलेले कोकरुं कां भटकसि येथें बोलें । कां नेत्र जाहले ओले कोणिं का तुला दुखविले । सांग रे !
Taxonomy upgrade extras

अवगुंठन

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 29/05/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच... तुझ्याशिवाय.... सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं कसा घेणार रे मी मोकळा श्वास... कसली होतेय तडफड...
Taxonomy upgrade extras

तळलेले (कुरकुरीत) सुके बोंबील.

लेखक जागु यांनी शुक्रवार, 29/05/2009 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : ७-८ सुके बोंबील (तुकडे करुन) दोन चिमुट मिठ (कमीच घालावे कारण आधीच हे खारट असतात) थोडी हळद, हिंग, मसाला, पाव चमचा लिंबाचा रस, तळण्यापुरते तेल. बोंबील धुवून घ्यावेत. त्याला हिंग, हळद, मिठ, मसाला, लिंबाचा रस चोळावा तवा गरम करून त्यात २ चमचे तेल टाकुन बोंबील टाकावे. गॅस मंद ठेवावा. मधून मधून हलवावेत. साधारण ५ मिनीटांत हे तळून होतात मग गॅस बंद करावा. हे थंड झाले की कडक होऊन कुरकुरीत लागतात.

अननसा चा उलटापुलटा केक :)

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 29/05/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ अननस किंवा १ टिन अननस ५-६ चेरि किंवा मनुका २ कप मैदा १ टी.स्पू. बेकिंग पावडर १ टी.स्पू. बेकिंग सोडा १ + १/२ कप साखर ३ अंडी १ टि.स्पू. वॅनिला अर्क १/२ कप बटर - वितळवून १ टे.स्पू. संत्रा साल (Orange Zest) , लिंबू साल (Lemon Zest) व्हिप्प्ड क्रिम - एच्छिक कृति: १)अ)अननस वापरुन अननसाच्या चकत्या करुन घ्याव्या. एका पसरट पॅन मध्ये १/२ कप साखर + पाणी २:१ प्रमाण घेउन त्यात अननसाच्या ४-५ चकत्या शिजवून घ्याव्या.