Skip to main content

पुलंच्या लग्नाची गोष्ट

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 12/06/2009 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4646148.cms पुलंच्या लग्नाची गोष्ट. एक सुसंस्कृत, प्रतिभावंत जोडपे किती साधेपणाने विवाहबद्ध झाले त्याचे वर्णन वाचा. सुनीताबाईंचा साधेपणा कधी कधे अतिरेकी वाटेल इतका असायचा. मराठी संस्कृतीला इतके काही देऊन गेलेले हे लोक इतके सरळ साधे होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो. कुठे हे लोक आणि कुठे राजेनवाबांना लाजवतील असे भपकेदार लग्नसमारंभ करणारे आपले थोर थोर "लोकसेवक" नेते!

गुलकंद पेढा

लेखक दिपाली पाटिल यांनी गुरुवार, 11/06/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल पाकृ प्रमाणे च आहे, फक्त अंजीर ऐवजी गुलकंद आणि रोज सिरप टाकलंय...साखरे चं प्रमाण कमी जास्त करावं लागेल.. असेच आंबा, अननसाचे पेढे ही बनवता येतात... फक्त आंबारस आणि अननस, बारिक करुन साखर टाकुन आटवावं.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 11/06/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

पाऊस

लेखक रामदास यांनी गुरुवार, 11/06/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हटवादी पोर हुंदके दाबत, जिन्याच्या पायरीवर बसावं असा पाऊस. पोळलेल्या हातानी घ्यावा कसा कडेवर.? ------------------------------------------------------------------------------------------------------ पाऊस भरतुकडा नादान साजण . कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का?
Taxonomy upgrade extras

वास्तविकता आणि भ्रम

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/06/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?" सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं.

मथुरानगरपती

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/06/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे कृष्णार्पण इथे! मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!

हरामखोर निर्लज्ज लालू

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 11/06/2009 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090610/mum02.htm वरील बातमी वाचा. लालूप्रसादने रेल्वे मंत्रीपद सोडताना लबाडी करून समस्त माजी रेल्वेमंत्र्याना, त्याच्या वा तिच्या कुटुंबियांना आणि एका नोकराला जन्मभर वातानुकूलित डब्यातून फुकटचा प्रवास मंजूर करून घेतला. वा रे समाजवादी! माजवादी साले. ही हरामखोरी आहे. रेल्वेमंत्र्याला जन्मभर फुकट पोसायला ही लालूच्या बापाची जहागीर आहे का? बघू आता ममतादेवी ही सवलत ठेवतायत का रद्द करतायत ते.

केसरी महोत्सव

लेखक चित्रादेव यांनी गुरुवार, 11/06/2009 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया.