Skip to main content

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त द्रुष्टिकोनातून

लेखक नानबा यांनी शनिवार, 13/06/2009 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात. अशाच काही पैलूंवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे नामांकित अर्थ तज्ज्ञ, २००४ ते २००९ या काळात भारताचे अर्थ मन्त्री राहिलेले आणि सध्याच्या युपिए सरकारमध्ये ग्रुहमन्त्री असणार्‍या पी. चिदंबरम यांच "अलिप्त द्रुष्टिकोनातून" हे पुस्तक. पुस्तकाच्या मुखप्रुश्ठावर पी. चिदंबरम यांचं अतिशय प्रसन्न हसरं चित्र आहे. आणि "चांगले अर्थशास्त्र प्रत्येकासाटीच चांगली कामगिरी करणारे असते" ही टॅग लाईन आहे. चिदंबरम यांनी एन्.डी.ए.

बालगझलः झुऽम झुऽम झुऽम

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/06/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा) इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे. तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल =========================== विमान झेपावे कसे?

Kale's Law

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 12/06/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
Kale's Law Simply put, Kale's Law (which is based on extensive and in-depth research covering current situation, modern history and sound reasoning) brings out how the world has always been ruled by the clean-shaven. Due to the very nature of the subject, the study does not include the pre-razor era when the people simply did not shave because the shaving was rather painful and people preferred to be grizzly than be in tears.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 12/06/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

एम एस ई बी ची बिले

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 12/06/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , मि.पा.कर , कालच मला मे महिन्यचे विजेचे बील आले , फक्त ६५००/- रुपये ! घरी ए सी वगैरे नाहिये, इस्त्री बाहेरुन करुन घेतो,उन्हाळा असल्याने गिझर चा वापर पण नाहिये! ह्यांचे लोक बिले पण उशिरानेच देतात की जेणेकरून आपण दण्ड भरावा ! याबाबत त्यांना देण्यात येणारा अर्ज मुद्दाम पुढे देत आहे. आपल्यापैकी कुणाचाही या बाबत असाच किंवा वेगळा अनुभव असल्यास / याबाबत कुठे तक्रार केल्यास ताबडतोब प्रतिसाद मिळेल हे माहीत असल्यास मला जरा कळविणे ही विनंती !

चॉकलेट कुकीज

लेखक समिधा यांनी शुक्रवार, 12/06/2009 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीला इकडे आल्यापासुन ह्या कुकीज खुप आवडतात्,म्हणुन मीच करायला शिकले . तिच्यासाठी वेगवेगळ्या आकारात ह्या बनवल्या आहेत. समस्त खवयांना आणि विशेष करुन लहान मुलांच्या आयांना (आईचे अनेक वचन) आवडतात का बघा..:) माझ्या मुलीला आणि मैत्रिणींना खुप आवडल्या.

अडला हरी ....

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 12/06/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
'अडला नारायण' किंवा 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. अत्यंत बिकट अवस्था आली तर मानापमान किंवा सदसद्विचार थोडा बाजूला ठेऊन कोणाचेही पाय धरायची वेळ येते असा या म्हणीचा अर्थ आहे असे मी आतापर्यंत समजत आलो आहे. या म्हणीचा एक वेगळाच अर्थ लावून त्यावरून एक अजब तर्कट काढल्याचे एका लेखात वाचले, त्यामुळे या म्हणीची थोडी चिरफाड या लेखात करावी असे वाटले. हरी आणि गाढव या दोन व्यक्ती आणि अडणे व पाय धरणे या क्रिया धरल्या तर त्यापासून अनेक शक्यता संभवतात. १. हा हरी नेहमीच अडलेला असतो आणि गाढवाचे पाय धरून बसलेला असतो. २.

बेरीज

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/06/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरे म्हट्ले तर माझे काम झाले होते. कसे झाले कुणामुळे झाले हे पण माहीत नव्हते. निघता निघता विचार आला चला आणखी काही बेरीज होते का? माझी मोठी बहीण तशी शेठाणी. भावोजींचा मोठा प्रेस होता प्रभादेवीला. मार्मिक च्या बाजुला. दसर्‍याच्या पुजेला ह्या प्रेस वर जाणे ही एक पर्वणीच असायची. पुजा झाल्यानंतर भावोजी पाकीटातुन रुपये १०१ चा बोनस देत असत. सत्तरीत १०१ रक्कम फार मोठी होती. अशाच एका पुजेला गेलो होतो. ताई आणि आई च्या गप्पा सुरु झाल्या होत्या. ताई तशी फार कनवाळू. आईला तीने कुणाला तरी मदत कशी केली ह्या बाबत बोलत होती. ताईचे बोलुन संपल्यावर आई म्हणाली,'"हे बघ , आपण कधीच कुणाला मदत करु शकत नाही.

मी सखाराम गटणे

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 12/06/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
[हा लेख साधारण दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. काही मित्रांच्या सूचनेवरून आजच्या दिवशी येथे पुन्हा देतो आहे. मिपाच्या धोरणात हा लेख, आता किंवा यापुढे बसत नसल्यास अप्रकाशित केला तरी काही हरकत नाही.] "मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्‍या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्‍या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला. अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही.

म.टा.मधील वैतागवाणी शीर्षके आणि भाषा

लेखक शाल्मली यांनी शुक्रवार, 12/06/2009 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी महाराष्ट्र टाईम्स चाळत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले-'पुलं'च्या जयंतीनिमित्त उद्या कार्यक्रम- शीर्षक वाचूनच काहीतरी खटकले. कारण १२ जून म्हणजे पुलंचा स्मृतीदिन हे मला पक्के आठवत होते. म्हणून साशंकतेनेच बातमी उघडली. तर त्यातील पहिलेच वाक्य- ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाऊंडेशनतफेर् 'पु. ल. एक आनंदयात्रा' हा कार्यक्रम...