आज सकाळी महाराष्ट्र टाईम्स चाळत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले-'पुलं'च्या जयंतीनिमित्त उद्या कार्यक्रम- शीर्षक वाचूनच काहीतरी खटकले. कारण १२ जून म्हणजे पुलंचा स्मृतीदिन हे मला पक्के आठवत होते. म्हणून साशंकतेनेच बातमी उघडली. तर त्यातील पहिलेच वाक्य- ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाऊंडेशनतफेर् 'पु. ल. एक आनंदयात्रा' हा कार्यक्रम... असे दिसले.
'मटा' सारख्या नावाजलेल्या आणि भरपूर वाचकसंख्या असलेल्या वृत्तपत्रात अशी मोठी चूक व्हावी हे काही पटले नाही.
या निमित्ताने अजून एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे मटामधे वापरली जात असलेली भाषा. उदाहरण म्हणून ही बातमी पाहू. या बातमीत असलेले काही शब्द जसे 'असल्याचं', 'उघडं झालं', 'त्यानं' इ. -जे आपण अनौपचारिक - बोली भाषेत वापरतो ते शब्द वृत्तपत्रात- जेथे औपचारिक भाषा वापरली जाते तिथे हे शब्द खटकतात. त्याऐवजी 'असल्याचे','उघडे झाले', 'त्याने'- असे शब्द वाचायला बरे वाटतात. 'झालंय' हा असा अजून एक शब्द, जो मटामधे अनेकदा आढळतो. त्याऐवजी 'झाले आहे' असा शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतो, असे मला वाटते.
वरील बातमीमधे असे अनेक शब्द आहेत की ज्याला मराठी रुळलेले प्रतिशब्द सहज उपलब्ध असताना उगाचच इंग्रजी शब्दांचा भडिमार केलेला जाणवतो. वरील बातमी उदाहरणादाखल दिली आहे. मटातील बहुतेक बातम्यांमधे पुष्कळ इंग्रजी शब्दांचा विनाकारण केलेला वापर नेहमी खटकतो. 'कॅप्टन कुल ढोणीही गरम झाला' हे वाक्य विशेष मजेदार वाटले.
वृत्तपत्रांतली भाषा योग्य असणे ही त्यांची जबाबदारी नाही का?
--शाल्मली.
वाचने
4612
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे! काय
अगं
शाल्मली,
ती फक्त
In reply to शाल्मली, by आपला अभिजित
अरे हो!
वरील
मटा मधे
पटले!
In reply to मटा मधे by नीधप
तुलना
मटाचा दर्जा भलताच खालावला आहे
हे
In reply to मटाचा दर्जा भलताच खालावला आहे by सचीन जी
हे सगळे
हे सगळे
मी मटा
हे हे हे
मटा..
असेच
In reply to मटा.. by स्वाती दिनेश
सहमत
मलाही आवडत नाही
म.टा.मधील वैतागवाणी शीर्षके आणि भाषा
टाटा
कलच्या