Skip to main content

डेट्रॉईट्मध्ये ब्लॅक अँड व्हाईट चा कार्यक्रम

लेखक अमेरिकन त्रिशंकू यांनी बुधवार, 15/07/2009 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम तारीख आणि वेळ : रविवार, २ ऑगस्ट २००९, दुपारी ४:०० ते ७:०० ठिकाणः नोव्हाय हायस्कूल २४०६२ टाफ्ट रोड, नोव्हाय, मिशिगन ४८३७५ गायकः हृषिकेष ऱानडे, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, सावनी रविंद्र संचालनः राहुल सोलापुरकर दिग्दर्शन मिलिंद ओक तिकिटांसाठी संपर्क: (१५ आणि २० डॉलर्स) पराग वाकणकर (दुवा क्र. २) - २४८-७३५-०२०३ (pwakankar@gmail.com) शौनक आठवले (दुवा क्र. १) - ७३४-९४४-६२६६ (bnwmi@yahoo.com)

खरडीसंबंधी सूचना..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 15/07/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा. आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल.

सुख म्हंजे नक्की काय आसत

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 15/07/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे पैसा, श्रीमंती वगैरे वगैरे .... ईती सर्व उद्योगपती ... सुख म्हणजे आध्यात्म ध्यान केल की मनशांती मीळते. वगैरे वगैरे .... ईती सर्व सादूबाबा "ये आये ! मी शिर्‍याबरूबर मूंबयला जाव ?" शिर्‍याची थोरली भन मूंबयला दिल्ती. भावजी पोस्टमन व्ह्ते. खारपाड्यान त्यांचा लय रुबाब. शिर्‍या सुट्टीत दोन दिसांसाटी चाल्लावता. मीनी मूंबय कदीच बगीतली नवती. शिर्‍यान ईचारल तसा सूसाटलु. "आर यकटा नको जाव त्या शिर्‍याबरूबर. तू ल्हान हाईस आजुन." आय "ल्हान कना? ल्हान कना? आता त आटवी पास झालो न नव्वीत झेलो न?" "म्हुन क झाला र ?तू जाव नको बाला.

पारध झालेला तो पारधी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 15/07/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे. १९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा.

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

लेखक limbutimbu यांनी बुधवार, 15/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे!

माझे जगावेगळे? छंद

लेखक पाऊसवेडी यांनी बुधवार, 15/07/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
साप पकडायला आणि त्यांना हाताळायला शिकायचे आहे असे मी म्हणल्यानंतर घरात महाभारत,रामायण आणि पानिपत सगळे एकत्रच झाले होते आणि मीच त्याला कारणीभूत होते >:) कारण मुळातच मागच्या दहा पिढ्यान मध्ये कोणीही असेले काहीतरी छंद (आईच्या भाषेत नसते उद्योग) केलेले नव्हते. आणि मुळातच अशा काही गोष्टी करून काय सध्या होणार त्यापेक्षा साप जंगलात आणि मी घरी सुखी राहू शकते ना ? ;) असे आईचे म्हणणे होते. खूप दिवसांपासून माझी साप पकडायला शिकायची इच्छा होतीच 8> आणि आवश्यक तेवढ शिकूनही झाले होते :?

काळ आला होता पण .......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 15/07/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
रामनाम सत्य है... हरि का नाम सत्य है... पक्या एक सिगरेट दे ना बे ! हल बे, एकच पाकीट राहिलंय आता, उद्याचा सगळा दिवस काढायचाय तेवढ्यावर...! याला कुणी आणला रे इथे, कंजुस मारवाडी साला..... भुसनाळीचांनो, मघापासुन दोन तासात माझी साडे तीन पाकिटं संपवलीत ब्रिस्टोलची आणि मलाच कंजुस म्हणताय. हुडुत..आता तर थोटुक पण देणार नाय, बसा आधाशासारखे माझ्याकडे बघत....! बरोबर, चार दिवसांपुर्वी बादशाहीसमोरच्या कट्ट्यावर खिशात हात घालुन बसलो होतो. हं हं हं...खिसे रिकामे आहेत हे कुणाला कळु नये म्हणुन हात घालुन खिशाला फुगीरपणा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, बाकी काही काही नाही हो ! २२ किंवा २३ तारिख असेल.

मी लिहितो तेव्हा...

लेखक ज्ञानेश... यांनी बुधवार, 15/07/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
============ मी लिहितो तेव्हा माझी, लेखणी बासरी होते मी जिथे सारखा बसतो ती अशी ओसरी होते मी लिहितो तेव्हा सगळ्या सृष्टीचा कागद होतो शब्दांच्या वर्षावाला जो टिपतो, ओला होतो मी लिहितो तेव्हा लिहिणे, स्वप्नाहून सुंदर होते कवितेच्या दवबिंदूंनी पानांची थरथर होते मी लिहितो तेव्हा तेव्हा, मी लिहितो ऐसे काही, जणू धमन्यांमधे माझ्या वाहते जांभळी शाई.. मी लिहितो तेव्हा मजला, जाणवते अपुले अंतर कवितेच्या थोडे आधी, कवितेच्या थोडे नंतर....! -ज्ञानेश. ============== (नमस्कार मिपाकर मंडळी... मी सदस्य म्हणून इथे तसा नव्यानेच आलोय.

गाणी

लेखक आशिष सुर्वे यांनी बुधवार, 15/07/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार बंधु-भगिनींनो! मला एक माहिती हवी आहे.. मला जुनी मराटी भावगीते महाजालावरून उतरवून घेता येईल अश्या संकेतस्थळांची यादी कोणी देऊ शकेल का? सध्यातरी मला 'कूलटोड.कॉम' हे एकच संकेतस्थळ माहित आहे.. क्रुपा करून प्रतिसाद द्यावा ही विनंती!