Skip to main content

वडीलांना काव्यसुमनांजली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (मा
काव्यरस

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_bora… येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 19/06/2021 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही.

असं नको.. तसं लिही..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 18/06/2021 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाही.. नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून काढलेल्या दगडांसारखी टोकदार आणि खुनशी झाली आहेत.. समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी.. आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार ! आणि 'मनुष्य' म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस.. 'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..! असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही... एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर..

सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक -दंडोबा देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills

लेखक व्लॉगर पाटील यांनी शुक्रवार, 18/06/2021 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
दंडोबा ऐतिहासिक देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills दंडोबा डोंगर - गेल्या वर्षी lockdown मध्ये गावाकडे(तासगांव , सांगली ) होतो. तर म्हंटलं यावेळी आपला सांगली जिल्हा explore करू आणि आपल्या जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळ लोकांपर्यंत पोहचवू.

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 17/06/2021 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार ! AW001 AW002 साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार ! AW003 तुम्ही म्हणाल मी ही काय लिहि

विजेची गोष्ट २: शॉक देणारे मासे, कॅव्हेंडिश, विजेचा प्रभार(electric charge ) आणि विजेची तीव्रता (electric potential difference ) 

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 17/06/2021 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
तशी ती अजून एक अमावास्येची रात्र म्हणावी लागली असती आणि विक्रम राजाच्या कर्तव्य रत जीवनातल्या, अव्याहत कष्टात झोकून देऊन प्रजाहित पाहणाऱ्या खडतर जीवनात फार `उठून दिसलीच नसती पण राजाच्या दरबारात त्या दिवशी एका कसल्याशा मांत्रिकाने का जादूगाराने केलेल्या चमत्कारामुळे आणि सांगितलेल्या चमत्कारांमुळे विस्मित झालेल्या विक्रमाला मात्र ती चांगलीच लक्षात राहिली होती आणि राहणार होती.

*वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...*

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
*#आषाढी #भक्ती #वारी #आपलीच* *#माती #आपलीच #माणसं* *#विठ्ठल #मायबाप #माऊली #पावसाळा #देव* पावसाळा म्हणले की खूप काही असतं ...नुसता प्रेम आणि सौंदर्याचा मोसम नाही तर ह्याच पावसाळ्यात भक्ती रसाच अत्युच्च उदाहरण दाखवणारी पंढरपूर ला जाणारी वारी होय!... यंदा महामारी मुळे वारी निर्बंध असल्याने हा योग हवा तितका पाहायला तसेच अनुभवायला मिळणार नाही...पण त्यात काहीच मन उदास करून घेण्यासारखे नाही .... वारी म्हणजे फक्त पंढरपूरला चालत जाणे एवढेच असते का?? त्याचा जीवनातला अर्थ काय ??? याच साऱ्या प्रश्नांमधून एक लघु कथा... *वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...* "व्हाय डींट यू चेक अवर कार व्हेन वी वेअर

पॅकेज असतं रे

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/06/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
“समोशात साखर टाकली का रे?” पहिला घास घेताच निखिल ओरडला. “नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.” “पण समोशाची चव बिघडते ना.” अपरिपक्व बटाट्यामुळे त्याचा मूड गेला तशीही त्याला Too much Too early ची खूप चीड होती. समोशाची प्लेट तशीच ठेऊन तो अक्कलकोटकडे निघाला. तो अधूनमधून देवस्थानाला भेट देत असतो. देवाच्या पाया पडणे तर होतेच पण त्याचा विश्वास होता अशा ठिकाणी नवीन आवाज सापडतो, असा आवाज ज्यावर शहरातल्या सुगम संगीत विद्यालयाचे संस्कार नाही. गाताना उगाच ताना नाही की गरज नसताना उंचावलेला सूर नाही.