Skip to main content

भटकायला जाताय?

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 21/07/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब पावसात शहराचा परिसर सोडून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गाचे वैभव बघावं. दाट धुकं, निसरडी पायवाट, हिरवंगार रान आणि खळाळता प्रवाह हे सारं सारं बघण्याची... ह्याला स्पर्श करण्याची हौस सर्वांनाच असते. अश्या वेळ कुठे जावं हे आसपासच्या मित्रांना विचारलं जातं. मित्र भटकणारे असले तर उत्तमच. नाहीतर कधी तरी अपुरी माहिती आपल्याला मिळते. अश्या वेळी अशी भटकंती ठरवतांना आंतरजालावरील काही सुविधा आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. त्यापैकी खाली काही देत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मार्ग आणि नकाशा. यासाठी दोन सुविधा खुप उत्तम आहेत.

सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 21/07/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच. समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.

ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 21/07/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ह्र्दयविकाराने व श्वसनाच्या दुखण्याने आज हुबळी येथे सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. त्या गानतपस्विनीला श्रद्धांजली.

थांब राजसा..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 21/07/2009 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
रात मधुमती, चांद संगती थांब राजसा जाऊ नको.. स्पर्श अमृती, रे तुझी मिठी दूर उभा तू राहू नको.. धरेस बिलगुन, गगन झोपले गळा चांदण्-मणी गुंफले दूधाळ होई , अकाश गंगा क्षितिज माखले , जांभूळ रंगा रंग मिलनी पुसटू नको.. थांब राजसा जाऊ नको.. रूणझुण वाजे पुन्हा पाऊल नव्या उषेची नवी चाहूल आर्त स्वरांनी रात पुकारे मनी मिलनी, नवे धुमारे स्वप्न टिपेला नेऊ नको.. थांब राजसा जाऊ नको.. मिठीत ओल्या, मला राहु दे मधुमिलनी, मला न्हाऊ दे कुशित तुझा गंध घेऊ दे उरांत तुझा छंद लेऊ दे रात सुनी ही ठेऊ नको थांब राजसा जाऊ नको.. - प्राजु
काव्यरस

ह्याचा देव

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 21/07/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्या देशांत आता त्यांचे राज्य आहे हे ह्याला कळले.. हा शहारला.. ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ... त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्‍या वर्णाचा तो पाहूणा... त्याच्या नवस्वातंत्र्याचा ह्याला हेवा वाटला. मग आपणही कमी नाहि असे वाटून हा बोलू लागला आमच्याकडेही असाच एक नेता होऊन गेला... तो काळच असा होता.. देवाच्या सेवकांनी देवाला घेरला होता.. देवाचा व्यापारी करून भक्ताला गिर्‍हाईक केले होतं... तो व्यापार एका माणसाला दुसर्‍यापासून तोडत होता... आमची वेस गावाबाहेर सुरू व्हायची.. गाव येताच संपायची... आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं... तो म्हणला "देव झूट आहे..

`पग' घुंगरू...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 20/07/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा : ही पाहा pug "गद्दारांना शिवसेना भवनात स्थान नाही!'' उद्धव ठाकरे गरजले, तशी सर्वांचीच पळापळ झाली. विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना कोण गद्दार शिवसेनेत पुन्हा घुसण्याचा किंवा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे काही कळेना.

आपण भ्रष्टाचारात सहभागी होतो का?

लेखक विकास यांनी सोमवार, 20/07/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजे साहेबांच्या आपण देशासाठी काय करतो या संदर्भातील चर्चा वाचताना, एक बर्‍यापैकी समान धागाअसा आहे की आपण कर भरत असलो, आपले काम नीट करत असलो वगैरे, तर नागरीक म्हणून आपण आपले काम करतच असतो. हा १००% पटणाराच मुद्दा आहे. आता भारताची सद्यस्थिती पहाता कोणीही मान्य करेल की त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे.

वाटेवर मी तिच्या ठेवली--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 20/07/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवर मी तिच्या ठेवली प्राजक्ताची दोन फुले ह्रदयातून मग लक्ष लागले प्राजक्तातून प्रीत फुले ? उगीच ठेवला प्राजक्त तिथे मी मनात रुजलो आहे किती ? मधल्या दिवसांमधील अंतर जाणून घेण्या आहे किती ? हळवी लागे ओढ अनामिक मनास हुरुहूर सले खुळी प्राजक्तातून प्रीत पाहतो विसरली का मज प्रीतकळी ? आनंदाने तिने उचलली रस्त्यावरची दोन फुले गंध घेउनी प्रेमभराने मला शोधण्या नजर फिरे फुले नव्हे ती आमुची प्रीती प्राजक्तातून फुलली होती तशीच ताजी तशीच नि॑मळ प्राजक्तासम उरली होती

इतिहासाचे एक पान...

लेखक दशानन यांनी सोमवार, 20/07/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुलै १९६९ ! आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली, अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली...