त्या देशांत आता त्यांचे राज्य आहे हे ह्याला कळले..
हा शहारला..
ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ...
त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्या वर्णाचा तो पाहूणा...
त्याच्या नवस्वातंत्र्याचा ह्याला हेवा वाटला.
मग आपणही कमी नाहि असे वाटून हा बोलू लागला
आमच्याकडेही असाच एक नेता होऊन गेला...
तो काळच असा होता..
देवाच्या सेवकांनी देवाला घेरला होता..
देवाचा व्यापारी करून भक्ताला गिर्हाईक केले होतं...
तो व्यापार एका माणसाला दुसर्यापासून तोडत होता...
आमची वेस गावाबाहेर सुरू व्हायची.. गाव येताच संपायची...
आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं...
तो म्हणला "देव झूट आहे.. सारे सारखे आहेत"
आम्ही म्हणलो " होय होय.. देव झुट आहे"
तो म्हणला "देव विसरा.. तुम्ही फक्त शिका."
आम्ही म्हणलो "होय होय... देव विसरा"
तो म्हणाला "चाकरी सोडा, देश चालवा"
आम्ही म्हणालो...
पाहूणा प्रभावित झाला.. विचारू लागला..
तो नेता गेल्यावर तुम्ही काय केलंत? देश चालवलात?
हा खिन्नपणे हसला... म्हणाला
"छे हो! आम्ही त्याला देव केला..
त्याला आम्ही नियमीत हार घालतो ना!"
याद्या
3749
प्रतिक्रिया
25
लेखनविषय:
मिसळपाव
सॉल्लिड!! ज
>>जळजळीत
In reply to सॉल्लिड!! ज by प्राजु
प्रभावी
लैच भारी.
प्रबोधक
सहमत. छान!
In reply to प्रबोधक by धनंजय
मस्त!
जबरा रे ,,,
+१
In reply to जबरा रे ,,, by छोटा डॉन
लै म्हणजे
ऋषिदा
मस्त रे
आम्हाला
कविता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ऋषिकेश
धारदार
मस्त.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
सही!
दाहक
क्लास रे
आभार
मुक्तक
फार