Skip to main content

रिमझिम येता वळवाची सर---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 23/07/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम येता वळवाची सर मातीतून मग तुझाच दरवळ पानोपानी तूच खेळ्सी ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर रिमझिम येता वळवाची सर स्वरांतूनी तू उमलुनी येसी माझी होउन मिसळूनी जासी विहारुनी त्या स्वरांतून मी सहजच येतो पुन्हा समेवर रिमझिम येता वळवाची सर चेहर्‍यावर तव अवखळ गोडी चंचलता ती यौवन वेडी अधीर उत्कट फुलूनी येती मोती अगणित तव अधरावर रिमझिम येता वळवाची सर सहज मोती ते टिपूनी घ्यावे अपूर्ण काही राहून जावे अन् वळवाचे वेड धरावे स्वर्गातुन मग यावे भूवर रिमझिम येता वळवाची सर

शोध स्वरालयीचा, शोध गंधाराचा!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 23/07/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्याला एखादं गाणं का आवडतं? दोन ढोबळ उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते. आता चाल आवडते म्हणजे काय? तर त्यातील लय, स्वरावली, किंवा एखादा स्वर आपल्याला आवडून जातो. या लेखात वानगीदाखल म्हणून आपण शुद्ध गंधाराचा सुंदर उपयोग केलेलं एक गाणं पाहू. कसा आहे हो हा शुद्ध गंधार? शुद्ध गंधार हा मला नेहमीच अत्यंत तेजस्वी स्वर वाटत आलेला आहे. एखाद्या मिट्ट अंधार असलेल्या रस्त्यावर वीज चमकावी आणि क्षणात संपूर्ण रस्ता प्रकाशमान व्हावा तसा आहे शुद्ध गंधार. अत्यंत तेजस्वी, स्वभावाने चौकस परंतु तेवढाच हळवा देखील!

शंका

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 23/07/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो आपल्या लहानपणी अनेक शन्का असतात. सर्वच शंकांचे निरसन नीट होतेच असे नाही . बरेचदा असला प्रश्न का विचारलास म्हणून छड्या / रट्टे/ धपाटे ही खावे लागले असतील. त्या शंका नंतर सूप्त होतात. तुम्हालाही अशा काही शंका आठवत असतील तर त्या इथे लिहाव्यात. बघु एखाद्या सूप्त शंकेचे उत्तर मिळून जाईल माझ्या शंका १) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती.

ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही. मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल. मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली.

एक निवेदन..

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 23/07/2009 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, अलिकडे असे निदर्शनास आले आहे की काही सभासद प्रत्येकच ठिकाणी मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेले अवांतर प्रतिसाद देत असतात, प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन गप्पा मारत असतात, एखाद्या सभासदाच्या सहीवरून चर्चा करताना आढळतात. सबब, हे निवेदन - "अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे" असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्‍या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल.

अमेरिकन पाट्या!!!!!

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 23/07/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी पाट्यांच्या पाठोपाठ येत आहेत अमेरिकन पाट्या!!!!! १. हर्शे चॉकलेट पार्क, पेनसिल्वानिया. :X २. एक असेच रस्त्याचे नाव... ( देणारा कंटाळला असावा बिचारा (|: ३. NYSE च्या दारात ONE-WAY अशी पाटी आहे. आत गेलेला $ परत बाहेर येत नसावा. पाटी सार्थ आहे :D टीपः #१ मी स्वतः काढला आहे. # २, # ३ एका मित्राच्या Orkut मधून साभार!

अमेरिकेचा माज..

लेखक शाहरुख यांनी गुरुवार, 23/07/2009 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
काँटिनेंटलच्या खुलाश्याचीच वाट बघत होतो मी.. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची भारतीय विमानतळावर विमानात प्रवेश करण्याआधी विमान वाहतूक कंपनीने झडती घेतल्याचे आपण वाचले असेलच..काँटिनेंटलवाले म्हणतायेत की "US Transportation Security Administration requires final security check without exemption" साला, ओबामा भारतात येईल तेंव्हा त्याची पार नागडा करून तलाशी घेतली पाहिजे आपण..त्याच्याशी काही वाकडे नाही, पण 'मेसेज' जाणे जरूरीचे आहे.

दिव्याची अवस.

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 22/07/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा दिवस दिव्याचा अवसेचा. दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला प्रकर्षाने आठवण होते ती आई करत असलेल्या कणकेच्या उकडलेल्या दिव्यांची आणि चाळीत शेजारी रहाणार्‍या नलिनीकाकूंची. लहानपणी गावी चातुर्मासाचे दिवस जाणीवपूर्वक आणि श्रध्देने जपले जायचे. नंतर येणारा श्रावणमहिना आधीच दिव्याच्या अवसेतून हूरहूर लावत असे. दिव्याच्या अवसेला आई आम्हा सर्व भावंडांच्या संख्येइतके कणकेचे गोड, उकडलेले दिवे करत असे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्याची आरती करून देवाला नैवेद्य दाखवित असे.