Skip to main content

पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण -अधिक माहिती हवी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090724/pnv02.htm http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4814400.cms पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण झालेली आहे. निरागस बालके आजारी पडत आहेत. टि.व्ही. त या रोगावर काही उपचार उपलब्ध नाही असे पाहीले. खरे काय, खोटे काय? त्याची त्रिव्रता किती? अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी? जाणकार प्रबोघन करतील काय?

येडु.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रखर वास्तव वादी नव कविता अरे भाड्या...सोड नाड्या ओढ विड्या...भकाभका तीन पिढ्या...करती काड्या सोडतीकिड्यां....चुकाचुका सोड पुड्या...शोध किड्या बग्ज फोड्या.... टक टका आला दुडू... जातो उडू हाती कार्डु...छम्म छमा बांधु माड्या... पगार मोड्या ई एम आय सोड्या..खण खणा घेऊ गाड्या....बनवु जोड्या लोन ओढ्या.... भुर्र भुर्र्या अप्रेजल आले...डोळे ओले रुमाल भिजले..टप टपा नको रडु.. हात जोडु पीएम कडु... हलकट्ट नको नडु...
काव्यरस

कलेला देशसीमांचं, भाषेचं बंधन नसतं.

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 24/07/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपूर्वी माझ्या बरोबर लॉस एंजेलिस येथे एक चिनी स्त्री सहकारी काम करीत होती. पेली ली नाव तिचं. तिच्या सुरूवातीच्या काळात तिच्याशी इंग्लिश मध्ये संवाद साधणं म्हणजे एक कसरतच होती (आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.) मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की मला हवं असल्यास तिला कामावरून कमी करून व्यवस्थित इंग्लिश बोलणारा/री दुसरी कोणी व्यक्ती टेक्निशिअन म्हणून मला हवी असल्यास ते व्यवस्था करतील.

एक स्वप्न प्रवास (११)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/07/2009 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699 एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712 एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785 एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797 एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859 एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894 एक स्वप्न प्र

चांदन्या!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 23/07/2009 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
"निवेदन - "अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे" असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्‍या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्‍या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल." ******** आँ!!! ह्यी म्हनजे पंचाईतच हाये!!! काय हो? कसली पंचाईत? आरंच्चा!! कोन हो तुमी? काय वळख नाय देख नाय आनी लागले सवाल-जबाब कराया!!! काय रामराम वगैरे करायला येतं का न्हाय? हो, हो, चुकलं!

मी एन आर आय कसा?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 23/07/2009 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
राहून राहून वाटतं मी एन आर आय कसा? माझा देह जरी इथे माझं मन राही तिथे माझं घर माझ्या देशा मी बोलतो तीच भाषा त्यांची माझी गाणी एक पावसामधले पाणी एक माझ्या पगाराचं चलन वेगळं म्हणुन का केवळ असा उसासा? ज्ञानार्जनाची हौस म्हणुन गाव सोडून आलो शहरात अर्थार्जनाची गरज म्हणुन देश सोडून परदेशात एक संक्रमण चालतं तर दुसर्‍यालाच विरोध कसा? रोज घरच्या बातम्या वाचतो मतदानात भाग घेतो हुषारीची कदर करतो यथाशक्ति मदत करतो भ्रष्टाचरणी चिडून उठतो प्रतिकार करतो जमेल तसा तरीही मी परका कसा? माझ्या देशप्रेमाची का कुणी वांझोटी शंका घ्यावी माझ्या निष्ठेला, मायेला आणि का कुणी आव्हानं द्यावी? कुणी सहज करावा अपम

(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 23/07/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, (चाणाक्ष वाचकांना या विडंबनामागची प्रेरणा कळली असेलच.) आपल्याला एखादं गाणं का आवडतं? तीन साधारण उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ हे सगळंच आपलं डोकं हलवून जातं. गाण्यांमधे बोली भाषेचा उपयोग मला नेहेमीच आवडत आला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा, तोच तोच राग आणि त्याच त्याच सुरावटी वापरलेली गाणी रेडीओवर लागतच असतात आणि अचानक मधेच एकदम त्यासगळ्याच्या विपरीत एखादं गाणं लागतं.

कधी एके काळी..

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 23/07/2009 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
============================= कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे.. मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे ! कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे ! असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे ! कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे.. असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे ! कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे, कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे.. कधी एवढा काळ भांडायचो की
काव्यरस

अनुवाद

लेखक लक्ष्मणसुत यांनी गुरुवार, 23/07/2009 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण नेहमीच 'Photo' या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद करताना 'छायाचित्र' असा शब्दप्रयोग करतो. परंतु 'Photo' घेण्यासाठी (काढण्यासाठी) प्रकाशाचा वापर होतो. म्हणजे प्रकाशच नसेल तर 'Foto' काढताच येणार नाही. मग 'Photo'चा मराठी अनुवाद करताना 'प्रकाशचित्र' असाच व्हायला पाहिजे, असे माझे मत आहे. यावर जरूर विचार व्हावा.