Skip to main content

झडती

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 26/07/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्‍यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो. १९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती.

४६१-२७-४

लेखक विकास यांनी रविवार, 26/07/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या शिर्षकावरून गोंधळायला झाले असेल तर उत्तर सोपे आहे: २६ नोव्हेंबरच्या हल्ल्या नंतर सरकारीपातळीवर किती तडकाफडकी हालचाली होवून दहशात विरोधी यंत्रणेत सुधारणा झाल्या आहेत हे उच्च न्यायालयापुढील जनहीतयाचिकेला दिलेल्या अधिकृत उत्तरामुळे बाहेर आले. (सकाळ अग्रलेख) आजच आठ महीने पुर्ण होत असलेल्या या घटनेनंतर सरकारने सांगितल्याप्रमाणे एकूण दहशतवादीविरोधी पथकात अधिकारी ४६१, बुलेटप्रुफ जॅकेट्स - २७ आणि हेल्मेट्स - ४. कारण? मा.

संगीत महर्षीने निरोप घेतला!

लेखक नीधप यांनी रविवार, 26/07/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक चित्रपट, बहुतेक सर्व भारतीय भाषांमधली नाटकांना संगीत देणार्‍या भास्कर चंदावरकर यांचे काल रात्री दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली. जगभरातले संगीत त्यांना माहीत होते. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबर पाश्चिमात्या शास्त्रीय संगीतावरही त्यांची उत्तम पकड होती. चित्रपट संगीताचे मर्म त्यांच्याइतके क्वचित कुणाला कळत असेल. खूप वाईट वाटतंय त्यामुळे नीट काही लिहीता येत नाहीये. भास्करजींकडून वेळोवेळी जे शिकायला मिळालं ते अतिशय मोठं आणि महत्वाचं आहे.

भाकरी फिरवणे... साहेबांच्या पक्षाची , टीम इंडियाची व युवराजांच्या लग्नाची...

लेखक बामनाचं पोर यांनी रविवार, 26/07/2009 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही मिटींगचा विषय :- भाकरी फिरवणे .. फक्त संर्दभ वेगवेगळा आहे.. ;) --------- १) ठिकाण:- प. महाराष्ट्रातला साखर कारखाना... निमंत्रित:- पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य.. उगाच वाद नको म्हणून साहेबांची एकट्यांची जागा स्टेजवर .. बाकी सगळे समोर .. साहेबांनी एक उस खाली आपटून दोन तुकडे केले..अन म्हणाले " ह्म.. करा सुरवात.. " सगळ्यानी एकदम कल्ला सुरु केला. " आरक्षणाच्या आंदोलना मुळे २-३ जागा हातच्या गेल्या.. एव्ह्ढ ताणून धरायची काय गरज होती.. " " काय म्हणालात .. समाजाने गठ्ठा मतदान केल. म्हणून ८ तरी जागा आल्या.. आरक्षणाच्या नावाने बोलायच काम नाही.

मृत्यु, जीवन अन निसर्ग!

लेखक Nile यांनी रविवार, 26/07/2009 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला कळतं ते नैसर्गिक अन जे नही कळत ते अनैसर्गिक असं कीती सहजपणे आपण समजुन जातो ना? पण कधी कधी 'निसर्ग' अशा काही करामती करुन जातो की मग तो आपल्याकरता फक्त निसर्ग राहतं नाही! जन्म आणि मृत्युने मानवाच्या संशोधक वृत्तीला नेहमीच आव्हान दिलं आहे, आज क्लोनींगमुळे माणुस जन्मदात्याच्या बराच जवळ जाउन पोहोचला आहे, पण अजुन मृत्यु मात्र फारच दुर आहे. पण जन्मतः साक्षात मृत्युने दिलेल्या जीवनदानाला काय म्हणाल? हा विडीओ पहा अन तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. :) आणि आता, मृत्युच्या अक्षरशः दाढेतुन सही सलामत परत येण्याला काय म्हणाल?

मी मिपाकर कसा?

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 26/07/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
राहून राहून वाटतं मी मिपाकर कसा? माझी प्रोफाईल जरी इथे माझं लेखन होई तिथे माझा जीव माझ्या ब्लॉगात मी बोलतो तिथे पद्यात चारोळ्यांची थप्पी एक आणि हायकूही अनेक माझ्या लिहिण्याची इश्टाईल वेगळी म्हणुन का केवळ असा उसासा? प्रतिसादार्जनाची हौस म्हणुन आलो एकदाचा मिसळपावात खवचटपणाची हौस म्हणून डोकावेन इतरांच्या खरडवह्यांत एक प्रतिसाद चालतात तर आवांतरालाच विरोध कसा? रोज खादाडीचे पदार्थ पाहतो घरात ते करण्याची फरमाइश करतो कथ्याकूटात रममाण होतो यथाशक्ति भाग घेतो मधुनच इतर संकेतस्थळं पाहतो येतो फिरून कसाबसा तरीही मी मिपाकर कसा? माझ्या खाद्यप्रेमाची का कुणी वांझोटी शंका घ्यावी माझ्या खाद्यनिष्ठेला, मायेला

चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 25/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात.

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

हागणदारीमुक्त गाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शनिवार, 25/07/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने नवीन नियम काढला हाय, आत उघड्यावर बसायचे नाय, सगळ्यानी शौचालय बांधायचे , आण गाव हागणदारीमुक्त करायचे. उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय, कधी कधी तर एका दगडातच काम भागतय, मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय, तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात, ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात , कारण गावातली हागणदारी मुक्त नाय, तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय. गावातली माणसं पण लय हुशार असत्यात, पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात, पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात, आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात. आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली, हा

जीवती

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 25/07/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
दादर स्टेशन. बाहेरची एक गाडी आली आहे. दुसरी सुटणार आहे. टॅक्सी वाल्यांचा गराडा. हा बहुतेक माझ्या पावलावरून नेणार टायर. मी मागे होतो. हा बहुतेक चिरडणार मला. मी उडी मारतो. पायातला एक बूट मागे पडला. अरेच्चा अंधार फारच आहे. बूट मिळाला. पायात घातला. पण अंधार का बरं एव्हढा ? दादर स्टेशनवर लाईट कमी आहे. रांगेत उभा राहीलो. तिकीट काढायचं आहे.तुडंब गर्दी . लोकलनी जाण शक्य नाही.महालक्ष्मीनी जावं हे बरं. आतापर्यंत पावसात भिजलो होतो. आता रांगेत उभं राहील्यावर उकडायला लागलं आहे. समोर एक जोडपं उभं आहे. बाईच्या कडेवर लहान मूल आहे. खास आईबाबांनी घ्यायची पिशवी आहे.