तोय / डाळींतोय - तूर डाळीचा एक सोपा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार
प्रेरणा
तूर डाळीचा हा सोपा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार कोंकण किनारपटीवर, विशेषतः गोवा-कारवारकडे वरचेवर केला जातो. ही पातळच केली जात असल्यामुळे तूर डाळ कमी असली तरी चालते!
साहित्य -
तूर डाळ
तूप
मोहरी
हिंग
सुक्या मिरच्या
मीठ
कढीपत्ता (वैकल्पिक)
कृती -
१) तूर डाळ शिजवून घ्यावी. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे (तोय म्हणजे पाणी!)
२) तुपावर हिंग, मोहरी आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून डाळीला द्यावी.
३) चवीप्रमाणे मीठ घालावे.
टीपा -
१) फोडणी ही तुपावरच करावी.
मिसळपाव