Skip to main content

संत्र्याचा मुरांबा (Orange Marmalade)

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 02/09/2009 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही (foodnetwork) बघता बघता मिळालेली पाकृ....रंग फारच सुंदर येतो या मुरांब्याचा... साहित्यः ४ मोठी संत्री (मी अमेरिकन नेवल ऑरेंजेस घेतली होती.), मार्मालेडसाठी संत्री आणि लिंबु सालासकटच घ्यावीत, जर सालांचा कडवटपणा नसेल आवडत तर संत्री हलक्या हाताने वरवरचा नारंगी भाग बारिक किसणीने किसुन घ्या, पांढरा भाग घेऊ नये, तोच भाग जास्त कडवट असतो, मग तीच संत्री सोलुन वापरा आणि किसलेली नारंगी साल ही वापरा.पण सालींची चवही छान येते. २ लिंबं अडिच-तीन कप साखर(गोड जसं हवं तशी कमी-जास्त घालु शकता.) अडिच कप

प्रियसख्याचा (वळका बघु कोण? ) चाळिसावा वाढदिवस !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/09/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट किंवा ज्याला आपण आंतरजाल असेही म्हणतो त्याने आज आपल्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केले. आज आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक होवुन गेलेल्या आंतरजालाला चाळिसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मुळ बातमी इथे पाहा... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4960741.cms विशाल.

रत्नांग्री

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 02/09/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळींना रामराम, काही कारणाने पूढचा आठवडा रत्नांग्रीस जाण्याचे होत आहे, तरी रत्नांग्रीमधील प्रसिध्द \ अप्रसिध्द खवैय्येगिरीची ठिकाणे त्यांच्या वैशिष्ट्यासह देऊन पोटापाण्याची सोय लावण्यास मदत करा. रत्नांग्रीसह संगमेश्वर, चिपळुण इथली माहिती सुध्दा स्वागतार्ह.. सर्व प्रकार आनंदाने खाणारा हर्षद आनंदी :W :W :W :W :W :W :W :W मासे नि मिसळ पेश्शल हाय काय?

(भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 02/09/2009 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या धंद्याबद्दल बेसीक शंका विचारायची होती. ति कुठे विचारावी असा प्रश्न मला पडला होता. माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने हा धागा दाखवला व माझा हुरूप वाढून धंद्याची लाज न बाळगता हा धागा काढला. भादव्याच्या महिन्यात घरगुती पित्रांच्या निमीत्ताने जेवणाची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी! नंतर भादवा संपल्यावर कोणत्या देवळापुढे बसावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 02/09/2009 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज मला एक फोन आला. तुम्ही आपल्या नाडीग्रंथावरील लेखनाच्या एका भागात अंनिसला सर्कस म्हणून हिणवले आहेत. ती नुसती झलक आहे असेही म्हणता मग त्या पुर्ण पत्राची मांडणी का करत नाही? आपण कोण बोलताय? हे समजून घेईपर्यंत फोन कट झाला किंवा केला गेला. नाडी ग्रंथावरील माझे काही विचार मिपावर या आधी आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ते पत्र पाठवावे असे वाटून ते संपुर्ण पत्र खाली देत आहे.

म्हाळसाक्का..(कथा)

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 01/09/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का!! (डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.) रखरखीत सूर्य किरणांनी चेहर्‍याची त्वचा तापवून काढली तशी भालबा ला शुद्ध आली. डोळे हलके हकले उघडत त्याने मान वर उचलायचा प्रयत्न केला.. पण त्याला तेही शक्य झालं नाही. पुन्हा तसाच तो काही वेळ पडून राहिला. मग पुन्हा थोडासा जोर देऊन, ठणकणार्‍या अंगाकडे दुर्लक्ष करून तो उठून बसला. सभोवार एक नजर टाकली. रखरखीत उन, आणि उजाड परिसर!! लांब डोंगरावर काही शेळ्या चरताना दिसत होत्या.. "काय खात असतील त्या?

मन इंद्रधनू

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/09/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/09/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको." फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला.समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून खोल्या बनवतात.बाहेर उन खूप असलं तरी झोपडीच्या आत एकदम थंड वाटतं. झोपडीच्या आजूबाजूला बांबूंची तिरकांडी उभी करून एकपदरी सुंभाच्या दोर्‍या बांधून पिळाच्या चिमटीत बांगडे,तारल्या किंवा कोलंबी अडकवून

क्विक गन मुरूगन -माईंड ईट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 01/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्विक गन मुरूगन हा एक ईंडियन काऊबॉय असतो ज्याचा जिवनाचा उद्देश हा गाईंना वाचवण्याचा असतो. क्विक गन मुरूगन ची लॉकेट लव्हर ही गेल्या जन्मीची प्रेयसी असते. राईसप्लेट रेड्डी हा गाईंना मारून त्यांना डोशात घालून सगळे व्हेज हॉटेल नॉन व्हेज करण्याचा त्याचा डाव असतो. क्विक गन मुरूगनला राईसप्लेट रेड्डी मारतो. मुरूगन स्वर्गात जातो. चित्रगुप्ताकडे तो गाईंना वाचवण्यासाठी पुन्हा प्रूत्थीवर जाण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन करतो. तो नंतर परत मुबंईला येतो. राईसप्लेट रेड्डी ईकडे डोसा बनवण्यासाठी मॅक डोसा नावाची कंपनी टाकतो. त्यात डोशाची आर अँन्ड डी स्थापन करून सायंटीस्ट लोकांना नोकरीला ठेवतो.