“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र
मित्र हो,
आज मला एक फोन आला. तुम्ही आपल्या नाडीग्रंथावरील लेखनाच्या एका भागात अंनिसला सर्कस म्हणून हिणवले आहेत. ती नुसती झलक आहे असेही म्हणता मग त्या पुर्ण पत्राची मांडणी का करत नाही? आपण कोण बोलताय? हे समजून घेईपर्यंत फोन कट झाला किंवा केला गेला.
नाडी ग्रंथावरील माझे काही विचार मिपावर या आधी आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ते पत्र पाठवावे असे वाटून ते संपुर्ण पत्र खाली देत आहे. आशा आहे की मिपाकार फोन करणाऱ्या वाचकाच्या विनंतीचा मान राखून ते प्रकाशित करायला व मनमोकळेपणाने अंनिसचे अतरंग पहायला परवानगी देतील.
परिशिष्ट क्रमांक 4-14 बोध अंधश्रद्धेचा पान 180
“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र
डॉ. नरेंद्र दाभोळकरांना, तांबरम, दि. 25 -11-1995
स.न.वि.वि.
दि. 21-11 चे आपल्या हस्ताक्षरातील, साध्या लेटर पॅडवरील कागदाचे - बॉन्डपेपरवर नव्हे- पत्र मिळाले. असे पुर्वी दिसून आले आहे की, आपलेय पत्रातील शेवटची ओळ मला जास्त लिहायला प्रवृत्त करते. त्या पत्रातील शेवटची ओळ की ... ‘सत्य तपासण्याच्या रिंगणात यावे ही विनंती’…. अशीच स्फूर्ती देऊन गेली.
असे वाटले की, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ही एक सर्कस आहे. त्यात विविध तऱ्हेचे अंधश्रद्धेच्या विरुद्ध खेळ खेळले जातात व सभोवताली जमलेल्यांचे त्याद्वारे मनोरंजन केले जाते. अर्थातच अंनिससर्कस मधील खेळाडू विविध (मखलाशीपूर्ण) कसरती करण्यता तरबेज असतात. नंतर हुकमी टाळ्या मिळवण्याच्या तंत्रात अत्यंत प्रवीण असतात.
सर्कसचे सर्वात मोठे आकर्षण हे त्यांचा ‘जनावरखाना’ असून त्यांना रिंगणात आणून हातातील जबरदस्त आसूडाद्वारे सर्व हिंस्त्र व क्रूर श्वापदांना आपल्या हुकुमावर नाचवायचे जोखमीचे व दिमाखाचे काम त्या सर्कसचा कार्यवाह – “रिंगमास्टर” करतो. या रोलमधे आपण स्वतः रिंगणात हजेरी लावता व आसूडाच्या व काठीच्या दरडावणीने अवघड व जीवघेण्या कवायती लीलया करवून टाळ्या मिळवता. आत्ता पर्यंतचा हा आपला अनुभव असल्याने आणि आपणच या सर्कसचे रिंमास्टर असल्याने, ‘माझा रिंगणात या, मग मी तुम्हाला कसे लोळवतो ते पहा’ असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीयपायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार होण्यास सोईचा आहे.
तथापि ‘नाडी भविष्य’ हा काही तुमच्या पिंजऱ्यात बाळगलेला सिंह नाही. त्यामुळे त्याने ‘गपगुमान’ तुम्ही रचलेल्या रिंगणात यावे व चुपचाप तुमच्या तालावर नाचावे असे स्वप्न बाळगून असाल तर ती आपली घोर चूक आहे.
या इथे ‘नाडी भविष्यकर्ते महर्षी’ हे “रिंगमास्टर” आहेत. भविष्याच्या आसूडाला तो ‘थोतांड’ म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात. वर्तमानपत्रातून परिपत्रके व लेख लिहून व मला मधे घालून, ‘पहा या रिंग मास्टरची कशी ऐशी की तैशी करतो. नाहीतर 5 लाख देतो’ असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी करता. या सर्व परिस्थिती मी रिंगणात कसा? नाडीकेंद्रे जेथे आहेत तेथे कूटलिपी वाचणारे उपलब्ध आहेत. अशा विविध केंद्रांना भेटून एकच पट्टी विविध नाडीवाचकांनाकडून वाचवून घेऊन त्यातील मजकुरातील सत्यता, अर्थवत्तता अचूक व तात्काळ काढता येते. हे आपणांस चांगलेच ठाऊक आहे. एरव्ही मीच रिंग मास्टर, माझीच सर्कस, माझेच रिंगण आणि माझेच टाळ्या पिटू प्रेक्षक याच कूपात राहून मग शास्त्रीय संशोधनाचे नाटक कशाला?
याचे साधे कारण हे की नाडी केंद्रास भेट देण्यास यायचे नाही व अंनिसचे तोंडकाळे करून घ्यायचे नाही. आपल्या अंनिस सर्कसचे चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरतपटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षांत आला आहे. वर्तमानपत्रवाले एकजात आपल्या विविध क्लुप्त्यांना आपल्या मागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात, मात्र तोंडावर व वर्तमानपत्रातून नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही.
आपण माझ्या लांबलचक पत्रे पाठवण्याची टिंगल करता पण आपल्या पत्रातील पोकळ व खोटारड्या मुद्यांची खबर घेणे क्रमप्राप्त होते. असो, आता आपल्या 21-11 च्या पत्रातील मुद्यांकडे वळतो.
मुद्दा क्रमांक 3 मध्ये आपल्या ... ‘भाषा कूट तमिळी जाहीर करून आमच्या प्रतिपादनालाच पुर्ण बळकटी मिळते’ हे आपल्या लक्षात येत असेलच... या विधानाला मी फार महत्वाचे मानतो. या वाक्यावरून 30-9 (1995) च्या सभेत उपस्थित 3 तमिळांनी नाडीपट्यातील भाषा तमिळच आहे या पुराव्याला आपण मान्य केले आहे हे सिद्ध होते. कारण ज्या डॉ. नारळीकरांनी नाडीपट्ट्यातील भाषा (देखील) तमिळ नाही असे म्हणून नाडीभविष्याला Hoax असा शिक्कामोर्तब केले ते विधान खोटे होते हे सिद्ध होते. हे सिद्ध झाले. असे आपण मानता असे म्हणावे लागेल. ज्या नारळीकरांच्या दोन निष्कर्षांवर अवलंबून आपणही नाडीभविष्याला फसवाफसवी वा थोतांड मानता त्यातील They could not ( a) read the script as Tamil- हे विधान त्यांनी परत घ्यावे असे आपण त्यांना आवाहन करावे. उरला प्रश्न त्या पट्टीतील मजकूराचा की ज्यात आपल्याला फोटोत शशिकांत असा मजकूर आहे असे मी किंवा नाडीवाचक म्हणतात त्याची खात्री करणे. अशी खात्री करण्याची वेळ आलीच तर, ‘ओरिजनल पट्टया-पुरावा पहायला दि. 2-4च्या पत्राप्रमाणे येण्याचे आपण मान्य केले होते. दि. 9-5च्या पत्रात “माहिती अचुक निघाल्यावर तमिळनाडूला येऊन पट्ट्या तपासणे (करावे लागेल)”.... असे मान्य केले आहेत. मात्र आपण पाठवत असलेल्या ठशांच्या संदर्भात नाडीपट्यांची माहिती-फोटो पाठवण्याचे मी कधीच मान्य केलेले नाही. तरीही एका उपलब्ध नाडीपट्टीचा फोटो व त्यातील मजकूराचे रोमन स्क्रीप्ट व इंग्रजी अर्थ आपणांस पाठवला होता. आता तो मजकूर तमिळमधलाच असूनही खुद्द तमिळनाडूतील तमिळांना वाचता येत नसताना (पुण्यातील तमिळांनी तर तसे लेखी दिल्याने) आता येथे न येण्याचे एकही कारण आपणांस राहत नाही. उलट मुद्दा क्रमांक 1 मधे ... “आमचा प्रतिनिधी मद्रासला येणे पूर्ण गौण आहे”... असे निर्लज्ज विधान करून विलंब का? असा जाब मलाच जाब विचारता? खरेतर हा विलंब का असे विचारण्याची हक्क माझा आहे.
‘नाडी भविष्य’ हा चमत्कार आहे याची आपणांस संपुर्णतः खात्री झालेली आहे. त्यामुळे आता कसेही करून पळवाट काढून नाडीकेंद्रांस भेट देण्याचे टाळण्याचे तंत्र वापरायला कितीही खालच्या थराला जावे लागले तरी चालेल असा आपला पवित्रा आहे. यासाठी नाडीपट्यात माहिती आपणांकडून काढून ती परत सांगितली जाते हे कारण (आपण)पुढे करता. मग असे शेकडो वर्षे लाखो लोकांच्या संदर्भात होत असूनही आत्तापर्यंत कोणीही या फसवणूकीची पोलिस केस का केलेली नाही? Alive या मासिकाच्या किरकोळ स्तंभावरील एक कात्रण व कोवूर यांचा अंदाज हेच जर आपले याबाबतचे पुरावे असतील तर त्यांचा सच्चेपणा आपणांस ताडून पहायला नको का? 30-9 च्या सभेत डॉ. बोरकरासह सर्व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नाडीकेंद्रास भेट देण्यास येणे अत्यंत आवश्यक आहे व ठसे पाठवून ओकांवर हे काम सोपवण्याचे धोरण मुळातच चुकीचे आहे असे मान्य केले आहे. आता माझ्या नाही तरी निदान आपल्याच कार्यकर्त्यांचा मान नको का राखायला? आपल्याच साथिदारांची आपण किती वेळ प्रतारणा करणार? त्यांच्यातील काहींनी येथे येऊन तपासणीकरून चमत्कार असल्याचे मान्य केले तर त्यांना काय आपण समितीतून काढणार?
मुद्दा क्रमांक 2 कडे आता आता वळतो.
शनिवार दि. 30-9(1995) ची साप्ताहिक (बैठक?) सभा ‘मामुली’ होती असा टोन ध्वनित करून, पत्रकार परिषद घेणे व वर्तमानपत्रात बातमी छापवून आणि त्यावरही या सभेला आपण गौण महत्व दिलेत. मात्र बरेच पत्रकार व उपस्थित श्रोत्यांना आपल्या उपस्थितीची खात्री होती. अशा वातावरणांत आपली अनुपस्थिती असभ्यतेचे लक्षण होते. या उलट मी या सभेला एक प्रेक्षक म्हणून आवर्जून उपस्थित होतो. सभेचे कामकाज सुरु झाल्यावर मग डॉ. बोरकरांशी ओळख करून नाडी भविष्य या पुस्तकाचा लेखक म्हणून मी त्यांच्या सर्वसंमतीने भाषणास सुरवात केली. मात्र सभेच्या मुख्यकार्याला त्यामुळे मुळीच बाधा आली ऩाही. उलट श्रोत्यांना या सभेच्या व उपस्थित पुणेरी तमिळांनी त्या फोटोवाचन करण्यामागचा महत्वाचा उद्देश व पुर्व पीठिका सर्व विदित झाली. आपल्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या व श्रोत्यांच्यावतीने डॉ. बोरकरांनी माझे आभार मानून धन्यवाद दिले. आपण मात्र मी सभेत ‘घुसलो’ असा मनघडंत आरोप केलात. यावरून आपली मानसिक स्थिती बरीच खालावलेली वाटते. पत्र लिहिताना जरी ‘थोडे हसू व बरीच कीव’ आली असली तरी माझ्या त्यासभेतील भाषणाने व पुणेरी तमिळांनी पट्टयातील भाषा तमिळच असल्याचा लेखी पुरावा सादर केल्याने आपला बराच तिळपापड झाला हे त्या एका शब्दाने चांगलेच लक्षात येते.
आपण स्वतः हजर न राहण्याचा ‘पळपुटेपणा’ केला असताना तुमच्या अपरोक्ष मी सभेत ‘वाद घालायला गेलो’ हा (ओकांचा) पळपुटेपणा म्हणण्याचा साळसूदपणा आपली बुद्धी चक्रम झाल्याचे द्योतक आहे. असे दुःखाने म्हणावे लागते.
By the way, पुर्वीच्या 27-7(1995)च्या पत्रात व 16-7च्या पुढारीमधील लेखात रेडिओ कार्बन टेस्टबद्दल मला ‘आपण अगदीच कसे विसरलात?’ असा प्रश्नार्थी टोमणा मारता आहेत. मी Mr. Marvin Mills यांना पाठवलेले पत्र (कॉपी) आपणांस मिळाले असेलच. आता आपण आपल्या माहितीच्या संस्थांचे पत्ते व त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी मला ते पत्ते पाठवण्याचे अगदीच कसे विसरलात? मात्र यासाठी होणाऱ्या टेस्टसाठी नाडीपट्ट्यांचे प्रूफ घेण्यास आपण स्वतःजातीने हजर असलेच पाहिजेत. कारण त्याशिवाय कार्बन 14टेस्टचा निकाल काहीही लागला तरी तो अमान्य करण्याची मखलशी आपण लीलया करू शकता.
तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल.
आपला स्नेहाभिलाषि,
शशिकांत ओक
वाचने
10746
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
कोणी केला
In reply to कोणी केला by भडकमकर मास्तर
हो ना...
In reply to हो ना... by बिपिन कार्यकर्ते
तरी ... तरी
In reply to तरी ... तरी by टारझन
डब्ल्यू.पी.टी.ए.
In reply to कोणी केला by भडकमकर मास्तर
रिंगमास्टर, आसूड, कवायत, सिंह, सर्कस
आई ग! १९९५
काय म्हणावं ह्याला जिद्द की हटवादीपणा?
In reply to काय म्हणावं ह्याला जिद्द की हटवादीपणा? by चतुरंग
नाडीवाद *
In reply to नाडीवाद * by दशानन
विल्यॅष्टीक
In reply to काय म्हणावं ह्याला जिद्द की हटवादीपणा? by चतुरंग
काहीही म्हणा
सहमत
सोयीस्कर
In reply to सोयीस्कर by विजुभाऊ
विजुभाउंशी सहमत
In reply to सोयीस्कर by विजुभाऊ
ज्योतिषाच
In reply to ज्योतिषाच by युयुत्सु
खरय
In reply to खरय by प्रकाश घाटपांडे
सामाजिक
In reply to ज्योतिषाच by युयुत्सु
१ला प्रकार
In reply to ज्योतिषाच by युयुत्सु
ज्योतिषाच
In reply to सोयीस्कर by विजुभाऊ
सहमत
In reply to सोयीस्कर by विजुभाऊ
आव्हान कोण देतो? अंनिस! मग हे सर्व निस्तरण्याचे काम अंनिसचे नाह
नाडी
अनिस
हिन्दु
आव्हान कोण देतो? अंनिस! मग सर्व निस्तरण्याचे काम अंनिसचे नाही?
ओक साहेब
अहो