Skip to main content

The Anatomy of Hope

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 03/09/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी जेरी ग्रुपमान या डॉक्टरने लिहिलेले The Anatomy of Hope हे पुस्तक वाचत आहे. वाचत आहे अशासाठी म्हटले कारण पुस्तक अजुन वाचून संपवता आले नाही. सुरुवातीची प्रकरणे वाचताना आधुनिक वैद्यकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली म्हणुन मी त्यातील The biology of hope या प्रकरणावर उडी मारली. या प्रकरणात मानवी आशेची चिरफाड करताना डॉ.

मिरजेत अफजलखानावरून दंगल

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 03/09/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मिरजेत गणपतीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर अफझलखान वधाचा प्रसंग दाखवणारी कमान बनवल्यामुळे समाजातील एक गट दुखावला (ओळखा पाहू कुठला गट असेल तो?) आणि मग दंगल, जाळपोळ, अश्रूधूर, कर्फ्यू वगैरे कार्यक्रम झाले. इथे बातमी वाचायला मिळेल. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4965639.cms मला वाटते की महाराष्ट्रात रहाणार्‍या मुस्लिम लोकांनी अफझलखानाला खलनायक मानले पाहिजे. हा देश शिवाजीला हिरो मानणार्‍यांचा आहे तसा अफझलखानाला हिरो मानणार्‍याचाही आहे असे सेक्युलर लोक म्हणतील पण ते मला पटत नाही. तुमचे काय मत?

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 03/09/2009 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.

चुलीवरचं तंदूरी चिकन

लेखक प्रभो यांनी बुधवार, 02/09/2009 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे चिकन आम्ही ईंजिनियरींग तिसर्‍या वर्षाला असताना रायगडी गेलो होतो (DEC २००४) तेंव्हा केले होते.. रायगडावर स्वता: चिकन बनवायचे , ते पण तंदूर म्हणून एका सायकल च्या दुकानातून २०-२५ नविन स्पोकस घेऊन गेलो होतो आम्ही. तर असचं आम्ही एका पहाटे चिंचवड हून निघालो रायगडला ३ दुचाक्यांवर ६ जण. रस्त्यात मुळशी आणी ताम्हिणी घाटात थोडा टाईमपास केला.आणी साधारण १०-१०.३० च्या सुमारास महाडला पोचलो. तिथे एका मटण दुकानात ३ जिवंत कोंबड्या विकत घेतल्या. त्याच दुकानदाराकडून उद्या परत करण्याच्या बोलीवर त्याचीच हलाल करायची सुरी घेतली.

सूर्य नमस्कार

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 02/09/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य नमस्कारांचे शारीरिक तसेच मानसिक फायदे काय आहेत? विशेषतः १२ सूर्य नमस्कार घातल्यास अंदाजे किती कॅलरीज वापरल्या जातात ह्याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे का? नसल्यास, त्या दृष्टीने प्रयत्न करणे शक्य आहे का? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

माझं कुमामोतो

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 02/09/2009 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी जिथे रहाते ते कुमामोतो शहर, माझं याबे गाव आहे तरी कसं? ते पहायचं असं कित्तीतरी दिवस वाटत होतं. पण "आज जाऊ, उद्या जाऊ" असं करता करता चक्क दोन वर्ष उलटून गेली. आणि मग ह्यावर्षी आईबाबांबरोबर त्यांची दुभाषी म्हणून जायचा योग आला. आणि मी कुमामोतोच्या प्रेमात पडले. का? त्याचं हे (प्रकाश)चित्रमय उत्तर... माऊंट आसो...ऊर्फ आसोसान हा अगदी माझ्या "बगल मे" म्हणावा तसा. घरापासून गाडीने फक्त चाळीस मिनिटांवर. जपानमधला सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी. खरं म्हणजे हे चार पर्वत. पण ह्यातला एकच जिवंत आहे. (नशीब!) ह्याचं सहाशे मीटर रुंदीचं मुख पाहिलं की आपलं मुख उघडं पडतं.

श्याम जोशींनी आर. के. लक्षमण यांना दिलेली दाद

लेखक नितीनमहाजन यांनी बुधवार, 02/09/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही दिवसांपूर्वी अदितीताईंनी Common Man व R. K. Laxman यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी एका व्यंगचित्राची आठवण सांगितली होती. R. K. Laxman यांना Raman Magasese पुरस्कार मिळाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म. टा. मध्ये प्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी R. K. Laxman यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. ते मी नुकतेच scan करून सर्वांसाठी येथे डकवित आहे. जर copy right चा प्रश्न उपस्थित होत असेल तर संपादकांनी हे चित्र खुशाल काढून टाकावे. Common Man & R. K.

आपण खोटे बोलता का?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 02/09/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपण खोटे बोलता का? ...... हं हं थांबा मंडळी अस बुचकाळ्यात पडु नका अहो हा एक साधा सोपा प्रश्न आहे हो आपण खोटे बोलता का ? अहो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी खोट बोलत असते जिथे देवादिकांना खोट्याचा आधार घ्यावा लागला तिकडे आपल्या सारख्या मर्त्यमानवाची काय व्यथा.