Skip to main content

अवतार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 23/09/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक वृद्धाश्रम. वृद्धाश्रम पेक्षा ३स्टार हॉटेल अथवा सॅनिटोरीयम. पैसा ठेवायला जागा नसलेल्या,अल्शेशियन,डालमेशन वगैरे साठी जागा असलेल्या, मात्र वृद्ध पालकांसाठी जागा नसलेल्या शिरीमंतानी बांधलेले. चकचकीत रिसेप्शन च्या मागे एक मोठा फोटो. निरखुन बघत होतो मी. एरवी अशा ठीकाणी मिळतात त्यापेक्षा वेगळा, मद्दड न दिसणारा मॅनेजर. माझ्या निरखण्याला रोखुन बघणारा. "काय, बघताहात हो साहेब त्या फोटोकडे, काय एवढे विषेश आहे त्यात? तुम्हाला देणगीदाराच्या तोंडावर विष्णुअवतार दिसतोय का हो? अगदी मागच्या तेजोमय चक्रासकट. मॅनेजर हसला. "सगळेच नसतात हो तसे. काही अपवाद पण असतात की.

मीनाकुमारी

लेखक सहज यांनी बुधवार, 23/09/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कपाळावरून घाम निथळत होता, मिटल्या डोळ्यांची गरगर वाढली होती. श्वासाची लय बिघडली होती. धडपडून मीना जागी झाली. कालपासून तिचे मन तसे सैरभैर होतेच पण उशाशी कोणीतरी बसून डोक्यावरुन हात फिरवत, "चल, बाळ घरी ये, सगळे जमलेत बघ" असे म्हणत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण डोळे चिकटले आहेत व नीट काही बघताही येत नाही असा, भास व सत्याच्या मधला अनुभव तिला अतिशय संभ्रमित करुन गेला. आता झोपणं शक्यच नव्हतं म्हणून ती ऊठली आणि खोलीच्या बाहेर आली. हॉल मधे मालक-मालकीण टिव्ही बघत बसलेले होते. मालकीण बाईंनी घड्याळाकडे पहात विचारले, "काय ग? बरे नाही वाटत का, की अजून झोप येत नाहीये?

बेरीचे पराठे

लेखक Meghana यांनी बुधवार, 23/09/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खवय्यानो , झटपट व सोपे ह्या प्रकारातले हे पराठे. लहान मुलांसाठी पण पौष्टिक. साहित्य तूप काढून झालयावर उरलेली बेरी, कणीक, ओवा,मीठ व पाणी कृती बेरी मध्ये ओवा, कणीक व मीठ घालून चांगले एकत्र करावे. त्यात लागेल तेवढे पाणी घालून कणीक भिजवावी. पुरी प्रमाणे थोडी घटटसर असावी. १५-२० मिनिटे ठेवून मग त्याचे पराठे करावे. तव्यावर चांगले भाजून घ्यावे. खमंग लसूण चटणी सोबत खावे. ह्यात करता येण्या सारखी वेरीयेशन्स: कणीक भिजवताना त्यात, लालतिखट किंवा हिरवी मिरची वाटून (चवीप्रमाणे) कांदा किसून मग भिजवावी व पराठे करावे. फोटो काढलेला नसल्यामुळे इथे टाकता आला नाही.

भारताचे मित्र

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 23/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही दिवसांपासून एक विचार करतोय...... आपल्या भारताचे खरे मित्रदेश कोणते? अमेरिका? तिचं इथे नांव काढू नका!!!! जरा मिपाची मागली पानं चाळून पहा!!! पार ठाण्यापासून ते थेट जाकार्तापर्यंत अमेरिकेला जहाल शिव्या दिलेल्या आढळतील! एक सिंडी सोडली (म्हणजे तुम्ही सोडली आणि आम्ही धरली!!!) तर त्या अमेरिकेत आहेच काय? मग मरो! ती अमेरिका जावो **त! इंग्लंड आणि इतर पश्चिम युरोपीय देश? ते तर अमेरिकेचीच तळी उचलणार! लाचार साले!!!!! चीन आणि पाकिस्तान! ते तर आपले उघड उघड शत्रूच म्हणायचे!!! मग मला प्रश्न पडला की भारताचे खरेखुरे मित्र तरी कोणते? बांगलादेश? तो तर आपल्या देशात त्याचे नागरीक घुसवतोय..... नेपाळ?

आंतरिक शक्तीचा शोध

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 23/09/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरिक शक्तीचा शोध ७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या?

माझा झंपक पणा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/09/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते. सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले. स्वारगेटवर येऊन बस पकडली. बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले. सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता. काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/09/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.

मी मी मी

लेखक प्रभो यांनी बुधवार, 23/09/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार.....मस्त सुट्टीचा वार ..सकाळचे दहा-अकरावाजले होते. उनं उंडारायला चालू झाली होती. बेडरूमची खिडकी उघडीच राहिली होती बहुतेक काल रात्री. त्यातूनच उनाचे कवडसे मला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते. पडदाही फडफडत होता. हलकिशी हवा पडली होती. माझ्या कानाजवळचं गजराचं घड्याळही (तिच्यायचं ते घड्याळ...बारावी पास झलो नसतो तर ते पण नसतं मिळालं) टिक-टिक-टिक-टिक-टिक करून माझ्या साखरझोपेचं (सकाळी दहा-अकरा वाजता ????...आणी ही सकाळ होय???) खोबरं (ओलं का सुकं ..माहीत नाही बुआ) करण्याच्या प्रयत्नात होते. अचानक खनSSSSSन असा आवाज झाला. एका क्षणात झोप होत्याची नव्हती झाली.

आईस्क्रीम वडा

लेखक स्वाती राजेश यांनी मंगळवार, 22/09/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन मधे एका भारतीय हॉटेल मधे हा पदार्थ खायला मिळाला...http://misalpav.com/node/1291 इथे याअगोदर चर्चा झाली आहे....पण हा प्रकार जरा वेगळा वाटला म्हणून जरा ओळख काढून, ज्या शेफ ने हा बनवला त्याला गाठला आणि त्याच्या कडून रेसिपी मिळविली (जरा मिन्त्या कराव्या लागल्या :))..पण मिळाली....त्याची कृती सुद्धा वेगळी आहे...ती खालीलप्रमाणे.... फोटो दिला तर कोणीतरी गचकेल...म्हणून सर्वांच्या तब्येतीच्या काळजी मुळे हा निर्णय घेतला...