Skip to main content

दिवाळीचा आशावाद...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/10/2009 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी जशी अस्सल सोन्याची झळाळी दूर होवू दे संकटांची छाया काळी नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी पसरु दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी खुलू दे दु:खी मनांची कळी भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी आली प्रकाशमान दिवाळी आली प्रकाशमान दिवाळी
काव्यरस

ओबामा चे नोबल -काहि बातम्या आणि प्रतिक्रिया

लेखक विष्णुसूत यांनी रविवार, 11/10/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
ओबामा ला नोबल पुरस्कार मिळाला. ह्याचा उपयोग जगातिल अनेक जण करत आहेत. काहि बातम्या : १. अमेरीकेतील एक नामांकित विद्दापीठ " नोबल पुरस्कार जिंकण्याच्या क्लुप्त्या ( ट्रिक्स अ‍ॅन्ड टिप्स) असा कोर्स सुरु करणार आहे. २. भारतातील तीन विद्दार्थी "ओबामा यांना नोबल पुरस्कार मिळण्याची कारणे" ह्या विषया वर पि एच डि साठि शोध निबंध सादर करणार आहेत. ३. "झट पट नोबल" चे कोचींग क्लासेस मुंबईत सुरु झाले आहेत. (ईविंनीग बॅच, विकएन्ड बॅच ची हि सोय आहे) ४. नोबल पुरस्कार मिळवायचा १० (दहा) वर्षाचा अनुभव असलेले १५३ रेझुमे अमेरीकेती विविध कंपन्यां कडे भारतातील काहि कॅन्डिडेड्स , नी पाठवले आहेत. ५.

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज २००९

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 10/10/2009 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात येत्या तेरा तारखेला विधानसभेसाठी मतदान होतंय. प्रचार उद्या संपेल. आता मतदारापर्यंत कसं पोहचायचं तेवढाच प्रश्न शिल्लक उमेदवाराच्या मनात राह्यलाय. तन-मन-धन ही गोष्ट हायेच. २८८ जागांसाठी मतदान झाल्यानंतर मतमोजणी २२ तारखेला होणार. सत्तेच्या साठमारीत कोणाची सत्ता येईल. एवढाच एक उत्सुकतेचा प्रश्न राह्यलाय. प्रश्न, महागाई, जाहीरनामे,समस्या,जिथे असतात तिथेच असतात. मंत्र्याचा, आमदाराचा, विकास झाल्यावर थोडा फार जनतेचा विकास होतो नाय का ? आपला अंदाज असा हाये की, महाराष्ट्रात सत्ता पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची येईन.

म.टा.ची पत्रकारिता...?

लेखक मड्डम यांनी शनिवार, 10/10/2009 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्‍ट्र टाईम्‍स सारखे प्रतिष्‍ठीत वृत्तपत्रही चो-या-मा-यांवर चालते यावर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. खाली दिलेल्‍या दुव्‍यांवरून कदाचित ते तुम्हाला स्‍पष्‍टपणे जाणवेल. http://marathi.webdunia.com/newsworld/news/international/0910/10/109101… http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5109532.cms वेबदुनियाने ही बातमी सकाळी 9.30 च्‍या सुमारास टाकली आहे.

२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार

लेखक विष्णुसूत यांनी शनिवार, 10/10/2009 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार नामांकनः २००९ हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. कृपया आपण आपले नामांकन (स्वत: चे नामांकन करता येणार नाहि) सदर नमुन्यात सादर करावे: नाव : वर्गिकरण : (उदा. "शांतता","रसायन शास्त्र", "भौतिक शास्त्र", "समाज शास्त्र", इ. इ ) कारणः ( उदा. विशेष कार्य, लेख, इ. इ ) येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे. नामांकनाची अंतिम तारीख ओक्टोबर १५ ,२००९.

एका तळ्याची गोष्ट

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 10/10/2009 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं. अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला!

"सखी शेजारणी तू हंसत रहा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 10/10/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत.त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणि हे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं.ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायलामिळायचे.बरं वाटायचं.ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती. सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती.