Skip to main content

मैत्रीणे भरली पोकळी!

लेखक Bhakti यांनी रविवार, 01/08/2021 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते.

क्रेडीट कार्ड

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 31/07/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं. मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ८

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/07/2021 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध...

'तबर'चा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 31/07/2021 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला. रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या.

चादर ट्रेक - ३

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 30/07/2021 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
चादर ट्रेक २ कामाच्या ताणामुळे पुढील भाग देण्यासाठी खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही चालतच त्यांच्या ठरविलेल्या ठिकाणी पोहोचलो. चालता चालता गेल्या ६-८ महिन्यांचा काळ सर-सर डोळ्यासमोरून जात होता. ज्या परीक्षेसाठी आम्ही सगळे बरीच तय्यारी करत होतो कोणी सायकलिंग करून, कोणी व्यायाम योगा करून, कोणी नुसतेच जॉगिंग करून आपआपली शारीरिक क्षमता वाढवीत होते केवळ चादर ट्रेकसाठीच, त्याचीच आज परीक्षा होती.

स्मरण चांदणे१

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 30/07/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे १       दक्षिणेस पसरलेल्या छोट्या माळाच्या आड दडलेले गाव,म्हणून आडगाव.पाचवी पर्यंतचे शिक्षण गावी झाले. नंतरचे बीडला.त्या काळात,केव्हा सुट्टी मिळेल अन केव्हा गावी जाईन असे व्हायचे.शिक्षण संपून पुढे वकील,सरकारी वकील होतो तेव्हा ही ओढ कायमच होती.आई वडील गावी होते.तिथे आमचे घर होते.एकोणीसशे एकोण्णवदला वडील गेले. तिथले घर बंद झाले.बत्तीस वर्षे झाली.पण अजूनही गाव,तिथली देवळे ,उत्सव,जत्रा,माणसे अन ते दिवस,आठवतात. तिथल्या देवळांशी जोडलेले सण,उत्सव ,जत्रा आठवतात.

क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/07/2021 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो. कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता. कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे. या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले. यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.

मसुर पुलाव

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 29/07/2021 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मसुर पुलाव साहित्य (चार जणांसाठी) :- दोन वाट्या बासमती तांदुळ अर्धी वाटी अख्खा मसुर एक मोठ्या आकाराचा कांदा एक मोठ्या आकाराचा बटाटा एक मध्यम आकाराचा टोमॅटो अर्धी वाटी फ्लॅावर अर्धी वाटी गाजर चार हिरव्या मिरच्या दोन टेबलस्पुन साजुक तुप दोन तमालपत्राची पाने तीन दालचीनीचे तुकडे एक मोठी (मसाल्याची) वेलची एक चक्रीफुल आठ-दहा लवंगा एक टिस्पुन गरम मसाला एक टिस्पुन धने व बडीशोप पुड एक टिस्पुन आले लसुण पेस्ट एक टिस्पुन हिरव्या मिरचीचा ठेचा आठ-दहा कडीपत्त्याची पाने दहा-बारा काजु चवीपुरते मीठ

निसर्गाचा न्याय

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 29/07/2021 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाचा न्याय हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा, युगे युगे असे ऋतुचक्र फिरे, निसर्ग देतो भरभरून सारे मानवाची हाव तरिही ना सरे !! मानवाचे अनाचार वाढले, निसर्गचक्र सारेच बिघडले अवघी सृष्टी धरूनी वेठीस स्वार्थासाठी तीला लुबाडले !! मग प्रलय बनूनी पाऊस आला झोडपून टाके सर्व जगाला, नदीच झाला सारा गाव , सर्वस्व सवे घेऊन गेला !! डोंगर कुशीतलं टुमदार गाव निसर्ग सौंदर्याने डोळे दिपले पाऊस माराने पडली दरड उभे गावच गाडले गेले !! निसर्गाचे नुकसान केले गोठल्या मानवाच्या संवेदना, हिशोब त्याचा तो घेतोय करून, मागे उरतेय. , फक्त वेदना !!

दूरदर्शन

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 29/07/2021 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या काय पाहतोय दूरदर्शन १) काही वर्षांपूर्वी दूरदर्शन " कोर्ट मार्शल " मुलाखतकार प्रदीप भिडे ( बातम्या) https://www.youtube.com/watch?v=pUSFBwD2Hx4 २) अलीकडले दूरदर्शन " दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले https://www.youtube.com/watch?v=OFBEtsv2bm8 ३) https://www.youtube.com/watch?v=iiAQAIGp588 नक्की पहा मराठी कलाक्षेत्रातील दिग्दर्शक, निर्माते. कलाकार, गायक.. मेजवानी आहे नुसती