Skip to main content

जिथे सागरा धरणी मिळते........

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 15/10/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.

उमेदवार

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 15/10/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधी सगळे सोप्पे होते हो. पार्टीची वीण घट्ट होती. उमेदवार कुठेही उभा राहायचा. निवडुन यायचा. आता तसे राहीले नाही. आता उमेदवार राखीव मतदारसंघ असेल तरच लढ्णार म्हणतो. उमेदवार लादता येत नाही. मतदारसंघाच्या मनावर उमेदवाराचे यश अवलंबवुन असते. मतदारसंघ अनुकुल आणि जागृत नसला तर मात्र उमेदवार उभा कधी राहीला हरला कधी न कळता डिपॉझीट जप्त. त्यामुळे मतदारसंघाशी संपर्क साधुन अनुकुलता लक्षात घेउन मगच निवड्णुक लढवावी. जाता जाता: सर्वांना दिपावलीच्या शुभेच्च्छा.

मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 15/10/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर... १) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा) २) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन.. ३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन, ४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन, ५) येईल त्या किंमतीला विकून खाईन.. वगैरे वगैरे वगैरे... नोंदवा आपापली म्हणणी! :) तात्या.

एक फॅशन : दिपावलीच्या शुभेच्छा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 15/10/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. (फटाकेप्रेमी)पुण्याचे पेशवे (पणतीप्रेमी)पुण्याचे पेशवे असो. तर मुख्य मुद्दा हा की. दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला आहे. आता याला कारण म्हणजे तशी फॅशनच आहे.

दीपावली शुभेच्छा

लेखक संजीव नाईक यांनी गुरुवार, 15/10/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना... संजीव नाईक http://vastuclass.blogspot.com

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/10/2009 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना, आपल्या कुटूंबीयांना, मित्रपरीवाराला आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो या सदिच्छा!

प्रवास

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 15/10/2009 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
पायवाट म्हणाली, "सांभाळ! अनवाणीच आहेस ठाऊक नाही मुक्काम तुला. प्रश्न सुरवातीला नसतोच, ते येतात तेव्हा उत्तरांचा शोध सुरू होतो, वाटेकडं दुर्लक्ष होतं..." वाट राखणं हे तर जगणं, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी! "महामार्गाचं बरं असतं, तो बदलतो माझं तसं नसतं मी मातीचीच असते. अनवाणी चालताना पाय मळतील म्हणून सांगतेय..." चालताना केव्हा तरी वाट सुटली, भरकटली आता पायाखाली केवळ माती अन मातीच आहे मी चालतोच आहे... 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत!
काव्यरस

भिंगोरी..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 14/10/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणांत खाली क्षणांत वरती श्वास झुलतो झुल्यावरी आभासांच्या मागे भिरभिर मन झाले गं भिंगोरी.. खळबळ मनांत धडधड उरांत चाहूल ही हृदयांतरी कधी आकाशी कधी जळाशी पाऊल माझे अधांतरी कशी आवरू कशी सावरू साद घालते कुणीतरी क्षणांत येथे क्षणांत तेथे चित्त नसे थार्‍यावरी किती करावे नवे बहाणे नशा चढावी मनावरी उगा रूसावे उगा हसावे राग लटका कधीतरी ओढ लागुनी स्पंद रूजावे माझ्या उरीचे तुझ्या उरी सोन स्वरांनी गीत सजावे प्रित फ़ुलावी जन्मांतरी - प्राजु
काव्यरस

कोडे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 14/10/2009 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी मुग्धता कमीच बोलणे तुझे टाळणे तुझ्या भावना समजून घेणे आयुष्याला नवेच कोडे..! रितेपणाचा खेळ नवा तरी जूनेच कोडे हात नवे परी सुटले म्हणता तरी सुटेना जगणे माझे उरले थोडे तरीही हाती घेउन बसलो नवेच कोडे..!! कोडे घेउनच जन्मा येतो कोडे सोडवीत जगतो आपण कोण कुठला..? माझे मी पण प्रश्न सनातन उत्तर याला कधी सापडे..? मीच मजला झालो आता कायम कोडे...!!!