कोडे
तुझी मुग्धता
कमीच बोलणे
तुझे टाळणे
तुझ्या भावना
समजून घेणे
आयुष्याला नवेच कोडे..!
रितेपणाचा
खेळ नवा तरी
जूनेच कोडे
हात नवे परी
सुटले म्हणता
तरी सुटेना
जगणे माझे
उरले थोडे
तरीही हाती
घेउन बसलो नवेच कोडे..!!
कोडे घेउनच
जन्मा येतो
कोडे सोडवीत
जगतो आपण
कोण कुठला..?
माझे मी पण
प्रश्न सनातन
उत्तर याला
कधी सापडे..?
मीच मजला
झालो आता कायम कोडे...!!!
लेखनविषय:
याद्या
1119
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
ही