Skip to main content

फॉल फेस्टिव्हल

लेखक मीनल यांनी बुधवार, 11/11/2009 04:52 या दिवशी प्रकाशित केले.
सण म्हणजे आनंदोत्सव. यात असते ती खण्यापिण्याची चंगळ, कपड्या-लत्त्याची मौज-मजा, संगित नृत्याचा आस्वाद. खर तर मानवाने सणाच्या साजरीकरणाचा काळ ठरवला तो निसर्गाच्या बदलांनुसार. पण अस म्हणण्यापेक्षा कधी कधी अस वाटायला लागत की हा निसर्गच मानवाच्या सणासूदीत उत्साहाने शामिल झाला आहे आणि मानवाला त्याच्या विविध रूपात सामवून घेऊन रंगवून टाकतो आहे. निसर्ग मानवाला मुक्त हस्ते भरभरून सुख देऊन तृप्त करत आहे आणि या समाधानातच मानव आनंदोत्स्व साजरा करत आहे. निसर्गाच्या प्रत्येक बदलाची चाहूल मानवाला काही काळ आधीच लागते आणि मग मानवही सज्ज होतो तो निसर्गाने देऊ केलेल्या त्या सुखसाठी.

दाउद २

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा येशील कधी परतून? बोम्बस्फोट खटल्यात 'माफीचा' साक्षीदार म्हणून भ्रष्ट-ढेरी राजकारण्यान्च्या नाकावर टिच्चून शरदाच्या त्या राजकिय अन अभयाला आठवून मुम्बापुरीतिल तव वास्तुन्चा वारसदार म्हणून मुन्डेच्या त्या घोषणेची अन मुन्डी मुरगाळून दाउदा येशील कधी परतून?

दाउद १

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा दाउदा भागलास का? दुबईच्या बेटावर लपलास का? दुबईच्या बेटावर 'कर'बन्दी तुझा तो वाडा चिरेबन्दी

असेच मनात आले...

लेखक एकशुन्य यांनी बुधवार, 11/11/2009 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री टि.व्ही समोर बसुन जेवत असताना 'ब्रेकिंग न्युज' ही पाटी बघितली, 'सुनीता देशपांडे यांचे निधन'. हातातला घास गळ्यातल्या आवंढ्या बरोबर तसाच ढकलला. वाटलं. प्रत्येक घरातला 'नारायण',वर्तमानात असुन देखील भुतकाळात जगणारे 'हरितात्या', कोकणातला 'अंतु बर्वा' ही आणि अशी बरीच मंडळी आज खरोखर पोरकी झाली. जेव्हा पासून कॉमिक्स सोडून कादंबरी हा फक्त मोठ्यांसाठी असणारा प्रकार वाचू लागलो तेव्हा प्रथम हात लावलेली ' व्यक्ती आणि वल्ली ' ही एक.

माफी आणि नुकसान भरपाई

लेखक निमीत्त मात्र यांनी बुधवार, 11/11/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेने एकट्या पुण्यात तीसेक बसेस फोडल्या. मिपाकर वेदश्री ह्यांच्या सारख्या मराठी लोकांना दिवसभराच्या कष्टांनंतर अंधारात उपाशी झोपण्याची वेळ आली. विधानसभेत झाले ते झाले त्यावर चर्चा नको पण त्यापायी सामान्य माणसांना वेठीस धरल्याबद्दल मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकांची माफी मागून मालमत्तेचे झालेले नुकसान पार्टीफंडातून भरून द्यावे असे आपल्याला वाटते का? अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.

असा अनुभव यावा म्हणूनच का?

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 10/11/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले.

ग्रानोला

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 10/11/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज नवर्‍याच्या प्लँट मधे लॅब च्या लोकांना येता जाता तोंडात टाकायला ग्रॅनोला केला. त्याचा नमुना मिपाकरांसाठी. साहित्य ३ कप ओट (इंस्टंट नको) १/२ कप आक्रोडाचे तुकडे १/२ कप बदामाचे तुकडे १/३ कप मध १ टे. स्पून ब्राऊन शुगर ( नसल्यास साधी चालेल) १ टे. स्पून तेल १ टी स्पून वॅनिला १ कप सुकवलेल्या बेरीज किंवा मनुका कृती ओवन ३००F तापत ठेवा. एका १३x९ च्या बेकिंग पॅन मधे ३ कप ओट पसरुन तापलेल्या ओवन मधे ठेवा. १० मिनिटांनी बाहेर काढून त्यात आक्रोड आणि बदामाचे तुकडे नीट मिसळून परत अजुन २० मिनिटे ओवन मधे भाजा.

लोहगडची सफर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 10/11/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते. प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल. तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू. हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु. हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला. हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

शाब्बास मराठीच्या मुलांनो.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 10/11/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीद्वेष्ट्या अबुआझमीला सभागृहातच वाजवले हे वाचुन मला जितका आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आज अनेक मराठी वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचले आणि मन निराश झाले.कोणतरी मराठीभाषेला आव्हान देतो, निरर्थक तर्क मांडतो आणि आपण उज्ज्वल परंपरा, सांसदिय लोकशाहीच्या नावावर गप्प बसावे इतका मूढपणा झाला नाही याचे निर्विवाद श्रेय मनसेच्या आमदारांना दिलेच पाहिजे. जर मनसेच्या आमदारानी मौन पाळले असते, जानेदोना जानेदोना असे हताश उद्गार काढले असते इतिहासात मराठीच्या एका भेकड पिढीची नोंद झाली असती.

गुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी मंगळवार, 10/11/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
होय. 'आपण काय करू शकतो?' असे न लिहीता 'मी काय करू शकतो?' असे शीर्षक मुद्दामच दिले आहे. याचे कारण मी वाचलेली एक जुनी गोष्ट. या गोष्टीत एक राजा त्याच्या जनतेला एक दिवसात एक मोठा हौद दुधाने भरण्यास सांगतो. यासाठी सर्वांनी फक्त एक, एक हंडाभर दूध त्या हौदात टाकायचे असे ठरते. प्रत्येक जण असा विचार करतो की बाकीचे सर्वच जर एक, एक हंडाभर दूध टाकणार आहेत तर त्या हौदात मी एकट्याने एक हंडाभर दुधाऐवजी एक हंडाभर पाणी टाकल्याने असा कितीसा मोठा फरक पडणार आहे? अशा पद्धतीने सर्वांनीच विचार केल्याने संध्याकाळपर्यंत तो हौद दुधाऐवजी पाण्यानेच भरून जातो.