शाब्बास मराठीच्या मुलांनो.
मराठीद्वेष्ट्या अबुआझमीला सभागृहातच वाजवले हे वाचुन मला जितका आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
आज अनेक मराठी वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचले आणि मन निराश झाले.कोणतरी मराठीभाषेला आव्हान देतो, निरर्थक तर्क मांडतो आणि आपण उज्ज्वल परंपरा, सांसदिय लोकशाहीच्या नावावर गप्प बसावे इतका मूढपणा झाला नाही याचे निर्विवाद श्रेय मनसेच्या आमदारांना दिलेच पाहिजे.
जर मनसेच्या आमदारानी मौन पाळले असते, जानेदोना जानेदोना असे हताश उद्गार काढले असते इतिहासात मराठीच्या एका भेकड पिढीची नोंद झाली असती. सुदैवाने राजकारण असो अथवा त्यामागचा भावनिक आवेश असो, जे काही असेल ते असो, मनसेने लाक्षणिक का होईना, कानाखाली आवाज काढला हे बरेच झाले. शिवाजीचे वंशज म्हणून कोणाकडे तरी बोट दाखवता येईल असे सांगितले.
तुकाराम,नामदेव, एकनाथ, रामदास का मुर्ख होते म्हणून त्यांनी लोकभाषा म्हणून मराठीचा उपयोग केला? आचार्य अत्रे इत्यादींनी मराठीसाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला, हु्तात्म्यांनी आपले प्राण दिले या सर्वांच्या परंपरेची कडी अथवा बुज मनसेने राखली हे मला नमूद करावेसे वाटते.
आज जर मराठीचे मुले आमदारकीच्या पत्रावळीसाठी गप्प बसले असते तर.... हा विचारही मला असह्य वाटतो.
आता आपल्यासर्वांचे एकच कर्तव्य आहे जेथे मारामारी याविरुद्ध विचार मांडला जाईल त्याला आपापल्या परीने मराठीहिताचाच विषय मांडणे. राजठाकरे यांचे समर्थन करणे हेच आपले कर्तव्य आहे.
यामागे राजकारण आहे की मिलिजुली आहे याचा विचार तरी करण्याचा मोह टाळणे.
आजदिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता की आचार्य अत्रे असते तर त्यांनी आपले मत कसे व्यक्त केले असते?
राज ठाकरे यांनी आता आपले स्वताचे एक वर्तमानपत्र निर्माण करावे असेही सुचवावेसे वाटते.
रमेशभाऊ यांचे अभिनंदन. ( अर्थातच ते आमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात हा आमच्या भाग्याचा भाग आहे.).
शाब्बास मराठी मुलांनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. ज्या सभासदांना मराठीबद्दल प्रेम नाही त्यात तुम्हाला न बसवता नियतीने तुमचा सन्मानच केला आहे हे मला मनापासून वाटते.
जय महाराष्ट्र.
वाचने
7315
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
आयला, लय
In reply to आयला, लय by शैलेन्द्र
आजपासून
In reply to आजपासून by टारझन
टार्याशी
आयला!!!
In reply to आयला!!! by बिपिन कार्यकर्ते
काय रे आँ...हिंदी????
In reply to काय रे आँ...हिंदी???? by धमाल मुलगा
घेऊ का
आज माझ्या मनात
In reply to आज माझ्या मनात by मिसळभोक्ता
आश्चर्य !!
In reply to आश्चर्य !! by आनंदयात्री
माझा
In reply to आज माझ्या मनात by मिसळभोक्ता
मरा अथवा मारा.
जय
काल
खेटराची पूजा पावली!
रमेश भाऊंचा मतदार संघात इतका प्रभाव????????
माझे मत.
In reply to माझे मत. by कलंत्री
कलंत्रींच
In reply to कलंत्रींच by अवलिया
वा वा..
पुर्णपणे
कलंत्री
केवळ आबुच का?
काळाची गती गहन आहे.