Skip to main content

बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 11/11/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला. त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) - प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

बटाट्याची भाजी

लेखक बबनराव यांनी बुधवार, 11/11/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
३-४ बटाट्याचे उभे गोल गोल काप करुन घेणे.साले काढू नयेत. त्यात ४-५ हिरव्या मिर्च्या कापून ,(तिखट हवे असल्यास २ मिरच्या जास्त घेणे ) ३-४ मोठे चमचे ओले खोबरे खवून , २-३ चमचे लाल तिखट , १/२ चमचा हळद , ८-१० कळ्या लसूण ठेचून, २-३ काड्या कोथिंबीर चिरून, चवी प्रमाणे मीठ, २ मोठ्या पळ्या तेल वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत व भांडे गॅस वर ठेवावे . गॅस मंद ठेवावा. २-३ मिनीटानी वाफ आली की एक वाटी पाणी घालून भाजी शिजू द्यावी . ( रस्सा हवा असल्यास पाणी थोडे जास्त घालावे ) गरम गरम चपाती बरोबर खावी.

सभागृहातील प्रकाराबाबत मनसेची दिलगिरी

लेखक मड्डम यांनी बुधवार, 11/11/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रकरणावरुन विधानसभेत झालेल्या राड्याबद्दल मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सभागृहाचा सन्‍मान राखून या प्रकरणी नवनिर्वाचित विधानसभाध्‍यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्‍याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.

दुहेरी व्यक्तीमत्व

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच वेगळ्या नावाने सदस्य वावरत असतात. बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात. कुठेतरी अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण करून घेत असतात. एखाद्या साईटवर एखादे नाव घेणे आणि हळूहळू त्या नावाप्रमाणे तसे व्यक्तीमत्व होणे हे ओघानेच येते. एखादी व्यक्ती डॉन हे नाव घेते.एखादी व्यक्ती स्वतःला पेशवे म्हणवते . एखादी व्यक्ती नाटक्या हे नाव धारण करते त्यावेळेस त्यांच्या सूप्त मनातील भावना कळू शकतात. सखाराम गटणे ही भाईसाहेबांची व्यक्तीरेखा एखादा त्या नावातून जगायला सुरुवात करतो.

कोल्ड कॉफी

लेखक गणपा यांनी बुधवार, 11/11/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज मध्ये असताना मॅगीने वेड लावल होतं. (नाही हो मुली बद्दल नाही न्युडल्स बद्दल बोलतोय.) आमच्या सोमय्याच्या कँपस मध्ये मधोमध एक मॅगीच सेंटर होत. २ रुपयाला कागदाच्या बशीत टिच भर गरमा गरम मॅगी मिळायची आणि जोडीला आसायची १ रुपयाची नेस्लेची गरमा गरम किंवा थंडगार कॉफी. आर्ट्स आणि कॉमर्सची पोर पोरी सदान कदा तिकडे पडिक आसायची. नुसत थंडगार पाणीच आसायच ती कॉफी म्हणजे. रंगाला थोड दुध आणि कॉफी फक्त वासापुरती . पण कोल्ड कॉफीच वेड लागल ते तिथुनच. या वेडापायी मग घरच्या घरीच वेग वेगळे बदल करत गेलो.

हवामानखात्याचा निषेध

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 11/11/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भूमीजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाला Phyan हे फिरंगी नाव दिल्याबद्दल हवामानखात्याचा निषेध...

हिशोब

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
असाच फिर॑तोय आज स्वतःचा शोध घेत. कुठे निघालो होतो आणि कुठे पोहोचलोय याचा अंदाज घेतोय जुने नकाशे किती वेळा बदलले , त्यातल्या बदलेल्या खजिन्यांच्या जागा, यांचा हिषेब लावतोय. कैफात उधळलेले क्षण मोजतोय त्यापायी गमावलेले आणि मिळवलेले यांची बेरीज वजाबाकी करतोय हिशोब कुठेतरी चुकतोय. वजाबाकी बरोबर येतेय. पण जमेची बाजू जास्त का येतेय. अर्र आत्ता आठवले.... मी तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत. ..............विजुभाऊ

ज्यूल्स व्हर्न

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यूल्स व्हर्न हा लेखनातला अवलीया. त्याची आणि माझी ओळख झाली ती "८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा" या भा रा भागवतांच्या अनुवादीत पुस्तकातून. भौतीक शास्त्र /भूगोल यांचे नियम पाळून ज्या काळात प्रवासाची खूप साधने नव्हती त्या काळात मि.फॉग आणि त्याचा नोकर पासपार्तू ने ८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा पार पाडली त्याची साहस कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली.

बुधवारची कविता: तमाशा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 11/11/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्‍हास बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास" सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा -पुण्याचे पेशवे
काव्यरस