मुंबई
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रकरणावरुन विधानसभेत झालेल्या राड्याबद्दल मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सभागृहाचा सन्मान राखून या प्रकरणी नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार पहिल्याच दिवशी सभागृहात आले होते, त्यामुळे त्यांना सभागृहाच्या नियमांबद्दल माहिती नव्हती, असे सांगतानाच त्यांची पहिलीच वेळ असल्याने त्यांच्या निलंबनाची शिक्षा कमी करावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
तीन दिवसांपूर्वी विधानसभेत आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतल्यावरून मनसे आमदारांनी चिडून त्यांना धक्काबुक्की केली होती. यामुळे सभागृहाने मनसेच्या राम कदम, शिशिर शिंदे, वसंत गीते आणि रमेश वांजळे या आमदारांना चार वर्षासाठी निलंबनाची शिक्षा दिली होती. या घटनेनंतर मनसेने सभागृहाच्या सन्मानाच्या दृष्टीने दोन पाऊल मागे घेत सभागृहात झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
याबाबत सभागृह आगामी 8 डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात विचार करण्याची शक्यता आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी बाळा नांदगावकर यांच्या दिलगिरीबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यास आघाडीसह शिवसेना व भाजपच्या आमदारांनी विरोध केल्याने निलंबनाची शिक्षा कमी होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसत आहे.
स्त्रोतः बेबदुनिया.कॉम
वाचने
3053
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनसेच्या
हा खुलासा
In reply to मनसेच्या by पाषाणभेद
माफी ?
सहमत
In reply to माफी ? by तिमा
साहेब...!
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
बरोबर
In reply to साहेब...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माफी
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
हॅ हॅ
अगदी बरुबर
In reply to हॅ हॅ by झकासराव
या बाबत
चांगली खेळी आहे
ह्याला
हल्ला
+१ कृष्णनित
In reply to हल्ला by विशाल कुलकर्णी
कुठलेही