Skip to main content

शनिवारचा उतारा - खात्री

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 14/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्‍याची ही प्रेरणा . . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?" सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते +१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते! . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येत
काव्यरस

पाठवणी...

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 14/11/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा शाळेचा पहिला दिवस प्रेस केलेला शाळेचा युनिफॉर्म तो टिफिन ती वॉटर बॉट्ल किती आनंदात होतीस ना तू? पण मी ? कसं सांगू तुला.. एकीकडे तू आता शाळेत जाणार हा आनंद तर एकीकडे तुझे घरातून ३ तास का होईना माझ्यापासुन दूर जाणार.... ह्या कल्पनेनेच मी हळवी होत होते.. तो दिवस आणि आजचा दिवस आज तुझे लग्न आणि पाठवणी पुन्हा तू किती आनंदात आहेस नविन कपडे, नवे दागिने नविन घर, नवे लोक वरात येण्याच्या तयारीत तू गौरीहार पुजण्यात मग्न पुढच्या जिवनाची स्वप्नं रंगवणं एकीकडे तुझं मला खरचं दुरावणं एकीकडे तुझा आनंद एकीकडे माझा एकांत आणि इकडे पुन्हा मी हळवी होत होते... प्रसन्ना जीके

वारीचं पुण्य!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एका मिपाकराचा फोन आला.. "काय तात्या, कसा आहेस? मीही एक मिपाकर आहे पण फक्त वाचनस्वरुपात." बर्‍यापैकी वयस्कर माणसाचा आवाज वाटत होता.. "बरं. बोला साहेब.." "तात्या तुझ्या मिपाची खरी शोभा काय सांग पाहू?" "मिपावर मनापासून लिहिणारे/वाचणारे मिपाकर!" मी. "च्च.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!" हा म्हातारा एकदम शिव्यांवर आलेला पाहून मला बरं वाटलं! :) "म्हणजे मिपाचं खरं बलस्थान काय? असं विचारतोय मी. छ्या! साल्या तुझं हे संकेतस्थळ आणि तुलाच ह्याचं उत्तर माहीत नाही?" "हम्म..! येथे लिहिले जाणारे उत्तम लेख, हसीमजाक, कम्पूबाजी वगैरे..!" पुन्हा मी. "च्च.. ते झालंच रे.

नकोसे वाटते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते? कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे" मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी? संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स- ब्लॅक-बॉक्स

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 14/11/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच! कल्पना करा की, ह्या गोष्टीतल्या व्यक्तिला एखादी भेट मिळते व त्या भेटीचे रंगीबेरंगी, झगमगीत कागदाने सजवलेले खोके त्याने उघडता क्षणी त्यातून एक स्प्रिंगवर लावलेला छोटा ब्लॅक-बॉक्स झूपकन बाहेर येतो. त्यावर लिहिलेले असते "मला दणका द्या". व त्यावर दोन छोटे दिवे असतात- एक लाल व दुसरा हिरवा. दचकून झाल्यावर कुतूहलमिश्रीत भीती-आश्चर्याने तो त्यावर हळूच एक टिचकी मारतो. त्या ब्लॅक-बॉक्समधून एक धून ऐकू येते, त्याच्या नोट असतात- "क ख ग घ, क, ख, ग, घ" व लाल दिवा लागतो.

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.

और कारवॉ बनता गया.

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 14/11/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश फाटल तर ठीगळ तरी कुठे कुठे लावायच? तुला जिथे जमते तिथे लाव, उरलेल्याची काळजी करु नकोस. इतके दिवस एकटाच होतो. देखते देखते कारवां बन रहा है. मिपावर आल्यावर रामदासांशी मैत्री झाली. पहील्या भेटीतच लक्षात आले की हे रसायन वेगळ आहे. तीच गोष्ट विजुभौंची. ही मंडळी आपल्याबरोबर आली तर? बोलत राहीलो, भेटत राहीलो. कुठेतरी मनात पक्की गाठ बांधली ह्यांना पण आपल्या सारखेच बोर्डावर तुणतुणे घेउन उभे करायचे. त्यांच्या दैनंदिन जिवनातुन वेळ देतील की नाही ह्याची शंका होती. पण 'मराठी- मराठी' ही

डोक्याला ताप नाही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 14/11/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्याला ताप नाही आपण पैसे देवून वर्तमानपत्र खरेदी करतो ते काही आपल्याला मानसीक त्रास व्हावा म्हणून नाही. अगदी महत्वाच्या बातम्या देवून कोणाचे भले झाले आहे? सकाळमध्ये असल्या बातम्या वरचेवर यायला लागल्या आहे. वाचा : नितीशकुमारही बनले मांसाहारी. मागेही त्याने (सकाळने) 'लालू मांसाहारी बनले', राहूल गांधीने ईडली सांबर खाल्ले असल्या (बीपी न वाढवणार्‍या बातम्या) दिल्या होतात. आपल्या आरोग्याची काळजी करणारे आता फार वृतपत्रे (सकाळच नाही तर इतरही.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.