Skip to main content

फक्त तूझ्या बछडीसाठी...

लेखक sneharani यांनी सोमवार, 04/01/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय बाबा, आज डोळ्यात अश्रू... मुलीला वाढवताना होणार्‍या कष्टांमूळे थकलास का? म्हणून डोळे भरुन आले का? खरच आजच वाटलं, आज आई असती तर... बाबा, मी जन्माला आले अन् आई गेली, तुझ तर सर्वस्वच हरपल.. मग आपल्या जगात आपण दोघचं तू अन् मी... बाबा तू कधी शिकवलच नाहीस तूला 'तुम्ही' म्हणायला आज ही ये जा करते तूला ही तुझी बछडी, इतक प्रेम दिलयस की आईची आठवण कधी मनाला शिवत सुध्दा नाही... जगायच कस हे तु शिकवलसं, अन् आज ही शिकवत आहेस.. आठवतय का, तूला तुझ्या वाढदिवसाची तारीख विचारत होते किती छान हसलास.. कशाला गं बेटा.. अस काय बाबा सांग ना रे.. माझे हे बोबडे बोल आज ही आठवतायेत... पुढच्याच महिन्यात होता वाढदिव

अशीच एक काळरात्र...

लेखक दशानन यांनी सोमवार, 04/01/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३० मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते.

संकल्प नवीन वर्षाचा.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 04/01/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्प नवीन वर्षाचा..... नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! ३१ डिसेम्बर २००९ उजाडले.वर्षाची एक सी.एल. (कॅजुअल लीव्ह) अर्थात् किरकोळ रजा शिल्लक होती ती वापरून घरी बसलेलो.मोठे चिरंजीव सिद्धेश ११ वी सायन्स ला असल्याने नाताळच्या सुट्टीत क्लासरूपी घाण्याला जुंपलेले ! धाकटे चिरंजीव चिन्मय सध्या फुट्"बॉल्"पणात रममाण ! सौ. प्राजक्ता पण रजा घेऊन घरी ! अस्मादिक् आजपर्यंत सिगारेट्,विडी-काडी,पान्-सुपारी,गुटखा,बाई (एक BAIको सोडून) , जुगार, अमली पदार्थ इत्यादीपासून लांब असल्यामुळे सध्याच्या युगात अगदीच टाकाऊ !

विनोदी कथा: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई !!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 04/01/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते. अचानक ...धडाम... धुम्म .. धस्स!! असा अवाज आला, ऑफिसची खिडकी फुटली, खिडकीतून एक जाळी आली, आणि त्या जाळीने रामनाथन ची ईडली ओढली आणि बघता बघता ईडली खिडली बाहेर खेचली गेली.

नटरंग तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ?

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 04/01/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नटरंग हा मराठी चित्रपट पहायची इच्छा आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अशी त्याची जाहिरात केली जाते, माझ्या जवळच्या चित्रपटगृहात ( कुलराज ब्रॉडवे ) ३.१५ चा खेळ आहे अशी वर्तमानपत्रात जाहिरात वाचली पण पोस्टरवर मात्र या प्रसिद्ध चित्रपटाचा काहीच मागमूस नाही.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

लेखक सातारकर यांनी सोमवार, 04/01/2010 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

साता समुद्रापल्‍याडची हिंदी-मराठी गाणी

लेखक मड्डम यांनी रविवार, 03/01/2010 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर नेटाने काम करताना बराच प्रयत्‍न करूनही काही वेळा कंटाळा येतोच अशावेळी शांत संगीत ऐकत काम करत राहण्‍याची मजाच काही और असते. पण एक तर पीसीमधील तीच-तीच गाणी ऐकण्‍याची इच्‍छा होत नाही आणि नवीन कलेक्शन करायला आपल्‍याकडे वेळ नसतो. अशा वेळी ऑनलाईन रेडिओ आपल्‍याला मदत करतो... इथे अशाच ऑनलाईन रेडिओच्‍या संगीताची मेजवानी तुमच्‍यासाठी आम्ही उपलब्‍ध करून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर अगदी संयुक्त अरब अमीरात, अफगाणिस्‍तान आणि पाकिस्‍तानातही आपली बॉलीवुडची गाणी किती लोकप्रिय आहेत. हे हा रेडिओ ऐकल्‍या शिवाय कसं कळेल...

भ्रष्टाचाराच्या विरोधात 9158242424

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 03/01/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात हे एक चांगलं पाऊल ठरू शकेल असं वाटतं, लोकांनीच निर्भीडपणे आणि निर्भयपणे अँटी करप्शन ब्युरोला सहकार्य करणं महत्वाचं आहे. ----------------- वरील लेखाचा विषय महत्वाचा असल्याने त्या दुव्यातील महत्वाचा भाग खाली सार्वजनीक माहीती म्हणून देत आहे. - संपादक
सरकारी-निमसरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पीक कमी करण्यासाठी ऍंटी करप्शन ब्युरोने यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहेत.

मराठी चित्रपटाने गाठलेल्या नव्या उंचीने पडलेले काही प्रश्न

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 03/01/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
१. ज्यांनी खास मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कर्दळी आणि झेंडूच्या बागांची जोपासना केली होती त्यांनी काय करावे? २. मराठी नटीच्या अगम्य आणि विनोदी अशा वेषभुषेत पटाइत असलेल्या ड्रेस सप्लायरने त्या ड्रेसच्या स्टॉकचे काय करावे? ३. सजणी- दिवाणी असे यमक जुळवून गाण्यांची रचना करणारे गीतकारांनी काय करावे? ४. लेन्सला एकाच वेळी चार-चार किंवा षटकोनी चित्र दिसेल असे एक लेन्सचे सप्लायर ह्यांनी काय करावे? ५. बेंळगाव मधे धंदा व्हावा म्हणून कानडी हेलमधे बोलण्यासाठी संवाद लिहिणाऱ्या लेखकांनी काय करावे? ६.

"अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी"...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 03/01/2010 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
"सून-मुलगा अति नालायक-वाईट आणि आई-वडील-नणंद ही देवत्त्वापेक्षाही आदर्श माणसं" अशा धर्तीचे मराठी चित्रपट बंद होत आहेत, मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे वाटायला लागले असतांनाच .... "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला. अन वाटलं... कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार. नाण्याच्या एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण- पुणे.