Skip to main content

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/01/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन व लेखकाचे बाह्यरुप हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात. असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे?

साधा माणूस या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 18/01/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या साधा माणुस या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे देत आहे. या काव्य संग्रहाला विशेष प्रस्तावना ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांची लाभली आहे, हे मी माझे परम भाग्य समजतो. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये दूरदर्शनचे अभय मोकाशी, विख्यात कवी अशोक बागवे, अशोक लोटणकर, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे, साहित्य त्रैमासिकाच्या संपादिका सुहासिनी किर्तीकर इत्यादी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याची सांगता काव्य संध्येने झाली. गोखले यांची कविता हा त्यांचा उदगार आहे, माझ्या कवितेशी त्यांच्या कवितेची नाळ जुळते म्हणुन मी आलो.

Pride and Prejudice?

लेखक अमितकुमार यांनी सोमवार, 18/01/2010 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride… Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली.

नववधु

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 18/01/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नववधु हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता तोच हात मेन्दीने तेव्हा रन्गला होता नथनीचा तुझ्या त्यावेळी डउलच न्यारा होता गालावरिल लालीचा रन्ग लाजरा होता डोळ्यांमधे निरागसता पराकोटीची जपलेली गोश्ट होती माझ्या प्रेमाची तव ओ लपलेली
काव्यरस

पिक्चरच्या xxx घो

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/01/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वन बॉल टू गो अ‍ॅन्ड फोर रन्स टू विन !! इति हंपायर उवाच सामना जिंकायला ४ धावा मात्र सिनेमातल्या हिरोचे शतक पुर्ण व्हायला पाहिजेत ६ धावा. उत्सूकता आहे ती आपला तेंडल्या शतक करतो का नाही याची ! संघाचा विजय झाला काय आणि नाही झाला काय ? प्रत्येक जण आता काय होणार या उत्सूकतेने नख खात आहेत. पण शिनिमाचा हिरो तेंडूलकर ( मियांदाद म्हणायला पाहिजे काय त्याला ?) मात्र अपेक्षेप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुढे सरसावत सिक्सर मारतो ती ही एवढ्या जोरात की सांताक्रुज विमानतळावरुन नुकतंच उड्डान केलेले जेट विमान थोडक्यात बचावते.

शोध सुप्त गुणांचा!

लेखक अभिशेक गानु यांनी सोमवार, 18/01/2010 04:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मी मिपा वाचतो आहे..मिपा मुळे आणि माझ्या अजून एकदोन मित्रांच्या ब्लोग मुळे मला पण काही तरी लिहायची स्पुर्ती मिळाली ..हि मी ऐथे नमूद करू इच्छितो. हा असा पहिलाच प्रसंग आहे..कि ज्यात मी काही आलेल्या अनुभवातून मी काही तरी मुक्त लेखन केले आहे, जाणकार मीपा वाचकांना नम्र विनिती आहे .लेखन सुधारण्या साठी योग्य त्या सूचना जरूर कार्याव्यात ..ज्याचा मला पुढे अजून काही व्यक्त करण्यास मदत करतील..धन्यवाद! काही दिवस तरी एकटे राहावे..! गेले काही दिवस या विषयावर लिहेन म्हणत होतो..

चिपाड

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 18/01/2010 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती.

काही तरी करायचे आहे ?

लेखक अज्ञात यांनी रविवार, 17/01/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी , हा माझा पहिलाच प्रयत्न आहे... मिसळपाव वर लिहायचा .मिसळपाव चा सदस्य मी बरेच दिवसापासून आहे पण कधी लिहिले नवते कारण टायीप करायला जमायचे नाही ....त्यामुळे मग लेख/प्रतिसाद द्यायचे असून पण जमायचे नाही मग Google Transliteration सापदले.... ते जरा सोपे आहे त्यामध्ये लिहायचे आणि ते मिपा वर पेस्ट करायचे ....असो ..आधी पण हा लेख मी मिपावर टाकला होता पण परत एडीट करताना कॉपी /पेस्ट मध्ये घोळ झाला आणि लीखान डीलीट झाले माझ्याकडून (४-५ तास च राहिला तो ) काही तरी करायचे आहे ...... .कॉलेज मधून पास आउट झालो तेव्हा असे सारखे वाटते कि आपण स्वताचा काही तरी व्यवसाय चालू करावा.

फर्निचर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/01/2010 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटच्या जाळ्यात मुली शोधीत असता चॅटींगच्या सेशनात एकमेका अजमावता कुणी एक घराविषयी विचारत होती सगळे म्हणाली जुने फ़र्निचर आहे तुम्ही ठेवले? म्हटले अग सारे नवीनच घेतले लग्नाच्या तयारीनेच प्लॅन केले तशी म्हणाली ओ गॉश! विकत मिळणाऱ्या नव्हे आधीच्याच जुन्या फ़र्निचरचे विचारते मी आहे अग आमच्याकडे जुने सामान नाही जुने ठेवायला येवढी जागाही नाही तशी म्हणाली हे ऐकून बरे वाटले आपले मत ह्या बाबतीत बरोबर जुळले लग्नानंतर जागेची मला गरज भासणार सांग तू केव्हा आईबाबांना बाहेर पाठवणार? जुने फ़र्निचर!!!

चॉकलेट फज

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 15/01/2010 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लेक लहान होता तेव्हा आमच्याकडे हॉलिडेला हा फज सांता साठी ठेवायचो. सांता येणं बंद झालं, त्या बरोबर फज करणंही. या आठवड्यात लेकाला शाळेच्या टीम बरोबर गावाला जावे लागले. एक दिवस शाळा बुडली. बुडलेला अभ्यास भरुन काढायला मैत्रीणीने मदत केली. तेव्हा काल तिच्यासाठी लेकाने फज केला. झटपट आणि चॉकोलिशस. साहित्य १ कॅन(१४ औस) स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क २ कप सेमि स्वीट चॉकलेट चिप्स १ कप आक्रोडाचे तुकडे (नसले तरी चालतील) १ टी स्पून वॅनिला कृती ८ इंच चौकोनी पॅनला फॉईल लाऊन घ्या.