Skip to main content

काही तरी करायचे आहे ?

लेखक अज्ञात यांनी रविवार, 17/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी , हा माझा पहिलाच प्रयत्न आहे... मिसळपाव वर लिहायचा .मिसळपाव चा सदस्य मी बरेच दिवसापासून आहे पण कधी लिहिले नवते कारण टायीप करायला जमायचे नाही ....त्यामुळे मग लेख/प्रतिसाद द्यायचे असून पण जमायचे नाही मग Google Transliteration सापदले.... ते जरा सोपे आहे त्यामध्ये लिहायचे आणि ते मिपा वर पेस्ट करायचे ....असो ..आधी पण हा लेख मी मिपावर टाकला होता पण परत एडीट करताना कॉपी /पेस्ट मध्ये घोळ झाला आणि लीखान डीलीट झाले माझ्याकडून (४-५ तास च राहिला तो ) काही तरी करायचे आहे ...... .कॉलेज मधून पास आउट झालो तेव्हा असे सारखे वाटते कि आपण स्वताचा काही तरी व्यवसाय चालू करावा. २ -३ वर्ष जॉब करून मग काही तरी चालू करावे .( पण काही तरी म्हणजे नेमके काय हे त्यावेळी काहीच माहित नसते ).पण विचार असतो हे नक्की . मग नोकरीची सुरवात होते . पहिले ऑफिस /पहिला प्रोजेक्ट/ पहिली असयीन्मेंत / पहिली तेक्नोलोजी ( हो...नवीन नोकरी आईटी मधे होती )/पहिली सेलरी याच्या मध्ये पहिले वर्ष लगेच निघून जाते . आणि मग स्वताचा व्यवसाय / बिझनेस हा विचार थोडा मागे पडतो . थोडे पैसे हातात यायला लागतात आणि मग पार्ट्या चालू होतात .टेबल वर बसले कि मित्रांबरोबर मग परत एकदा पुढचे विचार चालू होतात . गप्पा होतात ..काही तरी वेगळे करायला पाहिजे यार .किती दिवस इथे पाट्या टाकणार ..अरे आपण असे करूया का तसे करूया का ...असे बरेच विषय होतात मग शेवटी ग्लास पण रिकामा होतो आणि विचार पण ........असे बर्याच विकांताला होते हळू हळू मग नोकरी मध्ये सेट वयाला लागतो ( सेट म्हणजे खाचा खोचा कळायला लागतात, थोडे फार काम जमायला लागते . एखाद्या विदेश वारीचा chance मिळतो .२-३ महिन्याचा ..थोडे एक्स्ट्रा पैसे मिळतात .. या वेळी मात्र स्वताचा बिझनेस चा विचार एकदम मागे पडतो . तरी पण डोकी मध्ये किडा असतोच आणि कधी कधी जरा जास्त वळवळ करायला लागला तर मग जरा प्लान चालू होतो .कुठला बिझनेस करावा / किती खर्च येईल / बाकी काय काय गोष्टी कराव्या लागतात . गुगल या वेळी भरपूर मदत करते . थोडी फार आयडिया तयार होते पण ती फक्त कागद वरच असते त्यावेळी ...थोडे निगेटीव थिंकिंग चालू होते. ठीक आहे करूया बिझनेस पण भांडवल कुठून येणार, घरून किती सपोर्ट मिळेल, आताच्या नोकरीचे काय करायचे , आपली तेवढी रिस्क घायची ताकद आहे का ? आपण शेवटी पडलो मराठी माणूस ..कशाला या मध्ये पडायचे .. असे करून मग तो प्लान त्यावेळी तसाच राहतो थोडा फार पुडे गेलेला असतो इतकेच ... असेच मग १-२ वर्षे जातात .प्रत्येक वेळी त्या आपल्या प्लान मध्ये भरच पडत राहते ..घरी पण असे बोलून दाखवले जाते .पण घराचे ती कल्पना एकदम चेस्तेवारी नेतात ..तोंड बघ आरश्यात आधी ...बिझनेस करणार म्हणे ..चांगला जॉब आहे ठीक ठाक पगार आहे . हे सगळे आईकल्यावर घरचे पण बरोबर आहेत असे वाटते ..त्यांनी पावसाळे पण जास्त बघितलेले असतात ना .....पण वाटते कि आपण अगदीच बुद्धू थोडीच आहोत . सगळे ट्रेनिंग , माहिती , भांडवल , बाकी जमा खर्च या सगळ्याचा विचार करूनच आपण काय ते करू ना ... शेवटी मग परत बिझनेस प्लान वर काम चालू होते नव्या जोमाने नवीन आयडिया येतात ... अशीच आणखी १-२ वर्षे जातात आणि मग घराचे लग्नाचा विषय काढतात ...नाही होय नाही होय असे करत एकदा लग्न ठरते होते...मग परत नव्या उमेदीने मग नोकरीच्या मागे लागलेला असतो या वेळी तर सगळेच पाहिजे असते फ्लेट, कार , सहली ...सगळे सगळे पाहिजे असते ....हे सगळे करायला पैसे पण बरेच लागतात मग परत चालू होतो ...पैश्या मागे धावणे :-) आणि बिझनेस चा किडा डोक्यामध्ये असतोच ..या वेळी मग परत बायकोच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात पण या वेळी एक बरे असते ..बायको पण बरोबर असते ....आणि ती जर समविचारी असेल तर काय दुधात साखर .....परत नवी उमेद जागी होते ..अजून पण वेळ गेलेई नाही आहे आता तर आपण फक्त २७ वर्षाचे आहोत :-) असा हा कॉलेज मध्ये डोक्यात असलेला प्लान आता ४-५ वर्षांनी कागदावर तरी असतो ......पण उमेद नवीन असते तर मिपाकर मंडळी काथ्याकुताचा चा विषय असा आहे कि असे सगळ्यांना वाटते का कि आपण कि काही करावे ? प्रत्येकाच्या डोक्यात असा किडा कधी तरी वळवळतो का ? एक मराठी मध्यमवर्गीय घरामधून अश्या विचारणा किती सपोर्ट होतो (एखादा पूर्वीपासून चा फमिलीबिझनेस असेल तर वेगळे ) मिपा वर बरेच उद्योजक असतील त्यांचे विचार जाणून घेण्यात पण मजा येईल

वाचने 5924
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तुमचे विचार तुम्ही प्रामाणिकपणे मांडले आहेत. हो, सगळ्यांना वाटते की आपणही काही करावे. माझी मते.- १. हा किडा प्रत्येक इंजिनियरच्या डोक्यात जरी वळवळत नसेल तरी ८०% हे प्रमाण मानायला हरकत नसावी. २. बिझनेसमधे जितक्या लवकर उडी माराल तितकी चांगली. शक्यतो तुम्हाला डिग्रीनंतर २ ते ३ वर्षात बऱ्यापैकी प्रॅक्टीकल ज्ञान येते- उदा- मेकॅनिकल इंजि असाल तर मशिनचे प्रकार, त्यांनी होणारी कामे, कॉस्टींग, इस्टीमेट, प्रॉफिट मार्जिन, कच्चा माल कुठे मिळतो, मार्केट कुठे आहे, ई. तितके ज्ञान व्यवसायात उडी घेण्यास पुरेसे असते. ३. शक्यतो एकदम नोकरी सोडून बिझनेस करु नये. ४. २ ते ३ वर्षे बिझनेस मधून काहिच मिळणार नाही हे गृहीत धरा ५. एकदम मालक व्हायची स्वप्ने पाहू नका- तुम्हीच एकटे व्यवसाय चालू करा मग तुमची बॅन्डविड्थ १६/२४ तासांपेक्षा जास्त वापरली जाऊ लागली की, स्टाफचा विचार करा. तो पर्यंत घरातील मेंबर्स कडून शक्य तितकी श्रम-मदत घ्या. ६. कोणीही व्यवसायीक होऊ शकते. ७. तुमची आताची नोकरीची कंपनी/ कार्यालय तुमची असती तर तुम्ही कशी मॅनेज केली असती ते विचार करा ८. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा व बॅंकांना भेटून ते कर्ज देतील का? किती व्याजदर असेल वगैरे गोष्टींची चौकशी करा. ह्या सगळ्या कामालाच तुम्हाला १ ते २ वर्षे लागून जातील. ९. काहिच साध्य झाले नाही तरी तुमची मॅच्युरीटी नक्कीच वाढेल व नोकरीत त्याचा निश्चीत फायदा होईल.

माझ्या वर्गातील ६० पैकी ८०% लोकं बिलो-ऍव्हरेज होते; त्यातील ५०% लोकांचे आज सुस्थितीतील व्यवसाय आहेत. जे खूप हुषार होते ते ....यु नो व्हाट आय मीन. अनेक अशिक्षीत लोक- ज्यांना शाळा-कॉलेजने नाकारलं- व त्यांना नोकऱ्याही मिळू शकल्या नाहीत- असे कित्येकजण आज व्यावसायिक आहेत.

In reply to by अमृतांजन

ज्यांना शाळा-कॉलेजने नाकारलं- व त्यांना नोकऱ्याही मिळू शकल्या नाहीत- असे कित्येकजण आज व्यावसायिक आहेत.
हा हा हा.ज्यांची कुठेही शिजली नाही त्यांनी व्यवसाय काढले असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तुमच्या हिशेबा प्रमाणे भारतातील ८०% विद्यार्थी जर भारतात व्यावसायीक होत असतील (अर्थात तुम्ही यशस्वी वगैरे काही लिहले नाही आहे, कसला व्यवसाय तेही नाही.) तर भारत जगाची आर्थीक महासत्ता २०-२५ वर्षे आधिच झाला असेल नाही?

In reply to by Nile

>>>तुमच्या हिशेबा प्रमाणे भारतातील ८०% विद्यार्थी जर भारतात व्यावसायीक होत असतील अमृतांजन ह्यांचा हिशेब असा आहे हा शोध तुम्ही कसा लावला बुवा? अमृतांजन ची मी वाचलेली संबंधीत वाक्ये अशी आहेत. चु.भु.घ्या.द्या. >>>१. हा किडा प्रत्येक इंजिनियरच्या डोक्यात जरी वळवळत नसेल तरी ८०% हे प्रमाण मानायला हरकत नसावी. --भारतातील ८०% विद्यार्थी व्यावसायीक होतात असे लिहीले नाही. >>>माझ्या वर्गातील ६० पैकी ८०% लोकं बिलो-ऍव्हरेज होते; त्यातील ५०% लोकांचे आज सुस्थितीतील व्यवसाय आहेत. --म्हणजे वर्गातील ६० पैकी ८०% बिलो एव्हरेज. त्यापैकी सुस्थितील व्यवसाय असणारे ४०%. --त्यांचा वर्ग म्हणजे भारताचा प्रातिनिधीक गट मानावा असे तुम्हाला म्हणायचे आहे कां?

In reply to by अरुण मनोहर

त्यांचा वर्ग हा जर प्रातिनिधिक मानु नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या उदाहरणाचे कारण कळले नाही.

ज्याच्यासाठि degree मिळाल्यावर नोकरी तयार आहे तो फार क्वचित धन्दा करण्याचा विचार करतो ! आणि family business बद्द्ल मला तरी अस वाट्त कि ज्या पोरानी बापाला struggle करताना पहिल आहे आणि त्याच्यामुळे घरात problems फेस केले आहेत तो नोकरी करणे जास्त पसन्त करेल!

बर्‍याच जणांच्या मनात येतं. बिझिनेस कधी सुरु करावा ह्याबद्दल मतं वेगवेगळी असतील कारण तुमचं वैयक्तिक कौशल्य, तुम्ही ठरवलेला बिझनेस, भांडवल, जागा, मार्केट इ.चा विचार हा किती ठोस आहे त्यावर तुम्ही उडी कधी मारायची हे ठरतं. माझी मते- १ - शक्यतोवर अशी नोकरी बघा की तिथे तुम्हाला निरनिराळ्या जबाबदार्‍या घेता येतील. तुमच्या कागदोपत्री कामात जरी त्याचा समावेश नसला तरी तीही कामे आवर्जून करा. २ - फक्त ऑफिसचे काम न करता बाहेरच्या जगाशी संपर्क असेल अशी कामेही असूद्यात - परचेस, सेल्स, कस्टमर सपोर्ट, व्यवसायातले स्पर्धक, जाहिरात इ. त्याने तुमची पडद्यामागच्या गोष्टी समजून घ्यायची कुवत वाढते. ३ - तुम्ही जिथे नोकरी करता आहात तिथेच तुम्ही एखादे पुरवठादार म्हणून काम सुरु करु शकता का ह्याची चाचपणी करा उदा. माझ्या एका मित्राने तो काम करत असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉवर सप्लाय बनवणार्‍या कंपनीतलीतलीच छोटी छोटी कामे स्वतःच्या उद्योगात करायला सुरुवात केली. जुन्या कस्टमर्सच्या सरप्लस ऑर्डर्स जी त्याची मोठी कंपनी पूर्ण करु शकत नसे त्या तो पूर्ण करायचा. असे त्याने जवळपास ३ वर्षे केले. धंद्यात जम बसला, नाव झाले, थोडे पैसे मिळू लागले मगच स्वतःची मोठी कामे सुरु केली. ४ - कामातला प्रामाणिकपणा आणि सचोटी. ही हवीच. पूर्ण बुडून जाऊन काम करायला हवे. त्याकरता इतर नोकरीवाल्या मित्रांना थोडे लांब काही काळ ठेवावे लागेल कारण तुम्हाला ठराविक वर्किंग अवर्सची बांधिलकी परवडणारी नसते! ५ - पैसा फिरता ठेवणे - कामातून आलेला पैसा हा पुन्हा कामातच जायला हवा. तुम्ही तुमच्याच कंपनीत नोकरी करत असलात तर किती पगार घेतला असता तेवढेच पैसे पगार म्हणून घ्या, काटकसरीने भागवा. लोक तुम्हाला काय म्हणतात ह्याकडे चक्क दुर्लक्ष करा! बहुतेक वेळा मराठी माणसाचा धंदा बुडण्याचे कारण तो धंद्यातले पैसे 'स्वतःचे' म्हणून वापरायला काढतो आणि त्याला स्टेटस दाखवण्याची घाई झालेली असते त्यामुळे भांडवलाचा गळा आवळला जाऊन धंदा अकाली घुसमटतो! ६ - खर्च नियंत्रित ठेवा. सेकंडहँड मशीनरी, सेकंडहँड दुचाकी वापरा. जुन्या बाजारात अतिशय चांगली इक्विपमेंट्स, अवजारे असतात तुमच्या कामासाठी लागणारी अशी साधने अतिशय अल्प किमतीला तुम्हाला मिळू शकतात, जुजबी दुरुस्तीनंतर ती तुमच्या कामी येतात. फक्त जरा माहीतगार अनुभवी व्यक्ती तुम्ही सोबत न्या कारण तिथेही भरपूर चालबाजी असते! ७ - कस्टमर लोकांचे फसवणे, पैसे न देणे. हे अनुभव काही वेळा येणारच त्याने हटून चालणार नाही. पण असे लोक ओळखायला शिका. साधारणपणे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक समान धागा असतो. त्यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता. त्यांना माल देणार्‍या इतर ठिकाणी चाचपून बघू शकता.. ८ - तारतम्य - परखड मत कुठे व्यक्त करायचं आणि गोड कुठे बोलायचं हे समजणं ह्यात धंद्याचं निम्मं यश असतं! ९ - 'नथिंग इज फ्री इन थिस वर्ल्ड' हा मंत्र विसरू नका! सध्या इतकेच. तुम्हाला शुभेच्छा!! चतुरंग

असे सगळ्यांना वाटते का कि आपण कि काही करावे ? मला तरी वाटते. Network 18 तर्फे Entrepreneur हे मासिक भारतात प्रसिद्ध होतें. नोव्हेंबर/०९ चा अंक वाचण्यासारखा आहे. ५०,००० रुपयांमध्ये तुम्ही कुठले व्यवसाय करु शकता ह्याची त्यांनी तपशीलवार माहिती दिली आहे. किडा अजुनही वळवळत असेल तर- आपली उपजत आवड आणि मिळणारा अनुभव्/कौशल्याच्या बळावर खालील व्यवसाय करता येतील. १)शिकवणी घेणे-Tutoring service, हा शब्द छान वाटतो!!.दहावीच्या विद्यार्थ्यांपासुन ते पदवीधर होइपर्यंत अनेक जण शिकवणी लावतात्.मोठ्या शहरांत काही जण तासाला ३०० रुपये शिकवायला घेतात.स्पर्धात्मक परीक्षांसाठी लोक जेवढी फी देतात ते पाहिलेत तर हा व्यवसाय खूप तेजीत आहे हे लक्षात येईल. २)दुचाकी निरोप्या से॑वा- काही पाश्चिमात्य देशांत ही bicycle messenger service लोकप्रिय आहे.सहसा कुरियर कंपन्या कुरियर शहरातल्या शहरात पोचवायलाही २४ तास घेतात्.भारतात अजुनतरी अशी सेवा नसावी.गर्दीच्यावेळी सायकल लवकर जावू शकते,पार्किंगचे वगैरे अडथळे नसतात्.प्रत्येक कुरियरमागे २०-२५ रुपये कमीशन घेतले ,५० कुरियर पोचवली तर ४५,००० रुपये महिन्याला मिळू शकतात. ३) Wedding planner(विवाह आखणी?)-१,९०,००० कोटी रुपयांची भारतात उलाढाल असलेला हा व्यवसाय कायम तेजीत राहणारच्. लेंमॅन ब्रदर्स कोसळोत वा पुन्हा उभे राहोत, विवाह होणारच!! अन्न पुरवण्याचा व्यवसाय्,सजावट अशा अनेक उपव्यवसाय त्यात आहेत. बरेचजण प्रसंग व्यवस्थापनाचा कोर्स करतात. ४)ज्येष्ठ नागरिक सेवा-नोकरी धंद्या निमीत्त ज्यांची मुले घरापासून दूर आहेत अशा ज्येष्ट नागरिकांना सेवा पुरवणे.ह्यांत भांडवल कमी लागेल.विश्वासू माणसे हाताखाली हवीत. आय.टी.त असाल तर web-startup चालु करता येईल पण आयडिया चांगली हवी आणि तंत्रज्ञान चांगले अवगत पाहिजे. Start with small and simple असे जाणकार म्हणतात.! भेंडी. P = NP

चांगला धागा. बरीच माहिती कळली. पण मी स्वतः या भानगडीत पडण्याची शक्यता तशी कमीच वाटते. :( बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद अमृतांजन चतुरंग आणी भेंडीबझार ... मनापासून इंटरेस्ट घेवून जर कोणी केला व्यवसाय करणार असेल तर तो व्यवस्थित/चांगला/ नफा देणारा व्हायची शकयता जास्त आहे .एखादे काम करण्याची प्रबळ इच्छा आणि आणि एखादे काम योग्य रीतीने करण्याची क्षमता या वेगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे बिझनेस व्यवस्थित व्हायला चांगली आईडिया आणि त्या आयडिया वर काम करण्याची क्षमता दोन्ही पाहिजे ...पण शेवटी थोडी रिस्क घेतल्याशिवाय कसे कळणार.. मी खालील फोर्मुला असेच नेट वर वाचत असताना कुठे तरी पहिला होता आणि तो एकदम पटला बिझनेस = आईडिया X एक्ज़िक्युशन वाईट आईडिया= -1 साधारण आईडिया=1 उत्तम आईडिया = 5 उत्तम एक्ज़िक्युशन = १,००,००,००० साधारण एक्ज़िक्युशन = १०,००,००० वाईट एक्ज़िक्युशन=१०

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

अल्केमिस्ट हे पुस्तक जे सांगते, ते आचरणात आणणे फार महत्वाचे ठरते. बिझनेस करतांना मन एकाच गोष्टीत गुंतून चालत नाही, बिझ-स्टॅटेजी जिथे संधी त्याप्रमाणे लवचिक ठेवणे हिताचे ठरते.

माझा Orbital welding machine & special purpose welding machines व्यवसाय आहे. मना पासुन वाटत असेल तर व्यवसाय करावाच. व्यवसाय करण्यासाठी पॅशंस खुप लागतात. काही तरी वेगळ ,आणि स्पर्धा नसलेल प्रॉड्क्ट हुडकुन काढावे. स्वत:च प्रॉडक्ट असाव. एकाच कंपनी वर कधी ही अवलंबुन राहु नये. एकाच प्रॉड्क्टवरही अवलंबुन राहु नये. खर तर खुप काही लिहण्या सारख आहे. पण नंतर कधी तरी लिहीन. आनंद

मित्रा..तू व्यक्त केलेले विचार बर्याच औंशी माझ्या विचान्र्शी जुळतात.कारण मी पण तुझ्याच क्षेत्रात काम करत असून..माझे पण वय साधारण तितकेच आहे ...माझ्या पण डोक्यात असाच किडा वळवळत आहे.!!.....