Skip to main content

पाव (हमखास - भारतातल्यासारखा + फोटो)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 17/02/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर मिसळीच्या अनेक कृती दिसल्या पण पाव कसा करायचा याची एखाद-दुसरीच दिसली. अर्थात तुम्ही भारतात राहात असाल तर भाग्यवान आहात - या कृतीकडे सरळ डोळेझाक करा व बेश जवळच्या उत्तम बेकरीतून ताजा पाव आणा. पण अमेरिकेत राहाणार्‍या आम्हा दुर्भाग्यांना तसा उत्तम पाव मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आंतर्जालावर मिळणार्‍या कृतींमध्ये खूपच कमतरता असतात हे मी अनुभवाने जाणले. गेल्या दोन महिन्यात वीस ते पंचवीस वेळा पाव करण्याचा प्रयत्न करून (त्यात काही विटाही झाल्या !) शेवटी ही नक्की केली. इंजिनीअरींगच्या प्रोसेस ऑप्टिमायजेशनच्या ज्ञानाचा इथे फार उपयोग झाला.

गुलाबफुलाचा गाभा

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 17/02/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर मिपा वर फोटो चढवून बघण्याचा हा प्रयत्न आहे. खाली चढवत आहे एक फोटो गावठी गुलाबाच्या गाभ्याचा.

ओरेगनचा समुद्र किनारा

लेखक amitbapat यांनी बुधवार, 17/02/2010 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरेगनच्या समुद्रकिनाऱ्यावर एकदा हायकिंगसाठी गेलो होतो. तेव्हा काही फोटो काढले, त्यातलाच हा एक. आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.

<फालतू धागे आणि विडंबने>

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 16/02/2010 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात? तो - नाही ती - अरसिक कुठचा! तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;) ती - चूप्प . एकदम चूप्प!! तो - तुला कुठे विडंबने आवडतात? ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं? तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं ती - तुझी विडंबने लई खवट आहेत. तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत? तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :) ती - अजून काही?

हडसर ऊर्फ पर्वतगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 16/02/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
१० दिवस आधी ठरलेली २ दिवसांची नागाव-काशिद-दिवेआगर सहल मित्रांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली. पण घेतलेली सुट्टी तर रद्द करता येत नाही मग त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी आणी माझा आत्येभाऊ असे दोघे जण शनिवार दि. १३ ला पहाटे ५.४५ वाजता हडसर उर्फ पर्वतगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. अर्थात रात्रीच सगळे जाण्याचे नियोजन करुन ठेवले होते. सकाळी ६.२० ला नाशिकफाट्यावरुन एसटी बस मिळाली. ७.४५ पर्यंत नारायणगाव व तिथून जीपने ८.१५ पर्यंत जुन्नर. वाटेत मानमोडीची लेणी लक्ष वेधून घेत होती. जुन्नरला महाराजांच्या जन्मस्थानाला खालुनच अभिवादन करून आम्ही ९.१५ च्या राजूर नं. १ च्या एसटी बसने निघालो.

मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती!

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 16/02/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेपी यांची 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा' ही लेखमाला वाचल्यावर सतत क्रिकेटवर काहीतरी लिहीण्याची खुमखुमी होत होती. आणि त्यात काल वीरू व सचिननं तर आज लक्ष्मण व धोनीनं शतकं झळकावून आयताच विषय पुढ्यात ठेवला! क्रिकेटवरचं लिखाण म्हणजे साहेबांचा उल्लेख हा आलाच! आमच्यासाठी ईशस्तवनच ते! साहेबांवर कितीही लिहीलं तरीही कमीच.. "निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू॥ अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥" हे शब्द आपल्या साहेबांच्या बाबतीतही लागू पडतात. गेली अडीच वर्षं तो उत्तम क्रिकेट खेळतोय आणि टीकाकारांना त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर आहे हे! एकामागून एक धावांचे आणि शतकांचे मैलाचे दगड ओलांडत चाललाय..

तुझ्या मिठीच्या धुंद सरी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/02/2010 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा दुरावा घायाळ करी ओढ अनावर माझ्या उरी.. उदासवाण्या सायंकाळी नकोस छेडू आसावरी आठवताना स्पर्श तुझा हृदयामध्ये उठे शिरशिरी देहामध्ये भिनून राही नाव तुझे रे रूधिरापरी दिठीमध्ये भाव तुझे अन गीत तुझे या ओठावरी चिंब करती पुन्हा पुन्हा मज तुझ्या मिठीच्या धुंद सरी - प्राजु
काव्यरस

आमच्या शाळेत भरविलेले सायन्स प्रदर्शन

लेखक शनआत्तार यांनी मंगळवार, 16/02/2010 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
photo नमस्कार आपणास मी एक आज गम्मत सांगणार आहे. आपण सगळे जण लहान मुलांना अल्लड समजतो. त्याना काही कळत नाही त्याना सगळ्या गोष्टी समजाव्याला लागतात मात्र हे सर्व साफ खोटे.आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे. आमच्या शाळेत इंग्लंड च्या न्यु कासल विश्वविद्यापीठातर्फे अनुदान मिळाले असून त्या अनुदानावर आम्ही संगण्क शिक्षण मुलांना देतो. आम्ही संगणक शिक्षण देत नसून ती मुले आपोआप आपणच त्या संगणक प्रयोगशालेत स्वःता शिकत असतात.