Skip to main content

अस्सल मद्य

लेखक अप्पा जोगळेकर यांनी शनिवार, 27/02/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राचे कुटुंब माहेरी गेले होते. त्यानिमित्ताने आम्ही मित्र त्याच्या घरी दंगा करण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा त्या मित्राने जी 'रॉयल स्टॅग' आणली होती तिची चव नेहमीपेक्षा खूपच वेगळी आणि रुचकर होती. त्याने ती क्रॉफर्ड मार्केट्मधून आणली होती. त्याचे म्हणणे असे की एरवी आपण डोंबिवलीत जी दारु पितो ती डुप्लिकेट असते व्हेअराअ‍ॅस ही प्युअर आहे. त्या क्रॉफर्ड मार्केट मधल्या दुकानाचे नाव पी. के. वाईन्स असे आहे. या बाबतीत कोणी तज्ञ मंडळी आणखीन प्रकाश टाकतील काय ?

जाते म्हणतेस...................

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 27/02/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
जाते म्हणतेस................... जाते म्हणतेस हरकत नाही ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही मनी आज फक्त एकदा तरी राहून जा भातुकली मोडतेस हरकत नाही पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा हसते आहेस हरकत नाही माझी बुडती नाव पाहून जा जाळत आहेस हरकत नाही जळणारे माझे गाव पाहून जा छळत आहेस हरकत नाही माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................ मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस

पूजेची पथ्ये

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 27/02/2010 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नाडीपरीक्षेवरील एका अनमोल लेखात खालील चमत्काराविषयी वाचले. खालील विधानांकडे टारझन यांच्या एका टिप्पणीमुळे आम्हाला नवीन दृष्टीकोनातून बघता येऊन त्याचा गर्भित अर्थ जाणून घ्यायला मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला.

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/02/2010 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन. तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

हे श्लील की अश्लील?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 26/02/2010 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
याज्ञवल्क्य स्मृती मध्ये असलेल्या याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादात एक वाक्य आहे. ते असे - सर्वेषामानन्दानामुपस्थमेव निधानम् | अर्थ - जननेन्द्रीये ही सर्व आनन्दाचे मूळ स्थान आहेत. आता हे मला सांगा की हे विधान श्लील की अश्लील?

नवीन मराठी संस्थळ- http://thinkmaharashtra.in/

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/02/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकर, येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे. मी आणि तात्या याप्रसंगी होणार्‍या चर्चेत सहभागी होणार आहोत. मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे. सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे. समस्त मिपाकर आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती. आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.) आमंत्रणाची प्रत देत आहे. धन्यवाद. ************************************************************************ मा.

Ted .com चा वापर व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी

लेखक शनआत्तार यांनी शुक्रवार, 26/02/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपण मला माझ्या लेखनाला चांगली दाद दीली त्या मुळे मला माझे प्रकल्प सर्वांपर्यंत पोचवण्यास नवा हुरूप आला. मित्रांनो मी या वर्षी राबवीत असलेल्या एका प्रकल्पा बाबत आपणास थोडक्यात माहीती करून देणार आहे. माझा हा प्रकल्प मी शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता देवगड या ग्रामिण भागात असणा-या शाळेतील इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या मुलांवर मी राबवत आहे. मित्रांनो माझ्या या प्रकल्पासाठी मी २२ विद्यार्थी व १२ विद्यार्थीनी अशी एकूण ३४ विद्यार्थी सहभागी आहेत. हा माझा प्रकल्प शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी आम्ही राबवत असतो.

हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्‍या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 26/02/2010 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
  • परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
  • या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते?

अरे हे काय चाललंय तरी काय?

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/02/2010 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण जर खरी असेल तर माझा विनाशकाल जवळ आला असावा कारण नुकतीच मला कशी कोण जाणे पण विपरीत बुद्धी झाली. त्याचे परिणाम इतके वाईट झाले आहेत की मी त्या विनाशकाळाची आतुरतेने वाट पाहातो आहे. त्याचं असं झालं की मी म्हटलं भारतातून काही पुस्तकं मागवण्याची सोय आहे - तर मिपाकरांनाच विचारू, कुठची पुस्तकं वाचण्याजोगी आहेत ते. साधासुधा विचार पण एक साधी चूक कशी भोवू शकते याचा हा उत्तम नमुना आहे. मी सरळ मागचापुढचा विचार न करता काथ्या कुटायला टाकला. नव्वदोत्तरीतील वाचनीय/संग्रहणीय साहित्य. हळुहळू एकेक प्रतिसाद यायला लागले.