Skip to main content

अंतर

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 05/03/2010 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंतर शब्दांच्या सुंदर जाळ्यात मला अडकवू नकोस वचनांच्या खोल बंधनात उगा बांधू नकोस बोटात बोटे गुंफून दोघे हवे तेवढे फिरू मनगटाभोवती मात्र कधी नकोस हात धरू सहज सुटण्याइतकी दोघांतली सैल गाठ नको पण श्वास कोंडेल असा घट्ट गळफासही नको रागावू नको, माझी प्रेमाची कल्पना जरा निराळी आहे फक्त भावनांचा रस नाही अनुभवाचं सारही आहे शेवटी काही असले तरी तू 'तू' आहेस, मी 'मी' आहे दोघेमिळून 'आपण' असलो तरी….

मिसळपाव बंद होणार----

लेखक साईली यांनी शुक्रवार, 05/03/2010 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
:''( मिसळपाव बंद होणार---- मग काय करणार ? स्वयंपाक वेळीच होणार, मुलांचा अभ्यास होणार वेळेवर सारे झोपणार, अन् वेळेवर उठणार, रिकामे रिकामे वाटणार, वेळच वेळ उरणार, आता बाजारात जाणार, भाजीपाला आणणार, पिसीची सात सुटणार, अभ्यास चांगला होणार, सुयश पुन्हा मिळणार, आई नाही बोलणार, कुणी नाही टोकणार, हे सारे खरे पण ---- नवे मित्र नाही मिळणार, कविता कुठे टाकणार ? व्यासपीटाला मुकणार, दिवस मोठा वाटणार, रात्र खायला उठणार, मन रिते रिते होणार, आनंदाला मुकणार, कुठे कुठेसे जाणार ! गादया किती तुडविणार ! मग ठाण्याला गर्दी होणार, तिथे ही रांग लागणार, मग डाकटर संप करणार, मोर्चे ते काढणार, गुगल गु

रेज

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 05/03/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला दोन दा तज्ञांकडुन तपासणी. शाळेच्या जाहिरातीतील एक वाक्य. कुतुहल वाढले. बघुया काय प्रकार आहे ते. फोन लावला. समोर ज्या कुणी अधिकारी होत्या त्याना प्रश्न विचारला. "कसली तपासणी हो? ती सुद्धा आठ्वड्यातुन दोन दा" We talk to students to find out any presence of uncontrolled rage, dent in personality not noticed by parents. कुठल्या यत्तेतील? From first standard onwards, बाई म्हणाल्या. कसले प्रश्न? उदाहरण म्हणुन एखादा सांगा. Like Who is your favourite actor.? एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर? We conclude that the child is having tilt towards violence. कोण आहेत हो ट्रस्टीज.

समर्थांना पत्र

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 05/03/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
ओम नमो गजानना | आणि समर्था तुम्ही सुद्धा || ऐकुनी घ्या भगवंता | या पाप्या चे बोल || करू कशी सुरवात | नं कळे मला मनात || ना शिरता अति खोलात | करितो दहा श्लोकी शेवट || ऐकिला का ऐसा देश | सर्व धर्मांचा चालतो पाश || अभिमानाचा नाही लवलेश | लाज वाटते सांगाया || (समर्थांना हे सांगण्यास मला लाज वाटते..

कर्मण्येवाधिकारस्ते . . .

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 05/03/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
छोटेखानी जुना बंगला अन् त्यातला म्हातारा मालक . . आपल्या परदेशस्थित मुलाच्या चार दिवसाच्या वास्तव्याच्या तयारीत . . अंगणभर विखुरलेल्या पानांचा पसारा झाडताना बघतो फाटकाला बिलगलेल्या मधुमालतीच्या वठलेल्या वेलीच्या खोडाकडे . . आणि विषादाने हसत परत झाडू लागतो फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची कर्मयोगी पायवाट . . . पानांचे मळभ हटल्यावर मोकळी . शुष्क पानगळ सुरुच राहते. गोळा केलेली ढिगाराभर पाने, पेटवून देऊन थांबतो म्हातारा धगीपाशी लवलवणार्‍या ज्वाळा बघून विषादाने हसतो आणि स्वतःलाच म्हणतो गतिमान काळाच्या चक्रात अगतिकपणे बांधून घेतलेला तुझा मुलगा, कधीतरी . .

ती....

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 05/03/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंताने दिली आहे ती माझ्यासाठी, माझी आहे ती.. नक्कीच तुमच्या कडेही असेलच ती.. प्रत्येकाकडे असतेच ती; तिचे अस्तित्व ती नसली तरी असते, सतत अवती भोवती जाणवत असते... मनाच्या गाभार्‍यात, खोल कुठेतरी काळजात ती आहे हा विश्वास असतो.. एक अनामिक ओढ असते! एक अनाकलनिय हुरहुर, एक न सांगता येणारी उर्मी.. भर उन्हात एक झुळुक गारव्याची ही म्हणजे जणु देव्हार्‍यातली समई, स्वतः जळुन प्रकाश वाटणारी, नमस्कार करणार्‍याला दिशा दाखवुन नामानिराळी राहणारी.. भक्ताची नाळ देवाशी जोडुन देणारी!! किती रुपे तिची, प्रत्येक रुपात नविन असते ती!

चंदनाचे जीवन

लेखक moghe यांनी शुक्रवार, 05/03/2010 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
चंदनाचे जीवनच असं असते, नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते स्वत: मरत असला तरी, लोकांसाठी जगायचे असते नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं नको असलेली काही नाती आयुष्यभर वागवावी लागतात, आणि मनात जपलेले काही बंध आयुष्यभर अबोलच राह
काव्यरस

खांडवी

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 05/03/2010 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-एक वाटी इडली रवा(तांदूळ रवा),अर्धा वाटी खोबरे,एक वाटी गूळ्,दोनवाट्या दूध,थोडी वेलची पूड ,एक चमचा तूप. कृति--प्रथम तुपावर रवा भाजून घ्यावा,त्यात गरम दूध ओतून शिजवून घ्यावा,साधारण शिजत आल्यावर त्यात खोबरे,वेलची पूड्,गूळ घालून घट्ट होइपर्यंत मिश्रण हलवावे.ताटाला तूपाचाहात फिरवून मिश्रण ओतावे,गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.