Skip to main content

नाडी घ्या नाडी

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/04/2010 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्राँग स्ट्राँगर स्ट्राँगेस्ट डिस्क्लेमर: हे लेखन केवळ मौजमजेसाठी आहे. कोणाचाही वैयक्तीक नावे घेण्याचा उद्देश नाही. मिपा अन इतरत्र असलेली नावे अन या लेखात असलेली नावे, त्यांच्या स्वभावांचा, वैशिष्ठ्यांचा गुणधर्मासहीत कोणास समान वाटत असतील तर तो योगायोग समजावा. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाही. तरीही काही हेवेदावे, तक्रार अर्ज असतीलच तर ते नाडी (आमचीच) पाहूनच सोडवीले जातील.
काव्यरस

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/04/2010 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
सिच्युयेशन: आपल्या हिरो चं रसाचं दुकान हाये. त्यो रस काढत आसतो. तवाच हिरवीन तहानेनं व्याकूळ होवून त्याच्या दुकानी येती. उन्हामुळं हिरवीन पानी प्याया मागते. हिरो तिला रसाच्या दुकानात पाहूनशान लय गोंधळून जातो. त्याला काय करावं त्येच समजत नाय.
काव्यरस

फ्लॅशबॅक

लेखक jaypal यांनी सोमवार, 05/04/2010 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
निव्वळ वासाने/गंधाने सुद्धा मी नास्टालजिक होतो. कुणाला मातीचा वास, तर कुणाला फ़ुलांचा वास आवडतो. कुणाला फ़ळांचा आवडत असेल तर कुणाला आजुन कश्याचा वास/गंध आवडत असेल. मला खुप विविध गंध आवडतात. पेट्रोल च्या धुराचा, फ़टाक्याच्या धुराचा. कुठेही व कधीही फ़टाक्याच्या धुराचा वास आला की लगेच मला माज़्या बालपणाच्या दिवाळीची आठवण येते. मुसळधार पावसात आडोश्याला म्हणुन बंद दुकानच्या पायरीशी उभ -हाव आणि कुठुनतरी जळत्या सिगरटेचा वास यावा. या पावसाळ्यात भिजताना तर खुप भास होतात आल/गवती चहाचा नाही तर कांदाभजीच्या तळणाचा खमंग वास हमखास गारुड घालतात मनावर.

संचित

लेखक shaileh vasudeo pathak यांनी सोमवार, 05/04/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
संचित मी शोधितो आधार माझ्या जन्माचा कि भोगावया आलो मी भाग संचिताचा शौर्यास भेटली जेथे लज्जा प्रणयात् माझ्याच जाणिवेची होती ती सुरवात देहात नव्या होता संस्कार गतजन्माचा कि भोगावया आलो मी भाग संचिताचा लाभली मोहक कांती डोळ्यांमध्ये तेज वैभवात नटले आहे स्वरांसूराचे साज सहज का लाभावे असेल योगी मी जन्मांचा कि भोगावया आलो मी भाग संचिताचा रोज खुणावते एक मृग का गिरीशिखरावरती का ओळखिची वाटे मज वाट ही वैराग्याची आता न मन रमावे मोहात संसाराच्या कि भोगावया आलो मी भाग संचिताचा (स्वरचीत. हक्क संरक्षित) शैलु.
काव्यरस

आस ! जन्मो जन्मीची ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 05/04/2010 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आस ! जन्मो जन्मीची ! ! मस्तीत होतो मी बरा, का साद मजला घातली ? ना जंर होणार माझी का आस वृथा हि दाविली ? याद तव नाही असा, क्षण एकहि न पाहिला. वेदनांचा अधिकार मजला तोही तू ना ठेविला ! घेवूनी सल ही उरी, जन्म हा काढू कसा ? वेदनांचे शब्द हृदयी जपुनी मी ठेऊ कसा ? लागले नेत्र पैलतीरी अता, कुरवाळू कुठवर यातना. तोडून बंध सारे तू, ये मज आता भेटण्या ! ! ना जंर तू मज भेटली येईन परतुनी मी पुन्हा, घेउनिया जन्म दुसरा शोधित तव पाऊलखुणा ! ! ! निरंजन वहाळेकर
काव्यरस

अशी करावी काटकसर! ;-)

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 05/04/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :) तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते.

देशातील गरिबी आणि गहजब

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 05/04/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. देशातील गरिबी आणि गहजब हा दै. सकाळ १ एप्रिल २०१० मधील राजीव साने यांचा लेख नेहमी प्रमाणे त्यांच्या अनुमतीनेच येथे चर्चे साठी घेत आहे. हा विषय बराच काळ माझ्या मनात रेंगाळत होता.

श्रद्धांजली

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 05/04/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर , सप्रेम नमस्कार ! ३ एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी होती.परंतु ऑफिसच्या कामाने बाहेरगावी असल्याने लेख पाठवू शकलो नाही , तो आज पाठवत आहे. श्रद्धांजली..... आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी !

चित्रपट पाहणे: घरी, चित्रपटगृहात आणि आता पुन्हा घरातच

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 05/04/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.