Skip to main content

बाप आणि मुलगी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 13/04/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहायला मिळालेली एक सुरेख अ‍ॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी! ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!

तुम्ही पाहीलेले अति टुकार चित्रपट

लेखक मराठे यांनी मंगळवार, 13/04/2010 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मराठीत आणि हिंदीत वेगवेगळ्या विषयावरचे फार चांगले चित्रपट येउ लागलेले आहेत. पण त्याच बरोबर कधी कधी इतके पाच्कळ आचरट सिनेमेपण येतात. आणि कधीतरी एखाद्या गाफिल क्षणी आपण ते बघतो सुद्धा... नंतर आपण अमूक एक सिनेमा पाहिला हे चारचौघांसमोर बोलायची पण शरम वाटते. उदाहरणार्थ, हे सिनेमे मी (का?) पूर्ण पाहीलेले आहेत (प्लीज कुठे सांगू नका) दिल बोले हडिप्पा, पेईंग गेस्ट (नवा), वगैरे... तुम्हाला असं काही कन्फेशन करायचं असेल तर इथे टाका. त.टी. (१) : तुम्ही जे काही सांगाल ते ह्या संस्थळाच्या चार व्हर्चुअल भिंतिच्या आत राहील (अशी कोणतीही ग्यारंटी नाही) त.टी. (२): त.टी. म्हणजे तळटीप (उगाच कल्पना लढवू नका)

बेबी ब्लॅंकेट

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 13/04/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मैत्रिणीचा या विकांताला बेबी शॉवर आहे. तिच्या बाळासाठी विणलेले बेबी ब्लँकेट.

शेत देईल पिवळं सोनं

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/04/2010 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
शेत देईल पिवळं सोनं
एक दिलानं काम करूया, झाडून सारे घाम गाळूया हात उचला बिगीनं रं बिगीनं शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
रांग धरा ही आडवी आडवी पुढे जायची मारा मुसंडी आडवं करा रे पिक त्यातून शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
विळा चालवा सरसर सरसर, कणसं आणा खळ्यात झरझर रास करा उफनूनं दाणं रं दाणं शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
थ्रेशर चाले थडथड थडथड
काव्यरस

गझलचे छन्द्शास्त्र...

लेखक प्रदीपा यांनी मंगळवार, 13/04/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर गझल वर बरच काही वाचायला मिळाले... मनात आल, आपल्याला माहीती असलेल बा़कीच्याना ऐकवाव. नाहीतरी समर्थ सान्गुन गेले आहेत ..जे जे आपणासी ठावे, ते ते दुसर्याशी सान्गावे, शहाणे करुन सोडावे - सकल जन... तर... असो!... आता जरा ह्या शेराकडे लक्श द्या. ' तोच रस्ता त्याच वाटा, चालतो आहे नव्याने .. तीच दु:खे, त्याच जखमा सोसतो आहे नव्याने' .....कसा आहे? अजुन एक पहा.... ' रस्ता असा मिळाला कोठेच झाड नव्हते, माझ्याच सावलीवर आता विसावतो मी' अथवा... ...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी . आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...' जबरदस्त आहे ना? ....लोकहो, गैरसमज नको...

स्नान

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/04/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचे स्नान ह्याचे नाना प्रकार आहेत...काहि लोक रोज सकाळी अंघोळ करतात तर काहि संध्याकाळी..काहि ना गरम पाण्या शिवाय होत नाहि तर काहि गार पाण्याने अंघोळ करतात... मला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडति... पुण्याला होस्टेल मधे रहात होतो त्या वेळी गरम पाणी हि चैन होति..त्या मुळे वेळ मिळेल तसा गार पाण्याने स्नान करायचो... कारखान्यात कामाला होतो त्या वेळी शॉप फ्लोअर वर काम असायचे ..अंगावर ऑइल, चे सुक्ष्म फवारे उडायचे..ग्रिज, सा~याने आंग अंबुन जायचे म्हणुन कामावरुन सुटलो कि परत आंघोळ करुन फ्रेश व्हायचो... माझ्या पहाण्यात असे बरेच स्त्री पुरुष आहेत जे १२ महिने गार पाण्याने स्नान करतात... आपली स्नानाच

माणुसकी

लेखक मानस् यांनी सोमवार, 12/04/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ऑफिसला येतानाच प्रसंग, साधारण ११-११:३० ची वेळ होती. ट्राफिकचा त्रास नको म्हणून मी मुद्दाम थोडया बाहेरच्या रस्त्याने बाईकवरून निघालो होतो.उन प्रचंड होतं. थोडं पुढे आल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्याच्या कडेने एक वृद्ध जोडपं चालताना दिसलं.दोघेही खूप थकलेले होते.अंगावर जुने मळके कपडे,आज्जीबाईच्या हातात कसलस एक गाठोडं.आजोबांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हाताने आज्जीबाईना आधार दिलेला.मी क्षणभर मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं,घामाने थबथबलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजून मला स्पष्ट आठवतायत, मनात विचारांचं काहूर उठलं.कोण असतील हे ?

मोबाईल घेण्यासाठी मदत हवी आहे

लेखक वेडा कुंभार यांनी सोमवार, 12/04/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, मला थोडी मदत हवी आहे. मला एक टच स्क्रीन मोबाईल घ्यायचा आहे. माझे बजेट ७००० ते ८००० आहे. मला तीन फोन आवडले आहेत, पण त्यातला कोणता निवडू ते कळत नाही आहे. तुमच्या सारख्या तज्ञ लोकांची मदत अपेक्षित आहे. १. नोकिया ५२३३ २. samsung corby ३. LG Cookie पेप जर ह्या व्यतिरिक्त एखादा चांगला फोन असेल तर ते सुद्धा सांगू शकता.

भटकंती निळकंठेश्वर परीसराची

लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 12/04/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असुनसुद्धा आपल्याला माहित नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहित होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "निळकंठेश्वर".