'जांगडगुत्ता' हा शब्द मी लिहिला आणि बहुतेकांना त्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
हास्यसम्राट१ मध्ये मिर्झा बेग हे सदगृहस्थ स्पर्धक म्हणून होते, ते त्यांच्या विनोद सादरीकरणात जांगडगुत्ता शब्द आवर्जून वापरीत. तेव्हा त्यातून व्यक्त होणारा अर्थ- मोठा गोंधळ, गडबड, गहजब असा असे. 'तुमचा काहीतरी जांगडगुत्ता चाललेला दिसतो' अशा वाक्यातून गौडबंगाल, भानगड, कटकारस्थान असाही अर्थ ध्वनित होई. फार फार तर जांगड म्हणजे भलामोठा, भयंकर, जबरदस्त आणि गुत्ता म्हणजे गुंता, गोंधळ अशी या शब्दाची फोड करता येईल.
काही शब्द मोठे मजेशीर असतात. कोठेतरी,काहीतरी वाचतांना आपणाला अचानक भेटतात, अचंबित करतात,मिश्किलपणे हसवतात.