पक्कीची पहिलीवहिली गोष्ट
गोष्ट आहे पक्कीची. आधी तुम्हाला पक्की कोण त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पण पक्कीला वेडा ठरवून त्याच्या गोष्टी वाचणार नाहीत. पक्कीची पक्की ओळख झाली की मग तुम्ही त्याचे फॅन व्हाल!
पक्की ऊर्फ पक्या ऊर्फ प्रकाश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वय किती? तो कितीवीत शिकत आहे? कुठल्या शाळेंत जातो? मला नका विचारू कारण त्याची उत्तरे मला माहीत नाहीत. कधी कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे. कधी कधी त्याच्या निरागस वागण्याने तुम्हाला वाटेल की तो पाच सहा वर्षांचा असावा. तुम्हीच ठरवा.
मिसळपाव