कसब, फाशी आणि फायदे-तोटे
चला! एकदाची त्या युद्धखोर कसबला फाशीची शिक्षा सुनावली गेली. भारतीय संघराज्यविरूद्ध त्याने पुकारलेल्या युद्धाबद्दल भारतीय कायद्याप्रमाणे कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. कसबला फाशी व्हायला हवीच होती असे मलाही वाटते. मात्र मला असे वाटण्याचे कारण माझ्या अतिरेक्यांविरूद्धच्या तीव्र भावना आहेत.
हा भावनावेग बाजूला ठेवला व राष्ट्रप्रेमापलिकडे थोडं डोकं शांत ठेऊन बघितलं तर डोक्यात अनेक प्रश्न उभे रहातात. त्यावरच मला लोकांची मते जाणून घ्यायची आहेत.
१. कसबला फाशी झाली.
त्या कथेचा निषेध्,धिक्कार!!
खुप दीवसांपासुन लिहीन म्हणात होतो,तर आज लिहतो.
काही दीवसांपुर्वी Star प्रवाह ह्या गरज नसताना चालु असलेल्या वाहीनीवर "गोष्ट एका आनंदीची" ही मालिका चालु होती.ती मालिका म्हणजे मालिकांची 'मालिका' होती,म्हणजे 'गोष्ट एका लग्नाची'.नंतर "गोष्ट एका कॉलेजची"............वगैरे आणि नंतर हे "गोष्ट एका आनंदीची".
त्या कथेत आनंदी एक आंधळी मुलगी असते,दीसायला सुदंर....लग्नाच्या वयात आलेली.आई बाबांची लाडकी,त्या आईबाबांना सारखी तिची काळजी.......तिच लग्न कस होईल,नवरा हीला प्रेम देइल का,सासरची माणस कस वागवतील वगैरे.हीच ऑपरेशन करुन तिला द्रुष्टी येणार नाही अस त्यांच्या डॉ़क्टरांच मत असत.
काही काळाने तिच्या लग्नासाठी
..मैफिल..
पसरता सभोवती, धुंद केतकी हवा..
रान पेटले असे,मेघ तु मला हवा..
शिंपिता नभातले चांदणे तनावरी..
घुमु लागला मनी,पारव्यांचा थवा..
सप्तरंगी नाहता,मधाळ स्मित चुंबिता..
मनी दाटला असा,अवीट एक गोडवा..
तु मला लपेटता, श्वास उष्ण गुंफता..
मनामध्ये पसरला..धुंद कुंद गारवा..
रात्र थांबली जणु,रात्र लांबली जणु..
खेळ प्रीतीचा असा बहरला नवानवा..
मैफिलित ह्या तुझ्या तनिमनिमी गुंतले..
झंकारले मनातुनि ,बोल हेच वाहवा..
ऐक रे सख्या अता,निवांत शांत स्तब्धता..
तृप्त रोग भोगला,पुरे जाहली दवा..
अजाणता असा कसा पाय हा घसरला..
करु नकोस रे सख्या..कधी कुठे ..शू...गवगवा.
- योगेश जोशी.
काव्यरस
आईपणाचा उदोउदो
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो...
मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.
कसाबला अखेर फाशी
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी कसाब याला न्यायालयाने दोशी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.
त्याला वरील न्यायालयात अपील करु न देता लागलीच शिक्षेची अंबलबजावणी करावी .
या हल्ल्यात शहीद झालेल्याना खर्या अर्थाने आता न्याय मिळेल असे वाटते.
अमोल
-------------------------------------------------------------------------------
शांततेचं कार्टं चालु आहे ...
मित्रांनो, तुम्हाला 'शिवाजी पार्क' किंवा 'शिवतिर्थ' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येते ?
"माझ्या तमाम हिंदु/मराठी बंधु-भगिनीं आणि मातांना माझा नमस्कार" अशी साद घालुन आपल्या तडाखेबंद भाषणाची व बर्याच वेळ त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणर्या बाळासाहेब ठाकरे व आता राज ठाकरे ह्यांच्या लाखोंच्या सभा ....
भाजप-सेनेचे महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आल्यावर त्यांनी लोकांसमोर साजरा केलेला "ऐतिहासिक शपथविधी' समारंभ ...
आपल्या मिश्किल शैलीत बोलता बोलता विरोधकांना तोंडावर पाडणार्या शरद पवार ह्यांच्या लाखा-लाखांच्या सभा ....
शिवसेना आणि मनसे सारख्या पक्षांच्या स्
स्त्रीची आजची प्रतिमा - ३
लहानपणी, म्हणजे शाळकरी वयात, एके दिवशी एक हिरव्या मुखपृष्ठाचे पुस्तक हातात पडले. वाचायला सुरूवात केली... झपाटल्यासारखे पूर्ण वाचूनच खाली ठेवले. पुस्तक होते, 'अफगाण डायरी'... लेखिका प्रतिभा रानडे. वर्तमानपत्र वाचायची सवय असल्यामुळे त्याआधीही अफगाणिस्तान आणि तिथे चाललेली गडबड वगैरे नियमाने वाचत होतोच. एकंदरीतच या प्रामुख्याने पठाणांच्या देशाबद्दल कुतूहल होतेच.
'अफगाण डायरी' मधून तिथल्या समाजजीवनाचे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजमनाचे अगदी उत्तम दर्शन घडले होतेच. खासकरून तिथल्या स्त्रियांच्या जीवनाबद्दलवगैरे बरेचसे संदर्भ त्या पुस्तकात होते.
'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...
एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या.
त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते.
संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती.
अन बुद्ध हसला ...... आणि बुद्धु हसले....
अन बुद्ध हसला ...... आणि बुद्धु हसले....
..... अंगुलीमालाने मानवी अवयवांची माळा गळ्यातून उतरवली . पश्चात्तापाने दग्ध हातातील शस्त्र सोपवत बुद्धाकडे पाहिले. करुणेने भारलेली नजर त्याच्या जीवनात नवी पहाट करून गेली...... अन बुद्ध हसला.....
...... कोवळे वय आहे. सुधारकेंद्रातूल मानवीय वागणुकीने तो सुधारेल. .. मग आपल्या घरी परतेल तेंव्हा इतरांना हत्येपासून परावृत्त करेल ... भले त्याला सोडवायला त्याचे साथीदार विविध क्लुप्त्या वापरतील. कदाचित आणखी काही हल्ले होतील. त्याच्यावर कोटयवधी खर्च येईल.
मिसळपाव