Skip to main content

महाराष्ट्र प्रेम

लेखक गोगोल यांनी रविवार, 09/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी खर तर हा लेख जयंत कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र प्रेमवरील लेखाला प्रतिसाद म्हणून लिहीत होतो. पण प्रतिसाद लिहील्यावर कळले की त्यांनी (किंवा संपादकांनी) लेखच उडवून लावला. म्हणून हा प्रतिसाद येथे टाकत आहे. थोडासा प्रक्षोभाक आहे आणि मला माहीत आहे की यावर खूप हल्ला होणार (आणि कदाचित विडंबनही येणार:), पण ठीक आहे, मला जे वाटते ते मी येथे मांडतो आहे. जर चुक वाटली तर साधक बधक चर्चा करुन मला तुम्हाला काय वाटते ते पटवून द्या. सर्वप्रथम महाराष्ट्रानी भारताला काय दिले यात स्वातंत्र्यपुर्वीचा काळ समाविष्ट करणे अत्यंत चुकीचे आहे.

'चटकदार' कोल्हापुरी चहा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 08/05/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात.. महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री.

आज साठी खास..

लेखक स्पंदना यांनी शनिवार, 08/05/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार, आज ९ मे; तर आजच्या दिवसाची सुरुवात हिरकणी ला नमन करून करूया. काय? कोण हिरकणी? अहो काजळणाऱ्या दिशांना न डरणारी ; डोळ्यातल्या पाण्यान हतबल न होता उलट ते पाणी शिंपून मातृत्वाच रोपट जोमान जोपासणारी; तान्हुल्याच्या ओढीन शिवरायांचा आदेश धुडकावून रायगडाचा बुरुज लांघणारी. हो तीच; जिची खुद्द शिवबांनी मोहोरांनी ओटी भरली ती . . हिरकणी. जिच्या मातृत्वाची गाणी गात आज ही राय गडावर तो बुरुज उभा आहे ती...हिरकणी. खर तर हा विषय शुची ताईन्चा ; त्यांनी आधीच सुरु केला पण काय झालं कोणास ठाऊक एकदम "आलामंतर कोलामंतर...

मातृ दिना निमित्त अजुन एक

लेखक वैदेहीजी यांनी शनिवार, 08/05/2010 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज मातृ दिन मातृ दिन पण आपण ज्याप्रमाणे आपल्या आई चा आदर करण्याचा दिवस आहे हे बर्याच मात् भक्त पुत्रांच्या ध्यानात असते तेव्हा बाकिच्या बायका पण कोणाच्य तरि आई असतात याचा सहज विसर पडलेला आसतो. आज हि ट्रेन मधिल मध्ल्या लेडिज डब्यांमधे शिरताना अनेक बायकांना विचार करावा लागतो. ज्या चढतात त्यांना "निर्लज्ज" म्हणायला उरलेल्या तयार असतात. आज भारताच्या सर्वोच्च पदावर एक महिला आहे. देशाची सत्ता ज्या पक्षाच्या हातात आहे त्या पक्षाची सर्वोसर्वा एक स्त्री आहे . ..पण तरीही ....अजूनही २१ व्या शतकात सुद्धा तस्लिमा नसरीन सारख्या लेखिकेला लपत-छपत फिरायला का लागतं आहे? तिचा अपराध काय ..

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

मातृदिनानिमित्त...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 08/05/2010 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
आईपणाचा उदोउदो... मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.

[कोणता फोटो णैसर्गिक वाटतो]

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 07/05/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एकाच दृष्याच्या दोन वेग वेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत.

कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 07/05/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे. या चाचणीचं प्रयोजन कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही.