Skip to main content

पुण्य

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/05/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका ग्रंथाचे भाषांतर करताना पुण्य या शब्दावर अडकलोय. पुण्य या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द कोणाला सुचतोय का. पुण्य हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाला जवळ जाणारा शब्द व्हर्च्यू हा शब्द आहे. पण तो चपखल बसत नाही. वर्च्यू ची पुण्याप्रमाणे साठवण होत नाही. . गेल्या जन्मीचे पुण्य ही संकल्पना कशी मांडायची? भाषा ही संस्कृती चा दर्पण असतो. अभ्यासूनी जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.

एका रिक्षावाल्याची गोष्ट

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 12/05/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहमीच असे काहीतरी अनुभव येत असतात...कुर्ल्याला होते तेव्हा स्टेशनवर बसने जायचे...बसथांब्याशेजारीच रिक्षा उभ्या राहायच्या...बरेचदा लोक बसची वाट पाहण्यापेक्षा २-३ मिळून शेअर रिक्षा करून स्टेशनला जायचे...बसच तिकीट ३/- म्हणून माणसी ३/- घ्यायचे रिक्षावाले....एकदा दुपारी मी बसची वाट पाहत थांबले...एक रिक्षावाला "स्टेशन... स्टेशन " करत आला...इतर कोणीच नव्हतं..मी त्याला विचारलं " तीन रुपयात नेणार ना? ", उत्तरादाखल त्याने मन हलवली आणि बस म्हंटला...मी बसले...स्टेशनच्या रिक्षा थांब्यावर थांबलो आणि मी उतरून त्याला ३/- दिले...लगेच त्याने ओरडा आरड चालू केली " आठ रुपये द्या" "आठ कसले ?

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 12/05/2010 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध हा धागा टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले. तेथे प्रतिसाद फार खाली गेले होते म्हणून नवा टाकत आहे. ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.

अप्रतीम गांधारपाले लेणी

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 12/05/2010 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात " alt="" /> कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर

आणखी बुडीत खाते ('त्या' बुडीत खात्यांशी संबंध नाही)

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 12/05/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
बुडीत खात्यांची चर्चा चालू आहे म्हणून माझा वेगळा अनुभव. शीर्षकातच डिस्क्लेमर आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी एकटाच मद्रासला गेलो होतो. एग्मोर भागात कंपनीचे गेस्टहाऊस होते. तेथे रहात होतो. नेहमी २-३ दिवसांसाठी जातो तेव्हा तडतड करून, रात्री उशीरा काम करण्याची पद्धत असते. पण यावेळी चांगला १०-१२ दिवसांचा मुक्काम होता त्यामुळे थोडा निवांतपणा होता. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इकडे तिकडे भटकणे, मग जेवण आणि झोपणे असा कार्यक्रम होता. एके दिवशी संध्याकाळी असेच फिरताना लोकांकडे पहात पहात चाललो होतो. कसे काय ते माहिती नाही पण जवळच असलेल्या एका इसमाशी नजरानजर झाली.

शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 12/05/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे यांची खुप चर्चा झाली होति.. प्रसिध्द चेफ श्री निलेश लिमये यांनी शिव वड्या पावा साठी खास पध्धतिची रेसिपि बनविली असे वाचनात आले होते... पुण्यात आम्हि बरिच चौकशी केली पण जोशी वडेवाले यांचाच वडा पाव पुण्यात मिळतो.. शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे हे बघायला सुध्धा मिळाले नाहि.... तसेच लालु यांनी पण रेलगाडीत ह्या व.पा.ला विक्रीस परवांगी दिलि असे पण वाचनात आले होते... कम्युनिटी वरील मुंबई च्या सदस्यांना विचारु इछ्छितो.. मुंबैत शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे मिळतात का? कुठे? सभासदा पैकी कुणी याची चव चाखली आहे का?

(हावरे)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 12/05/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
खाद्यप्रेरणा केळीची मांडलेली पाने. अन पानापानावर सांडलेले जिन्नस.. कुठेतरी मधुनच डोकावणारा.. शुध्द तुपातला बेसनलाडु.. द्रोणांचे खोल डोह.. सांबारावर तरंगणारी दगडफुले.. पुन्हा पुन्हा मागणारे.. लग्नावळीतील बेलाज हावरे.. दूर दूर जाणारे वाढपी.. अन त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणारा मी.. - खुशाल.
काव्यरस

पुणे पोलिस गुन्हेगारांची पाठराखण करत आहेत का?

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 12/05/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच दैनिक सकाळमध्ये एक अस्वस्थ करणारी बातमी वाचली. ज्या ५० सराईत गुंडांना तडीपार केले गेले व नंतर त्यांची तडीपारी गृहमंत्रालयातून रद्द करण्यात आली त्यांची नावे देण्यासाठी, व त्यांची तडीपारी रद्द करण्यामागे कोणत्या राजकारण्यांची शिफारस होती हे सांगण्यासाठी सकाळचे प्रतिनिधी गेले दोन-तीन दिवस पुणे पोलिसांचा पिच्छा पुरवत आहेत, परंतु पोलिसांकडून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

"जान्हवी"-- पुस्तक परिचय.

लेखक टुकुल यांनी बुधवार, 12/05/2010 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकः जान्हवी लेखकः वि. वा. शिरवाडकर प्रथम आव्रुती: १९५२ प्रकाशकः कॉन्टिनेन्टल प्रकाशन किंमतः 50.00 परवा घरी थोडा वेळ मिळाला आणी बर्‍याच दिवसापासुन पडुन राहीलेले "जान्हवी" हातात घेतले. त्याआधी एकदा तीसेक पाने वाचली होती, पण परवा एका दमात पुस्तक वाचुन संपले (संपवावे लागले) वि. वा. शिरवाडकरांचे माझ्यासाठी पहिलेच पुस्तक आणी प्रथम आव्रुती १९५२ ची, त्यामुळे वाटले कि काहीतरी जुनाट वाचायला मिळेल, पण शेवटचे पान वाचुन पुस्तक ठेवले त्यावेळी डोक सुन्न झाले आणी तो विचार गळुन पडला हि कथा मुख्यतः तिन व्यक्तीभोवती फिरते. वसुदेव, महंत आणी जान्हवी.