Skip to main content

ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

लेखक नीधप यांनी रविवार, 16/05/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मिसळपाववर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मिसळपाववर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे.

सर्व मान्यवर सदस्य बंधु-भगिनींना एक नम्र निवेदन....!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी रविवार, 16/05/2010 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज "अक्षय तृतीया..." परंपरेनुसार सोनेदागीने किंवा तत्सम वस्तु खरेदीसाठी, नातेसंबध प्रस्थापित करणेसाठी, अत्यंत शुभ मानला गेलेला मुहूर्त ! थोडक्यात काहीतरी "चांगली" खरेदी करावयाचा हा दिवस असे याचे शास्त्रात वर्णन केले गेले आहे आणि आपण ते प्रमाणभूत मानतो. या संस्थळावर विविध विषयांवर चर्चा करताना आपण वारंवार पुस्तकांचा संदर्भ देत असतो. तेव्हा मी आपणास विनंती करीत आहे की, आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीच्या लेखकाचे (वा...अन्य कुठल्याही लेखकाचे) किमान एक पुस्तक खरेदी करावे. किंमत दुय्यम आहे. अगदी दहा-वीस रुपयांचा एक कविता संग्रह जरी घेतला तरी चालेल, पण घ्या !!

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/05/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर‍! मिळाली.

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

लेखक आवशीचो घोव् यांनी रविवार, 16/05/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार! मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की, "जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो." मी विचारले कसं काय? तर तो म्हणाला हिंदू सोडून सर्व धर्मियांवर जन्म झाल्याबरोबर धर्मांतराचे संस्कार होतात. मुसलमान - सुंता ख्रिश्चन - बाप्तिस्मा शिख - अमृत झोराष्ट्रियन - नवजोत जैन - उपदेसम इत्यादी पण हिंदूंवर कोणताही "धर्मांतराचा" संस्कार केला जात नाही. हे विधान कितपत सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे याबद्दल मज पामराला काही कल्पना नाही.

आपण अन्न खातो तसेच बनतो का?

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या... दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उ

मुले आणि खर्च

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67938:… हा आजचा लेख वाचला आणि शेवटचे सुधा मूर्तीचे वाक्याने विचार करायला लावले...घरात पुष्कळ नाही तरी बऱ्यापैकी पैसा असताना मुलांना चैनीची सवय कशी लागू देऊ नये...हे करत असतानाच त्यांना प्रत्येक गोष्टीला "नाही " सुद्धा म्हणायचे नाही हे कसे शक्य करावे? कारण मागितलेल्या सगळ्या....

वाढदिवस

लेखक sur_nair यांनी रविवार, 16/05/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस अलीकडे ते एकमेकांचा वाढदिवस साजरा करत नाहीत एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ साधसं भेटकार्डही देत नाहीत इतर कुठल्याही दिवसासारखी ती तारीख येते, निघून जाते मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये हरवतात दोघे एकमेकांचे 'वय वजन वाढते त्यात साजरं काय करायचं' ती म्हणते डिनर व केक, सुंदरशी भेट त्याची सर्व इच्छाच मरते कधी तोही असतो हिरमुसलेला तिच्यावर कशास्तव चिडलेला त्याचा आवडीचा पदार्थ करायचा मग तिचाही बेत रद्ध झालेला यावेळेस तो विचार करतोय निदान प्रयत्न तरी करायचा डिनर नको तर चौपाटीव
काव्यरस

अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

चाराणे कमी !!

लेखक टारझन यांनी शनिवार, 15/05/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अंतिम वाचक वाचन करार (End Reader Reading Agreement) :- खालील लेखात देवादिकांचे संदर्भ आहेत , अर्थात आम्ही नास्तिक असल्याने ती पात्रे आम्हाला इतर कोणत्याही कथेतल्या पात्रांप्रमाणे आहेत. तेंव्हा आस्तिक लोकांच्या भावना "उगाचंच" दुखावल्या जाण्याचा संभव आहे , एक तर त्यांनी "म्यॅच्युरिटीने" काम घ्यावे , किंवा आत्ताच "स्वगृह" वर क्लिक करावे.

थुंकी

लेखक वडापाव यांनी शनिवार, 15/05/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधी सहन करता येत नसे, पण आता सवयच झालीय. भारतात एक अब्ज माणसे आहेत. त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात. कोणाच्या थुंकीत कफ असतो, कोणाच्या थुंकीत तंबाखू, पान मसाला, तर कोणाच्या थुंकीत सगळ्याचं एकत्रित मिश्रण! मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बोरीवलीवरुन ट्रेन पकडतो. किती वाजता कुठे जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ऐवजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनीटांनी उशिरा येणार आहे हे सांगितल्यावर किंवा सांगायच्या आधी "" यात्रीयोंसें निवेदन है कि वे कृपया इधर उधर ना थुंके. थुंकनेसे बिमारी फैलती है.