Skip to main content

प्रतिक्षा ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 19/05/2010 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा ? ? ? निद्रेच्या अधिनस्तहि उगडेच असतात नेत्र, परतीच्या प्रतिक्षेत तुझ्या. न जाणो मिटले ते अन….. अवतरली तू अवचित…….. .? ? ? ? आजही स्मरतात ते दिवस ....... धुंद ! धुंद ! ! पुनवेच्या चांदण्यांत, मोकळ्या केशसंभारांत, निरागस उभी तू. मला वाटले, चंद्रमाच झाला लुप्त धरणीवर, काळ्या मेघाआड. पुन्हा बहरला तोच वसंत, तारकांची धुंद बरसात, आसमंती तोच मंद वारा, ? ? ? ?
काव्यरस

विजय तेंडुलकरांचा !

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 19/05/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 19/05/2010 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस! त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!! पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D

गणपती बाप्पा मोरया

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 19/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.
काव्यरस

चिंचवडगावचा गोलंदाज

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 18/05/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या थोडा वेळ आहे म्हटल मिपावर काय चालय पहावे..थोड्या खरडी थोडे प्रतिसाद चाळल्यावर आम्हाला जलालाबादी बाबांच्या कृपेने काही साक्षात्कार झाला मिसळी वरती धुडूम्म गाज चिंचवडगावचा गोलंदाज अल्फाबीटा थीटागामा काय खरडले हे ओ मामा शब्दखुमारी सुसूत्र पाडन वाचून जनता करते धावन लेखण भीषण वाचण फेसण प्रतिसादांचे शरदी मंथन जालिंदरच्या शाब्दिकलीला क्लास लावूनी वाचक मेला "केश्या"ला या फोडाझोडा लोकांची का गुपिते फोडा

आजचे बलुतेदार

लेखक कोंबडी यांनी मंगळवार, 18/05/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का? त्यात थोडंफार वेगळेपण आहे का? तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का? मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा. बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक "करीअर गाइडस" ही व्यवसायाची निवड, कॉलेजांच्या याद्या, परीक्शांची वेळापत्रके, फी, आणि फॊर्म्स यात अडकलेली दिसतात. मुलाखत देण्यांबाबत सल्लेही असतात. मात्र एकदा एखादा व्यवसाय निवडल्यावर त्यातील आयुष्य कसं असतं याबद्दल माहिती अभावानेच आढळते. या पुस्तकात वेगवेगळ्या ३०-३५ क्षेत्रांतील व्यावसायिक आपापले अनुभव सांगणार आहेत.

आईस्ड टी (बर्फाळ लिंबू चहा)

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 18/05/2010 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : २ ग्लास पाणी २ टीबॅग्ज/ अर्धा टी-स्पून चहा (कोणताही चालेल - शक्यतो ग्रीन टी वापरतात, नेहमीची चहा पावडर ही ओके.

आयुष्याचा 'अर्धा' प्याला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 18/05/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा? हे मानण्या न मानण्यावर असतं. माझ्या दोन मैत्रिणींची लग्ने एकाच दिवशी एकाच मांडवात झाली. दोघींनाही प्रत्येकी पंधरा हजार प्रतिमाह कमावणारे नवरे लाभले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर संसाराची गणिते चुकू लागली, प्रपंचाची गाडी आर्थिक रूळावरून वेळोवेळी घसरू लागली. महागाईच्या वणवा झोडपायला नवऱ्‍याचा पगार अपुरा पडू लागल्यावर दोघीँनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला... येथवर सर्व काही ठीक चाललं होतं, अगदी समसमान होतं. परंतु एकीचा पगार जास्तीत जास्त पाच हजारापर्यँतच पोचणारा, तर दुसरीला पंधरा हजारांची नोकरी. शिवाय पदोन्नतीची शक्यता.

जटायु - लेखक शिरीष रागणेकर

लेखक नन्या यांनी मंगळवार, 18/05/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच 'जटायु' हे पुस्तक वाचण्यात आले. लेखकाने आपल्या आयुष्यात, आलेले अनुभव लिहीले आहेत. आपणापेकी कोणी हे पुस्तक वाचले आहे का?