अस्तित्वाचा पुरावा!
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही....
---------------------------------------
मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.
मिसळपाव
