Skip to main content

काईटस् ची हाईट..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 25/05/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरातबाजीचा 'कडक मांजा' लावून रोशन फँमिलीने पतंग उडवलाय खरा पण तो अपेक्षित उंची गाठू शकला नाहीये. कालच 'काईटस्' हा चित्रपट 'फ्रेँड'सोबत पाहिला.(ती/तो कोण? हा प्रश्न तूर्त बाजूला ठेऊ!). तर हा पिक्चर 'फ्रेँड'लाबरोबर घेऊनच पहावा असा सल्ला (मित्रत्वाच्या नात्याने) देत आहे. कारण यात सरळ सरळ अनैतिकतेचा पुरस्कार केलेला असल्याने हा चित्रपट जोडीदारासोबत पहाल तर पस्तावाल! खोटं नाटं लग्न केलेला 'ह्रतिक' जेव्हा डान्स क्लासमध्ये 'कंगना'ला भेटतो, तेव्हा प्रथम तुज पाहता वगैरे होते.

महानगरीय संस्कृती

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/05/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपला देश सोडून दूर, अनोळखी देशात रहायला आल्यावर तिथला एकूण रागरंग, आचार विचार, राहणीमान ह्या सगळ्यांचा तक्ता समजाऊन घेताघेता, आपल्या नकळत आपण कधी त्या तक्त्यामधला एक रकाना बनून गेलो ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही! बाहेर आल्यावर आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित स्वत:ला आणि इतरांना सांगत असतील कि शेवटी आपला देशच बरा. दोन चार वर्षात आपण तर माघारी जाणार भैया! हा राग आलापता आलापता वर्षांमागून वर्षे उलटून जातात.

मराठी मुलगी- मिस युनिवर्स २०१० ..??

लेखक अक्स यांनी मंगळवार, 25/05/2010 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी मुलगी- मिस युनिवर्स २०१० ..?? मुंबईची आरोही कदम हिला आय एम शी ह्या मिस युनिवर्सच्या पूर्वस्पर्धेत विजयी करा ..भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला मिस युनिवर्स २०१० मध्ये पाठवा.. तिला मिस युनिवर्स २०१० बनवा.. मराठी झेंडा फडकावत ठेवा... तिच्या प्रोफाईल ला भेट द्या...तिच्यासाठी फेसबुक,ट्विटर,mobile द्वारा वोट करा http://www.iam-she.com/contestantsdetails.php aarohi kadam type IAMSHE 05 send to 54646 marathi pawul padti pudhe.... last date 26th may 2010..please vote or support her on facebook,twitter..

मधूमेहाविरुद्ध लढा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मधूमेहाविरुद्ध लढा अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले. मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं. त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे.

उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) माहिती हवी आहे

लेखक Manoj Katwe यांनी मंगळवार, 25/05/2010 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=72… आत्ताच मी हि बातमी वाचली. समुद्राचे पाणी गोडे करण्याबाबत हि उपाय योजना सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्या बातमी मध्ये उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) ह्या प्रक्रियांचा उल्लेख आहे. मी विकिपीडिया व इंटरनेट गुगलून पहिले पण काही जास्त उपयुक्त माहिती मिळाली नाही. कोणी सोप्या भाषेत देऊ शकेल काय ?

पाळणाघरातील आजी

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 25/05/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच... जरा वर्षभराची झाल्यावर इकडे तिकडे उठाठेव करणे चालू झाले...करणारच...लहान पिल्लूच ते !!

काय अपशकून घडला

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
काय अपशकून घडला
महाराजांकडचा एक सैनिक उत्तरेला लढाईला जातो अन तो तेथे अडकून पडतो. इकडे त्याच्या घरी काय होते ते पहा: (कोरस तसा अनावश्यक वाटतो आहे. तोडा विरस होतो आहे.
काव्यरस

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/05/2010 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या) सिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत. चालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन. (खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. ) गाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. (लग्नपत्रिकेत नाही का लिहीत की आहेर आणू नये. जेवणाचा आस्वाद घ्यावा तसे.
काव्यरस